agriculture stories in marathi agrowon agralekh on lateral entry | Agrowon

कार्यतत्परता हीच खरी पात्रता
विजय सुकळकर
गुरुवार, 14 जून 2018

संयुक्त सचिवांची निवड राजकारण्यांच्या हस्तक्षेपाविना अत्यंत पारदर्शकपणे व्हायला हवी, आणि हे साध्य करायचे असेल तर यांच्या निवड, नियुक्त्यांची स्वतंत्र यंत्रणा उभी करायला हवी.

केंद्र सरकारमध्ये महसूल, अर्थ, कृषी, रस्ते वाहतूक, पर्यावरण, हवामान बदल आदी दहा महत्त्‍वांच्या विभागांत संयुक्त सचिव (जॉइंट सेक्रेटरी) पदांची भरती करायवयाची आहे. ही पदे आयएएस अथवा तत्सम कॅडरमधून बढती अथवा प्रतिनियुक्ती पद्धतीने भरावयाची नाहीत; तर खासगी कंपन्या, स्वायत्त संस्था, विद्यापीठांमधील हुशार, होतकरू आणि कार्यतत्पर उमेदवारांची वर्णी या जागी लागणार आहे. कंपनीतील तुलनीय पदावरील १५ वर्षांच्या अनुभवाबरोबर उमेदवार हा भारतीय असावा, तो पदवीधर असावा, त्याचे वय ४० वर्षे पूर्ण झालेले असावे, एवढ्याच काय ते या पदांसाठीच्या इतर पात्रता. दोन दिवसांपूर्वी देशातील अग्रगन्य वर्तमान पत्रांत ही जाहिरात झळकली आहे. आपल्याकडे सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याची खासगी कंपनीत वरिष्ठ पदावरील नियुक्ती ही बाब सर्वसामान्य आहे. मात्र, याच्या अगदी उलट जाहिरात प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरसुद्धा याबाबत साधक-बाधक चर्चा व्हायरल होत आहेत. लॅटरल एन्ट्री प्रक्रियेने होणाऱ्या अशा नियुक्त्या ही बाब देशात काही नवीन नाही. ही प्रकिया १९७० पासून सुरू असून याद्वारे खासगी क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती वरिष्ठ प्रशासकीय पदांवर घेण्यात आल्या आहेत. मोदी सरकारमध्येसुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी सचिवपदी आयएएस नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे. 

बुद्धिमत्तेबरोबर परिणामकारक कामे करण्याची प्रचंड क्षमता असली तरी असे सर्वच जण यूपीएससी परीक्षेत यशस्वी होत नाहीत. शिवाय काही जण क्षमता असतानासुद्धा या परीक्षेच्या नादीच लागत नाहीत. अशा व्यक्ती खासगी कंपनीत मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करीत उच्च पदापर्यंत पोचून कंपनीच्या सर्वांगाने विस्तार, विकासासाठी हातभार लावतात. लॅटरल एन्ट्रीद्वारे उपलब्ध साधन स्राेतांमधून सर्वश्रेष्ठ अधिकारी राष्ट्र निर्माण कार्यात निवडण्याची संधी शासनाला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे केवळ ३० टक्के आयएएस कॅडर केंद्रात प्रतिनियुक्तीसाठी आरक्षित असतो. त्यात मागील दोन दशकांपासून आयएएस आणि तत्सम कॅडरच्या अधिकाऱ्यांची भरतीच कमी झाली आहे. त्यामुळे केंद्रात काम करण्यासाठी चांगले अनुभवी अधिकारीच उपलब्ध नाहीत. अशावेळी खासगी क्षेत्रातील कार्यतत्पर अधिकारी उचलण्याचा हा उपक्रम चांगलाच म्हणावा लागेल. परंतू हे करीत असताना मोठी सावधानता बाळगावी लागेल. आपल्या देशात सरकारी नोकरी म्हटलं की ओळख, वशिलेबाजी तर चालतेच, वरून मोठी लाचसुद्धा घेतली जाते. तसेच काही मंत्री गणांना आपल्या सोयीचाच अधिकारी (मग तो हुशार नसला तरी) खासगी सचिवपदी लागतो. अशा वातावरणात संयुक्त सचिवांची निवड राजकारण्यांच्या हस्तक्षेपाविना अत्यंत पारदर्शकपणे व्हायला हव्यात. आणि हे साध्य करायचे असेल तर लॅटरल एन्टी प्रक्रियेने होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या निवड, नियुक्त्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करायला हवी. संयुक्त सचिवांची निवड केवळ तीन ते पाच वर्षांसाठी होणार आहे. कंपनीतील चांगले पद सोडून येणाऱ्या अधिकाऱ्याचे तीन ते पाच वर्षांनंतर भवितव्य काय? यावरही शासनाने विचार करायला हवा. लॅटरल एन्ट्रीने येणारे अधिकारी हे आयएएस अधिकाऱ्यांना पर्यायी नाही तर पूरक असणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी लॅटरल एन्ट्रीतून येणाऱ्या अधिकाऱ्यांना आपले स्पर्धक वगैरे न समजता कामात पूर्ण सहयोग द्यायला हवा. तरच बाहेरून आलेले अधिकारी पूर्ण क्षमतेने आणि परिणामकारक काम करू शकतील, हे लक्षात घ्यायला हवे. 

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...