Agriculture stories in Marathi, Adulsa cultivation , AGROWON, Maharashtra | Agrowon

अडुळसा लागवड कशी करावी?
औषधी व सुगंधी वनस्पती योजना,  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

अडुळसा लागवड 
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने हिरवी, लांबट, वर्तुळाकार, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. झुडपाचे मध्यम आकाराचे सोटमूळ लांब वाढते. खोडाला फांद्या समोरासमोर येतात. पेर फुगलेली असतात. फुले पांढरी असतात. फळे टोकाला लागतात. 

अडुळसा लागवड 
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने हिरवी, लांबट, वर्तुळाकार, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. झुडपाचे मध्यम आकाराचे सोटमूळ लांब वाढते. खोडाला फांद्या समोरासमोर येतात. पेर फुगलेली असतात. फुले पांढरी असतात. फळे टोकाला लागतात. 

लागवड ही छाट कलमाद्वारा किंवा बिया लावूनही करता येते. मुख्यतः पावसाळ्यात लागवड केली जाते. कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर एक x एक मीटर अंतरावर याची लागवड करावी. मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी छाट कलमांचा वापर करून प्लॅस्टिक पिशवीमध्ये रोपे तयार करावीत. या वनस्पतीवर रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत नाही.

पावसाळ्यात याची लागवड करावी. जूनच्या शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड केल्यास पिकाची वाढ चांगली होते. पानांची किंवा फुलांची काढणी गरजेनुसार झाडाच्या पानाच्या प्रमाणानुसार करावी. साधारणतः तिसऱ्या महिन्यापासून पाने काढणीसाठी तयार होतात. त्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या अंतराने छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर पाने, फांद्या, फुले ही सावलीत वाळवावीत. संपूर्ण वाळल्यानंतर त्याची पावडर करावी. आयुर्वेदिक औषधात अडुळशाचा वापर केला जातो.

संपर्क ०२४२६- २४३२९२
औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

टॅग्स

इतर औषधी वनस्पती
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...
औषधी करटोली१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex....
कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजीशास्त्रीय नाव : Chlorophytum borivilianum...
कोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...
तंत्र शिंगाडा उत्पादनाचे...शिंगाडा हे उपवासाच्या काळात विशेष मागणी असलेले...
निवडुंगाच्या फळांना वाढती मागणीआत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित...
पित्तशामक कोकमकोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय...
अडुळसा लागवड कशी करावी?अडुळसा लागवड  अडुळसा हे सदैव हिरवेगार...
अाैषधी म्हणूनही उपयुक्त मिरे, वेलचीस्वयंपाकात गरम मसाल्याचा वापर होत असतो. फक्त...
मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...
सौंदर्यवर्धक, वेदनाशामक ब्राह्मी,...त्वचाविकार अाणि केसांच्या अारोग्यासाठी ब्राह्मी...