agriculture news in maratri, farmers start to paid water bill, sangli, maharashtra | Agrowon

म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी भरण्याकडे शेतकऱ्यांचा कल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

सांगली  ः म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. या योजनेचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्‍यात दाखल झाले आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे आले आहेत. या पाच दिवसांत या योजनेची सुमारे साडेचार ते पाच लाख रुपये पाणीपट्टी जमा झाली आहे. 

सांगली  ः म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. या योजनेचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्‍यात दाखल झाले आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे आले आहेत. या पाच दिवसांत या योजनेची सुमारे साडेचार ते पाच लाख रुपये पाणीपट्टी जमा झाली आहे. 

म्हैसाळ योजना थकीत वीजबिल आणि पाणीपट्टी यांमुळे बंद होती. यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यात पाणीटंचाई निर्माण झाली. मात्र, कृष्णा खोरे महामंडळाने १५ कोटी रुपये दिल्याने ही योजना सुरू झाली. ही योजना सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. शेतीला पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा पाणीपट्टी भरण्याकडे कल आहे.
 
शेतकरी पाटबंधारे विभागाशी संपर्क करून आमची पाणीपट्टी अगोदर घ्या, असे सांगत आहेत. त्यामुळे सुटीच्या दिवशीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाणीपट्टी वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊ लागले आहेत. शासनाने ८१-१९ असा नियम उपसा सिंचन योजनेसाठी लागू केला आहे. ८१ टक्के शासनाचा वाटा तर १९ टक्के शेतकऱ्यांचा वाटा यामुळे पाणीपट्टीची रक्कम कमी झाली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ११ हजार रुपये प्रति दश लक्ष घनफूट पाणीपट्टी आहे.
 
नवीन आदेशानुसार सध्या एकरी १२०० रुपये म्हैसाळची पाणीपट्टी आहे. पाणीपट्टी कमी झाल्याने शेतकरी ती भरण्यास पुढे आले आहेत. कृष्णा नदीतील पाणीपातळी कमी झाल्याने या योजनेतील पंप बंद केले असून २४ पंप सुरू आहेत. कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नदीतील पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर पुन्हा पंप सुरू केले जातील.  
 
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन कायम सुरू राहण्यासाठी आता पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पैसे भरा आणि पाणी घ्या हे धोरण पाटबंधारे विभागाने राबविले आहे. त्यामुळे शेतकरी पाणी पट्टी भरण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. महिन्यात सुरू केलेल्या आवर्तनाची पाणीपट्टी शंभर टक्के वसुलीसाठी अधिकारी थेट शेतकऱ्यांशी संपर्क करत आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...