Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on crop damage by wild life | Agrowon

अधिक नुकसान, कमी भरपाई
विजय सुकळकर
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

प्राणी, पीक, पिकांची अवस्था, नुकसानीची पाहणी करण्याची वेळ यानुसार भरपाई ठरविण्याच्या शास्त्रीय पद्धती शोधून त्यांचा वापर व्हायला हवा. वन्यप्राण्यांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधनाची गरज आहे. 

राज्यभरात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत 
 वन्यप्राणी पिकांचे अतोनात नुकसान होते. सोयाबीनपासून ते नारळापर्यंतच्या पिकांचे वन्यप्राणी-पक्ष्यांद्वारे नुकसान होते. शेतीच्या नुकसानीत मोरापासून ते रानडुकरापर्यंत प्राणी-पक्ष्यांचा समावेश असून, याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर सातत्याने चालू असतात. बिबट्या, वाघासारख्या जंगली प्राण्यांनी शेतकरी, शेतमजुरांवर हल्ला केला अथवा गाय, बकरी खाल्ली अशाही काही बातम्या असतात. वन्यप्राण्यांनी पिकांचे, पाळीव प्राण्यांचे नुकसान केले तर भरपाई मिळण्याची तरतूद आहे; परंतु त्यासाठी अडचणींचा डोंगर शेतकऱ्यांसमोर असून, तोही त्यांनी पार केला तर मिळणारी मदत अत्यंत कमी आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी तक्रार करून नुकसानभरपाई मागायलाच जात नाहीत. अनेक वर्षांच्या अभ्यासाअंती असे दिसते की प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या एक टक्काही भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही.

वन्यप्राण्यांनी केलेले नुकसान सहजासहजी मोजताच येत नाही. पंचनाम्याला उशीर झाला तर नुकसानीचा नीट अंदाज येत नाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी कृषी, ग्रामविकास, महसूल आणि वन या खात्यांचे कर्मचारी लागतात, त्यांचा अनेक वेळा मेळच बसत नाही. अशा एकंदरीत गुंत्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागत नाही, हे वास्तव आहे. वन्यजीवांकडून पिकांचे नुकसान आणि मनुष्य-पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढत असताना प्रत्येक नुकसानग्रस्ताला भरपाई मिळायला हवी, अशी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे अलीकडे फारच जाणवू लागले आहे. 

खरे तर विविध पिकांचे विविध प्राण्यांनी केलेल्या नुकसानीसाठी एकच पद्धती उपयुक्त नाही. रानडुकरांनी केलेले नुकसान दिसायला काही दिवस जावे लागतात, तर काही दिवस गेले की नीलगायींचे नुकसान दिसत नाही. हत्ती, नीलगायींनी केलेले नुकसान हरीण, वानरे, अस्वलांनी केलेल्या नुकसानीच्या कितीतरी पटीने अधिक असते. तसेच काही पिके कोवळी असताना तर काही निसवल्यावर दाणे भरताना खाणेच प्राणी पसंत करतात. अशावेळी प्राणी, पीक, पिकांची अवस्था, नुकसानीची पाहणी करण्याची वेळ यानुसार भरपाई ठरविण्याच्या विविध शास्त्रीय पद्धती शोधून त्यांचा वापर व्हायला हवा. वन्यप्राण्यांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधनाची गरज आहे.

नुकसान झाले की वेळ न दवडता त्वरित तक्रार करून पंचनाम्यासाठी यंत्रणेशी आग्रह धरायला हवा. शासकीय यंत्रणेनेसुद्धा विलंब न लावता योग्य ती कार्यवाही करून नुकसानग्रस्तांना अधिकाधिक मदत कशी मिळेल, हे पाहावे  वनांच्या सान्निध्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक, पशुधन अथवा मनुष्य जीवहानी कमी करण्यासाठी वन विभागाने प्राण्यांना पिंजऱ्यात पकडणे, नुकसानकारक प्राण्यांचे स्थलांतर करणे, संरक्षित क्षेत्राच्या गाभ्यातील गावे हलविणे, शेतीला कुंपण करून देणे असे उपाय करायला हवेत. सहजीवनातून संघर्ष कमी होतो, हा अनुभव आहे. अशावेळी वनक्षेत्रात सातत्याने होणारा मानवी हस्तक्षेप कमी करायला हवा. याबाबतसुद्धा वन विभागाने लोकांमध्ये व्यापक जनजागृतीची मोहीम हाती घ्यायला हवी. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...