agriculture news in pune, agri ambulance service will start at pune district, maharashtra | Agrowon

पिकांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पुण्यात ‘अॅग्रो अॅम्ब्युलन्स’
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018
पुणे  ः विविध कीड-रोगांपासून पिकांची आरोग्याविषयक काळजी घेण्यासाठी, तसेच कृषिविषयक सल्ला, उपायोजना सुचविण्याठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांना ‘अॅग्रो अॅम्ब्युलन्स’ ही सेवा देण्यात येणार आहे. कृषी उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने ही सेवा देण्यात येत आहे. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची प्रसिद्धी या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी दिली.
 
पुणे  ः विविध कीड-रोगांपासून पिकांची आरोग्याविषयक काळजी घेण्यासाठी, तसेच कृषिविषयक सल्ला, उपायोजना सुचविण्याठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांना ‘अॅग्रो अॅम्ब्युलन्स’ ही सेवा देण्यात येणार आहे. कृषी उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने ही सेवा देण्यात येत आहे. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची प्रसिद्धी या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी दिली.
 
कृषी सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या कल्पनेतून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी योजनेसाठी अर्थसंकल्पात १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या वर्षी प्राायोगिक तत्त्वावर एक ‘अॅग्रो अॅम्ब्युलन्स’ सुरू करण्यात येणार आहे. कृषिदिनी (ता. १ आॅगस्ट) या सेवेची सुरवात केली जाणार आहे. 
 
जिल्हाभर फिरणाऱ्या या अॅम्ब्युलन्ससाठी टोलफ्री क्रमांक, व्हाॅट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर शेतकऱ्यांनी त्याच्या शेतातील पिकांचे व किडीचे फोटो पाठवावेत, त्याबाबतही तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 
राज्यासह देशभरात कृषिविषयक अनेक प्रयोग राबविले जातात. शेतकऱ्यांच्या यशोगाथा, कृषिविषयक नवीन संकल्पना, सेंद्रिय, रेसिड्यूविरहित उत्पादन, कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी, यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर यांचा प्रचार आणि प्रसार सामान्य शेतकऱ्यांपर्यंत करण्यासाठी ‘अॅग्रो अॅम्ब्युलन्स’ सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे पवार यांनी सांगितले.  
 
अशी असेल ‘अॅग्री अॅम्ब्युलन्स’
  • शेतकऱ्यांना दृकश्राव्य माहिती देण्यासाठी एलईडी.
  • मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांची उपस्थिती.
  • विविध कीड-रोगांविषयी माहिती.
  • कीटकनाशकांच्या वापरासाठी सल्ला.
  • नैसर्गिक आपत्तीवेळी आवश्‍यक मार्गदर्शन.
  • हेल्पलाइनच्या मदतीने शेतकऱ्यांना घरबसल्या माहिती.
  • कृषी, पशुसंवर्धन योजनांच्या प्रचार, प्रसिद्धीवर भर.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...