Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on 2 days agril council | Agrowon

मंथुनी नवनीता तैसे घे अनंता
विजय सुकळकर
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

सारासार विचारमंथनातून जे पुढे येईल ते घेतले तरच भले होणार असून, व्यर्थ बाबींच्या मागे लागले तर नुकसान होणार, हे स्पष्ट आहे. 

गुजरातमधील सत्ता संपादनासाठी भाजपची फारच दमछाक झाली. या राज्यात ग्रामीण भागातून त्यांना मोठा झटका बसला आहे. मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांची दैना आणि शेतकरीविरोधी धोरणांचे संदेश देशभर झपाट्याने पसरत आहेत. त्यातच २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीचा निर्धार केला, परंतु त्या दिशेनेही फारसे काही होताना दिसत नाही.

पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या विरोधात जनमत तयार होत असल्याने ‘डॅमेज कंट्रोल’च्या भूमिकेत केंद्र सरकार दिसते. त्यातूनच आयात-निर्यातीबाबत शेतकऱ्यांच्या अानुषंगाने काही सकारात्मक निर्णय अलीकडे घेतले गेले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण भागालाच प्राधान्य दाखवून आगामी खरिपात खर्चाच्या दीडपट हमीभावाची घोषणाही करण्यात आली आहे. देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी दोन दिवसांचे राष्ट्रीय मंथनही नुकतेच दिल्ली येथे पार पडले. शेतीसंबंधित विविध विषयांतील तज्ज्ञांच्या सखोल मंथनातून नवनीत निघाले असले तरी या प्रक्रियेलाच मुळात उशीर झाला आहे. त्यातच धोरणाचा आराखडा तयार करून त्याची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असताना त्यासही विलंब लागणार अाहे.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढ झाली पाहिजे. आणि उत्पादनाचे त्यांना परवडेल अशा उत्पन्नात (नफ्यात) रुपांतर झाले तर त्यांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले, असे समजण्यास हरकत नाही. अशी व्यवस्था देशात आजतरी नाही. गंभीर बाब म्हणजे शेतीच्या कल्याणासाठी आम्ही हे करू, ते करु, अशी भाषा नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी करीत होते आणि आजही करताहेत.

दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेतून पुढे आलेल्या मुद्द्यांवर संबंधित क्षेत्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत निती आयोगामध्ये चर्चा होणार आहे. त्यातच राज्यनिहाय, हवामान विभागनिहाय शेतकऱ्यांच्या समस्या वेगवेगळ्या असल्याने असेच मंथन प्रत्येक राज्यात व्हावे, असेही नियोजनकर्त्यांना अपेक्षित आहे. या चर्चेत कृषी विद्यापीठांतील तज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांनाही जोडण्यात येऊन त्यांच्या सूचनाही विचारात घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय कृषी परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे तसेच राज्यनिहाय चर्चेतून पुढे येणारे विषय यातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अल्प आणि दीर्घकालीन उपायांवर आधारित व्यापक धोरण ठरणार असून ही प्रक्रियाच मुळात वेळखाऊ अाहे. त्यात या प्रक्रियेस सर्व राज्ये कितपत प्रतिसाद देतील, हाही लाखमोलाचा प्रश्न आहे. 

मंथुनी नवनीता तैसे घे अनंता। वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग।।  
या अभंगात सारासार विचारमंथनातून जे येईल ते घेतले तरच भले होणार असून व्यर्थ बाबींच्या मागे लागले तर नुकसान होईल, असा स्पष्ट संदेश दिला आहे. राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पीक लागवडीच्या अंदाजापासून जगात काय पिकते, काय विकते याचा अभ्यास करून शाश्वत उत्पादनाबरोबर हमखास नफ्याच्या शेतीचे अनेक मुद्दे मांडले आहेत. असेच विचार इतर तज्ज्ञांनीसुद्धा मांडले आहेत. त्या मुद्द्यांचा विचार केंद्र सरकारच्या नव्या कृषी धोरणात व्हायला हवा. तसे झाले नाही तर शेतकऱ्यांची दैना देशात चालूच राहील, हे सत्य आहे. 

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...