निलेश रोडे यांनी लेबलिंग करून मूल्यवर्धित संत्रा बाजारात आणला आहे.
निलेश रोडे यांनी लेबलिंग करून मूल्यवर्धित संत्रा बाजारात आणला आहे.

ग्रेडिंग, कोटींगद्वारे संत्र्याचे मूल्यवर्धन, नीलेश रोडे यांनी उभारले प्रक्रिया युनिट

संत्र्याचे मूल्यवर्धन ‘महाऑरेंज’ संस्थेचे वर्धा जिल्ह्यात कारंजा येथे प्रक्रिया केंद्र आहे. अमरावती जिल्ह्यातील पणन मंडळाचे मोर्शी येथील केंद्रही याच संस्थेने चालवायला घेतले आहे. केंद्रात प्रति किलो संत्रा प्रक्रियेसाठीदोन ते अडीच रुपये खर्च येतो. त्यात डागाळलेली फळे काढणे, वॉशिंग, क्लिनिंग, कोटींग आणि ग्रेडिंग आदी प्रक्रियेचा समावेश आहे. याद्वारे संत्र्याची टिकवणक्षमता पाच दिवसांपर्यंत वाढविता येते.

सालबर्डी (जि. अमरावती) येथील संत्रा उत्पादक नीलेश रोडे यांनी आधुनिक यांत्रिकीकरण करून संत्र्याचे मूल्यवर्धन साधले आहे. यात संत्र्याचे ग्रेडिंग, कोटींग व पॅकिंग होते. त्याद्वारे प्रक्रिया झालेले फळ बांगला देशात निर्यात होत असून किलोमागे तीन ते सात रुपये अधिक मिळवण्याची संधी रोडे यांनी पटकावली आहे. विदर्भात अशी १३ प्रक्रिया युनिटस आहेत. ‘महाऑरेंज’ संस्थेनेही अशा सुविधांद्वारे संत्रा निर्यातीची संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे.  नागपूरी संत्र्याची वेगळी ओळख आहे. त्याला देशाबरोबरच बांगला देशातून सर्वाधिक मागणी राहते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हंगामात दररोज ५०० ते ६०० टन संत्रा भारतातून या देशात पाठवला जातो. नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा निर्यातदार अशी ओळख या देशाची होत आहे. काळ बदलला तसे तंत्रज्ञान बदलले. बाजारपेठेत मूल्यवर्धित संत्र्याला मागणी वाढू लागली. बांगला देशही याला अपवाद नाही.  रोडे यांचे शेतीतील ‘व्हिजन’  अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी येथील नीलेश रोडे यांची १७ एकर शेती आहे. त्यांची संत्र्याची सुमारे २७०० ते २८०० झाडे आहेत. ते बांगला देशाला संत्री निर्यात करतात. निर्यातीला अधिक दर मिळावा यासाठी त्यांनी फळाचे मूल्यवर्धन करण्यास सुरवात केली आहे.  असे होते मूल्यवर्धन 

  • काढणी झालेल्या संत्र्याचे वॉशिंग---ड्राईंग (सुकवणी).......वॅक्सिंग------पुन्हा ड्राईंग-- ग्रेडिंग व शेवटी पॅकिंग 
  • अशा संत्र्याला दर- किलोमागे ३ ते ७ रुपये अधिक 
  •  रोडे यांच्या प्रक्रिया केंद्राची क्षमता - ४ टन प्रति तास 
  •  त्यासाठी गुंतवलेले भांडवल - जुने केंद्र - २७ लाख रु. नवे केंद्र उभारणी- सुमारे पावणेदोन कोटी रु. 
  • सद्या विदर्भात अशी युनिटस - ११ 
  • ग्रेडिंगनुसार असे मिळतात दर 

