मका, सोयाबीन, हळदीचे भाव सुधारण्याची शक्यता

वायदे बाजार
वायदे बाजार

गेल्या सप्ताहात कापूस, हळद व गहू वगळता इतरांचे भाव उतरले. साखरेचे भाव स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, सोयाबीन, हळद व गवार बीचे भाव सुधारतील. साखर व कापसाचे भाव अधिक आवकेच्या अपेक्षेने कमी होतील. 

खरीप पिकाची आवक आता सुरू झाली आहे. मालाची प्रत कमी असल्याने भावसुद्धा पडून आहेत. सोयाबीनच्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत; पण त्या मुख्यत्वे त्यातील ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने आहेत. २४ ऑक्टोबर रोजी संपणाऱ्या सप्ताहात कापूस, हळद व गहू वगळता इतरांचे भाव उतरले. साखरेचे भाव स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, सोयाबीन, हळद व गवार बीचे भाव सुधारतील. साखर व कापसाचे भाव अधिक आवकेच्या अपेक्षेने कमी होतील.    गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स आणि एमसीएक्समधील किमतींतील चढ-उतार ः मका  खरीप मक्याच्या (नोव्हेंबर २०१७) किमती  या सप्ताहात रु. १,३७९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३७२ वर आल्या आहेत. जानेवारीमधील फ्युचर्स किमती रु. १,३९३ वर आल्या आहेत. हमीभाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनावर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : १९.२४ दशलक्ष  टन). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती घसरण्याचा संभव आहे.  साखर  साखरेच्या (डिसेंबर २०१७) किमती  या सप्ताहात रु. ३,४१० वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु.३,६३३ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,४१० वर आल्या आहेत.  सध्या साठा पुरेसा आहे. पुढील महिन्यात नवीन हंगामाचे उत्पादन सुरू होईल. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते  ३३७.३ दशलक्ष टनावर येणार आहे.    सोयाबीन  फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती रु. २,८७२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. २,८५३ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,०३३ वर आल्या आहेत.  हमीभाव (बोनससहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी सोयाबीनचे उत्पादन घसरून १२.२ दशलक्ष टनावर येणार आहे. मात्र अमेरिकेतील व जागतिक उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती घसरण्याचा संभव आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमती हमीभावाच्या आसपास राहतील.  हळद   फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती या सप्ताहात रु. ७,४५२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,४७१ वर  आल्या आहेत.  एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी अधिक आहेत  (रु. ७,६१२).  तेलंगण व कर्नाटकमध्ये पावसाची तूट गेल्या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात भरून निघाली आहे. त्यामुळे वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. पुढील काही दिवसांत किमतीवर परिणाम होईल. गहू  सप्टेंबर महिन्यात गव्हाच्या (नोव्हेंबर २०१७) किमती घसरत होत्या. (रु. १,६८२ ते  रु. १,६४३).  या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. १,७३० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली)  रु. १,८०० वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.३ टक्क्यांनी कमी आहेत. (रु. १,७५८). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे.      गवार बी    फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती रु. ३,६५१  वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,६९१ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जानेवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,८१२). राजस्थानमध्ये पाऊस समाधानकारक झाला आहे. मात्र मागणी वाढती आहे.  हरभरा  फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती रु. ५,१३२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ५,३०० वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ७ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४,९२७). रब्बी पिकाचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. मार्च-एप्रिलमध्ये किमतींत आणखी उतरण होण्याची अपेक्षा आहे (मार्च डिलिवरीचा सध्याचा भाव रु. रु. ४,५३१ आहे).  रब्बी उत्पादन घेताना हेजिंगचा विचार करावा.  कापूस  एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती रु. १८,५१० वर आल्या आहेत.  स्पॉट (राजकोट) किमती  रु. १८,८२९ वर स्थिर आहेत. जानेवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १८,४१०).   २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती घसरण्याचा संभव आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).   इमेल ः arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com