agriculture news in marathi,Zilla Parishad funds planning cant done for this year | Agrowon

जळगाव जिल्हा परिषदेतील निधीचे नियोजन यंदाही रखडले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

जळगाव : नियोजन समितीच्या निधीचे नियोजन  मागील आर्थिक वर्षीप्रमाणेच यंदाही रखडण्याची स्थिती अाहे. हा निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामांचे नियोजन करावे, तसेच नियोजनाच्या अधिकाराबाबत सर्वांना विश्‍वासात घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सदस्य करीत आहेत.

जळगाव : नियोजन समितीच्या निधीचे नियोजन  मागील आर्थिक वर्षीप्रमाणेच यंदाही रखडण्याची स्थिती अाहे. हा निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामांचे नियोजन करावे, तसेच नियोजनाच्या अधिकाराबाबत सर्वांना विश्‍वासात घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी सदस्य करीत आहेत.

जिल्हा परिषदेला नियोजन समितीकडून १२० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. यात नागरी सुविधा, जनसुविधा, अंगणवाडी बांधकाम, लघुसिंचन, शाळा दुरुस्ती, रस्ते बांधकाम व इतर कामे करायची आहेत. त्याचे नियोजन करून त्यासंबंधी सर्वसाधारण सभेत परवानगी घ्यायला हवी होती. सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्‍यता नसल्याने हे नियोजनच बारगळले. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कुठल्याही कामासंबंधी मंजुरी घेता आली नाही. यावरून सभेत वादही झाले. सत्ताधारी एकत्र नाहीत. विरोधकांना विश्‍वासात घेत नाहीत. एकच पदाधिकारी कसे नियोजन करू शकतो. सर्वांना बोलवा, नियोजन करा आणि निधीचे समान वाटप करा, अशी सदस्यांची मागणी आहे.

पदाधिकाऱ्यांनी नियोजनासाठी वेळ दिला नाही. प्रशासनाने कामांच्या याद्या प्राथमिक स्वरूपात तयार केल्या आहेत. त्यांना सर्वांसमोर मंजुरी देऊन पावसाळ्यानंतर तातडीने कामे सुरू करावीत, अशी मागणी सदस्य गोपाल चौधरी आणि  शशिकांत साळुंखे यांनी केली आहे.

निधी खर्चाचे नियोजन करा
शाळा दुरुस्ती, रस्ते विकास आदी कामांचे नियोजन करून निधी खर्च व्हावा. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापुर्वी निधी खर्चाचे पूर्ण नियोजन मार्गी लावा. अन्यथा मंजुऱ्या, उद्‌घाटन अशी कार्यवाही करता येणार नाही. असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.

इतर बातम्या
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...