  • रोडे सांगतात, क्रेटमध्ये कोणत्या आकाराची किती संत्रा बसतात त्याला काऊंट म्हणतात. त्यानुसार त्याला दर मिळतात. 
  • असे आहेत काऊंट 
  • ४७ - दर १३०० रुपये प्रति क्रेट 
  • ८० 
  • ९६----दर-९६ रुपये प्रति क्रेट 
  • १४१--याला बाजारात सर्वाधिक मागणी 
  • १७१ 
  • १९१ 
  •  रोडे यांनी आपल्या संत्र्याचा नव्या असा ब्रॅंड तयार केला आहे. "बेस्ट क्‍वॉलिटी' असे लेबल लावून ते माल पॅक करतात. एखादी व्यक्ती सुटा-बुटात ज्याप्रमाणे राहते, त्याचे ‘इंप्रेशन’ काहीसे वेगळे असते. तसाच संत्र्याच्या मूल्यवर्धनाचा प्रकार असल्याचे ते सांगतात.  पॅकिंगचे महत्त्व  १) अनेक वर्षे लाकडाची पेटी संत्रा पॅकिंगसाठी वापरात होती. वीस किलोच्या या पेटीसाठी आज ७० ते८० रुपये खर्च होतो. लाकडाची उपलब्धता कमी होत गेल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गातूनही पेटीची मागणी कमी झाली. आज क्रेट आणि कोरूगेटेड बॉक्‍सचा वापर वाढीस लागला आहे.  २) नेहमीचे दणकट क्रेटस आहेत. सोबतच एकवेळ वापरासाठी उपयोगात येणारे (यूज ऍण्ड थ्रो)  शंभर रुपयांची किंमत असलेले क्रेटही आजच्या घडीला उपलब्ध झाले आहेत. बांगला देश व दूरच्या बाजारात या क्रेटमधून माल पाठविला जातो. क्रेटमध्ये संत्र्याची एक ‘लेयर’ पसरल्यानंतर  त्यात पुठ्ठा टाकला जातो. एकमेकांना संत्रा घासल्यास डागाळण्याची भीती राहते. हा प्रकार रोखण्यासाठी अशाप्रकारची खबरदारी घेतली जाते.  ३) कोरूगेटेड बॉक्‍सचाही वापर गरजेनुसार होतो.  यावर्षीचे दर (किलोचे) 

  • बांगला देशासाठी - किलोला ३५ ते ४० रुपये. 
  • ९६ (प्रथम ग्रेड) व १४१ दुसरी ग्रेड - ३३ रुपये 
  • १७१ काऊंट- २५ रुपये, १९१ काऊंट - १५ रुपये 
  • बांगला देशात मागणी  बांगला देशात नागपुरी संत्र्याला अधिक मागणी राहते. येथे संत्र्याचे चार नग (ज्याला हाली म्हटले जाते) आणि डझनानुसार विक्री होते. हंगामात भारतातील दर त्या देशातील बाजारातील दरांवर परिणाम करतात, अशी माहिती तेथील व्यापारी महम्मद सल्लाउद्दीन यांनी दिली. सुमारे दोनशे व्यापारी फळांच्या व्यवहारात कार्यरत आहेत.  सिमेवर आयात केंद्र  भारतातून संत्र्याची खेप बांगला देशापर्यंत भारतीय वाहनाने पोचते. निर्यात सुविधा केंद्र सिमेवर उभारण्यात आले असून त्या ठिकाणी कस्टम व अन्य प्रक्रिया पूर्ण करून बांगाल देशातील वाहनांमध्ये हा माल भरलाजातो. व्यापाऱ्यांकडून आयात शुल्कापोटी प्रति २० टनांसाठी पाच लाख ४० हजार रुपये आकारले जातात. आयात शुल्कात आता चांगलीच वाढ झाली आहे.  सिट्रस लिथरचे कोटींग  संत्र्याला चकाकी आणण्यासाठी पूर्वी वॅक्‍स (मेणाचा) वापर व्हायचा. त्यावर बंदी आल्याने सिट्रस लिथर- ४०२ या ‘फ्रूट कोटींग’ रसायनाचा वापर होतो. त्याचा हलकासा थर संत्र्याच्या आवरणावर चढतो. संत्र्याची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी त्याचा फायदा होतो. हे कोटींग करण्याआधी संत्रा धुतला जातो. स्वच्छ पुसला जातो. त्यानंतर उष्णजल प्रक्रिया (हॉट ट्रिटमेंट) होते. त्यानंतर सिट्रस लिथरचे कोटींग चढून ग्रेडिंग होते. ही सारी प्रक्रिया स्वयंचलीत यंत्राद्वारे होते. डागाळलेली, रोगट व बुरशीजन्य फळे काढण्यासाठी मजूरांचा वापर होतो.  मूल्यवर्धनावरील खर्च  ‘महाऑरेंज’ संस्थेचे वर्धा जिल्ह्यात कारंजा येथे प्रक्रिया केंद्र आहे. अमरावती जिल्ह्यातील पणन मंडळाचे मोर्शी येथील केंद्रही याच संस्थेने चालवायला घेतले आहे. केंद्रात प्रति किलो संत्रा प्रक्रियेसाठी दोन ते अडीच रुपये खर्च येतो. त्यात डागाळलेली फळे काढणे, वॉशिंग, क्लिनिंग, कोटींग आणि ग्रेडिंग आदी प्रक्रियेचा समावेश आहे. याद्वारे संत्र्याची टिकवणक्षमता पाच दिवसांपर्यंत वाढविता येते. त्यावरील लकाकीही वाढते असे संस्थेचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे सांगतात. पॅकिंग व लेबलिंगचा खर्च एक ते दीड रुपये होतो.  संपर्क-   निलेश रोडे - ९४२०७२१०१७  श्रीधर ठाकरे - ९८२२२२८५३३  (महाऑरेंज)   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com