agriculture news shirala in sneke image Pray | Agrowon

शिराळ्यात नागप्रतिमेची पूजा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

शिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत नागपूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग पाचव्या वर्षी आपल्या उत्साही मनाला मुरड घालत बुधवारी (ता. १५) जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेची पूजा केली.
जिवंत नागपूजा करणारे शिराळकर कशी पूजा करणार याची उत्सुकता सकाळपासून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व प्रशासकीय यंत्रणेला होती. परंतु युवा वर्गाने अत्यंत संयमाने दिवसभर अंगावर पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी उत्साहात साजरी केली.

शिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत नागपूजेची परंपरा जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग पाचव्या वर्षी आपल्या उत्साही मनाला मुरड घालत बुधवारी (ता. १५) जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेची पूजा केली.
जिवंत नागपूजा करणारे शिराळकर कशी पूजा करणार याची उत्सुकता सकाळपासून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व प्रशासकीय यंत्रणेला होती. परंतु युवा वर्गाने अत्यंत संयमाने दिवसभर अंगावर पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या उपस्थितीत नागपंचमी उत्साहात साजरी केली.

बुधवारी (ता. १५) सकाळी सहापासून नागमंडळे प्रतीकात्मक नाग घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. महिलांनीही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वन विभागाच्या वतीने साप: अंधश्रद्धा व गैरसमज याविषयी व भित्तिपत्रकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात आले.

नागपंचमी उत्साहात साजरी करण्यासाठी नागमंडळांनी मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता. दुपारी महाजनांच्या घरी नागप्रतिमेची पूजा करून पालखी अंबामाता मंदिराकडे नेण्यात आली. या पालखीचा मान भोई समाजाकडे आहे. शिराळा आगाराच्या वतीने ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ५०० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विद्युतपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत वितरणने पथके नेमली होती.

इतर ताज्या घडामोडी
अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या...
जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची...जळगाव ः खानदेशात सुमारे एक हजार गावे टंचाईच्या...
लाकडी अवजारे हद्दपार; सुतारांवर...रिसोड, जि. वाशीम ः आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू...
कसणाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास...विकसनशील देशांमध्ये कृषी उत्पादकता आणि उत्पन्नाची...
जळगाव बाजार समितीती कांदा दरात सुधारणाजळगाव ः लाल कांद्याची आवक अस्थिर असून, दरात मागील...
नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून नवीन चार...नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांची चारा...
सुला विनियार्ड्समध्ये ९ हजार टन...नाशिक : देशातील आघाडीच्या वाइन उत्पादक असलेल्या...
जत तालुक्यातील दीड हजार शेततळी कोरडीसांगली :  शासनाच्या योजनेतून जत तालुक्यात...
`उर्ध्व पेनगंगाचे पाणी सोडा`नांदेड : मालेगाव (ता. अर्धापूर) परिसरातील...
नगरमध्ये कारले २००० ते ५००० रुपये...नगर  : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (...
बुरशी, जिवाणू, सूत्रकृमीमुळेच आले...औरंगाबाद: जिल्ह्यातील आले पिकाचे २०१५-१६ व २०१८-...
नगर जिल्ह्यातील ५०१ छावण्यांत सव्वातीन...नगर  : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पशुधन...
सातारा जिल्ह्यातील आले लागवड रखडलीसातारा  ः तापमानवाढीचा परिणाम आले पिकावर होऊ...
उत्तर कोरेगावमधील तळहिरा धरण कोरडेवाठार स्टेशन, जि. सातारा  ः उत्तर कोरेगाव...
अपघातग्रस्तांना विमा रक्कम देण्यासाठी...पुणे  ः शेतकरी कुटुंबातील कोणत्याही...
काँग्रेस आघाडीपुढे विधानसभेचे मोठे...मुंबई : लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्याने...
जळगाव बाजार समितीच्या सभापतींची उद्या...जळगाव  ः जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि...
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...