Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on cotton puchasing delay in state. | Agrowon

मुहूर्तालाच खोडा
विजय सुकळकर
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मूग, उडीद, सोयाबीनला भावाचा फटका बसल्याने कापसावर तरी दिवाळी साजरी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत असताना त्यातही सीसीआय, कापूस पणन महासंघाचा खोडाच दिसतो.
 

कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा शासनाचा दिवाळीचा मुहूर्त जवळपास टळला आहे. राज्य शासनाने वारंवार जाहीर करूनही दिवाळीपूर्वी कर्जमाफीबाबत संबंधित यंत्रणेने हे गांभीर्याने घेतलेलेच दिसत नाही. खरिपाची पिके हाती आल्यानंतर त्यांची विक्री करून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असते, हे शासन प्रशासनाला चांगले माहीत आहे. चालू हंगामात राज्यात मूग, उडीद, सोयाबीनला बहुतांश ठिकाणी हमीभावाचासुद्धा आधार मिळाला नाही. त्यातच आता कापूस पणन महासंघाने पहिल्या टप्प्यातील खरेदी केंद्रे सुरू करावीत, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु, सध्या कापसाची स्थिती जाणून घेण्याकरिता स्थानिक कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याचे कळते. त्यांच्याकडून माहिती घेऊन पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कापूस खरेदीचा निर्णय घेतला जाईल, असे महासंघाच्या अध्यक्षांची भूमिका दिसते.

गंभीर बाब म्हणजे राज्यातील कापूस परतीच्या पावसाने भिजला असल्याने सीसीआयला कापूस खरेदीसाठी ऑक्टोबरएेवजी नोव्हेंबरचा मुहूर्त चांगला वाटतोय. सध्याच शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या घरात जात असताना नोव्हेंबरमध्ये व्यापाऱ्यांसाठी खरेदी केंद्रे सुरू करायचेत का? असा सवाल उपस्थित होतोय.

राज्यात सर्वसाधारणपणे दसऱ्यापासूनच शेतकऱ्यांच्या घरात कापूस येऊ लागतो. दसरा ते दिवाळीदरम्यान राज्यात पावसाच्या सरी सुरू होत्या. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी लगबगीने कापूस वेचून घेतला. ज्यांनी कापूस वेचला नाही त्यांचा कापूस भिजला असून मागील दोन दिवसांच्या उघाडीत तोही कापूस वेचून झाला आहे. मूग, उडीद, सोयाबीनला भावाचा फटका बसल्याने कापसावर तरी दिवाळी साजरी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत असताना त्यातही सीसीआय, कापूस पणन महासंघाचा खोडा दिसतो.

शासकीय कापूस खरेदीच्या मुहूर्ताला होत असलेल्या विलंबाचा फायदा मात्र व्यापाऱ्यांना होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक खासगी व्यापाऱ्यांनी ४००० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल अशा हमीभावापेक्षा कमी दराने (हमीभाव ४३३० रुपये) कापसाची खरेदी सुरू केली आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रांना सुरू होण्यास तीन ते चार आठवडे उशीर झाल्यास पहिल्या, दुसऱ्या वेचणीचा कापूस शेतकऱ्यांना नाइलाजास्तव व्यापाऱ्यांना विकावा लागेल. एकदा खरेदी केंद्रे सुरू झाली म्हणजे राज्यात कापसाचे दर सुधारण्यासही हातभारच लागणार आहे. गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान कापसाला सर्वसाधारणपणे ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. यावर्षीही तोच दर मिळू शकतो. त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक खरेदी केंद्रे लवकर सुरू करा, अशी मागणी करताहेत, यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक कर्मचारी राज्यातील कापसाची नेमकी काय स्थिती जाणून घेणार ते भल्याभल्यांना पडलेले एक कोडे आहे. हा सर्व प्रकार म्हणजे वेळ मारून नेऊन कापसाची खरेदी कोणत्याही परिस्थितीत उशिरा सुरू करण्यासाठीचा डाव दिसतो. पणन महासंघ सीसीआयकरिता कापूस खरेदी करणार आहे. सीसीआयच्या सूचनेशिवाय राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरू होणार नाहीत. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अथवा दिवाळीस कापसाची खरेदी सुरू होते. मात्र, मागील काही वर्षांपासून सीसीआयकडून कापूस खरेदीला उशीर होतोय. अशावेळी राज्य शासनाने कापूस पणन महासंघाला निर्देश देण्यापेक्षा सीसीआयवर खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करण्यासाठी दबाव वाढवायला हवा.

इतर अॅग्रो विशेष
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...