Agriculture stories in Marathi, agrowon agralekh on support to suicided farmers | Agrowon

आधार हवा उभे करणारा
विजय सुकळकर
मंगळवार, 2 जानेवारी 2018

दुसऱ्याच्या दुःखात डोकावून त्याला किमान मानसिक, आर्थिक आधार द्यावा, असे आज समाजमनाला वाटत नाही, परंतु सर्वत्रच असे नकारात्मक चित्र नाही.

शेतकरी आत्महत्यांची कारणे स्पष्ट आहेत. त्यावरील उपायही माहीत आहेत. तरीही राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होताना दिसत नाहीत. उलट विदर्भातून सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र आता राज्यभर, देशभर पोचले आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. यावरून शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न कमी पडत आहेत, असेच म्हणावे लागेल. मागील सुमारे दीडएक दशकापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनासह अनेक सेवाभावी संस्था विविध उपक्रम, योजना राबवित आहेत. परंतु तरीही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नाहीत.

खरे तर शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर त्याचे पूर्ण कुटुंब उद्‍ध्वस्त होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीवर कुटुंबाची सर्व जबाबदारी येऊन पडते. यातील काही महिला दुःख अंगावर घेऊन अत्यंत खंबीरतेने उद्‍ध्वस्त संसाराची घडी पुन्हा बसवतात. शेतीतच काबाडकष्ट करून मुला-मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांना उद्योग-व्यवसायाला लावतात. परंतु बहुतांश महिलांनी संसाराचा गाडा रुळावर आणला तरी सध्याच्या परिस्थितीत मुलांबाळांचे शिक्षण पूर्ण करणे त्यांना कठीण जाते. खरे तर बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबातील मुलामुलींना आता चांगले शिक्षण मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी मोफत निवासी शिक्षणाचा आदर्श उपक्रम हाती घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देऊन उभे करणे ही शासनाबरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. परंतु आजचा समाज सुखाचा वाटेकरी आहे, दुःखाचा नाही. त्यांच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. एखाद्यावर संकट कोसळले तर त्यात मला काय करायचे, असे समाजातल्या बहुतांश लोकांना वाटते. दुसऱ्याच्या दुःखात डोकावून त्याला किमान मानसिक, आर्थिक आधार द्यावा, असे त्यास वाटत नाही. परंतु सर्वत्रच असे नकारात्मक चित्र नाही. ‘रयत’, ‘आपुलकी’सह काही सेवाभावी संस्था, कॉर्पोरेट घराणी तर काही ठिकाणी आयटीतील मुले एकत्र येऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार देऊन त्यांना उभे करीत आहेत. शेतकरी आत्महत्या ही राज्यातील सर्वांत मोठी सामाजिक समस्या बनली आहे. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करावयाचा आहे, हा भाव खरे तर या संस्था समाजमनावर रुजवत आहेत. या संस्थांच्या कार्यातून संकटग्रस्तांना आपण एकटे-दुकटे नाही, आपल्या पाठीमागे समाजातील अनेकजण उभे आहेत, असा मानसिक आधार तर मिळतोच; परंतु उद्ध्वस्त कुटुंबांना जगण्याचे सामर्थ्य मिळते.

‘रयत’ ही संस्था तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागातून उभी राहिलेली आहे. या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणाची केवळ बीजेच रोवली नाही, तर ‘कमवा आणि शिका’ असे धडे देऊन गरीब मुलांना विद्यार्थिदशेतच स्वावलंबी बनविण्याचे काम केले आहे. आज शालेय शिक्षणात शेतीचे शिक्षण गरजेचे असताना, शासनाला त्याचे फारसे गांभीर्य वाटत नाही. परंतु रयत शिक्षण संस्थेच्या तब्बल २० शाळांमधून आधुनिक शेती मुलांना शिकविली जाते. रयत शिक्षण संस्थेला या उपक्रमात अनेक कॉर्पोरेट घराण्याची साथ लाभते आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. परंतु आजही अनेक कॉर्पोरेट घराणी समाजिक क्षेत्रात फारसे काही करताना दिसत नाहीत. त्यांनी ‘सीएसआर’च्या पुढे जाऊन संकटग्रस्तांना उभे करण्याचे काम करायला हवे.

इतर संपादकीय
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
अडचणीत आठवते शेतीआर्थिक महासत्ता, सर्वसमावेशक विकास अशा गप्पा...
रास्त दर मिळू न देणे हे षड्‌यंत्रच इसेन्शियल कमोडिटी ॲक्‍टचे भाषांतर करताना आवश्‍यक...
मैत्रीचा नवा अध्यायपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुलै २०१७ मधील...
महागाई आणि ग्राहकांची मानसिकताअन्नधान्याचे दूध-फळे/भाजीपाल्याचे भाव थोडे वाढले...
सल्ला हवा अचूकचभारतीय हवामानशास्त्र विभाग अद्ययावत झाले, असे...
शेती परिवाराची कामे हवी शेतकऱ्यांशी...आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी प्रगत...
उद्दिष्टालाच ग्रहणएकदा लागवड केली की पुढे अनेक वर्षे फळबागा कमी...
फायद्याच्या शेतीसाठी करा अर्थसाह्यफार दिवसांपूर्वी आपल्या देशातील शेतकरी घरचे निवडक...
संपत्ती दुपटीचे सूत्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात...
रोजगारवृद्धीला अनुकूल वातावरण हाच उपाय वाढत्या श्रमशक्तीचे शिक्षण, आरोग्य सेवेच्या...
लोकसंख्यात्मक लाभ ः वास्तव की भ्रमसाधारण साठ-सत्तरच्या दशकात वेगाने वाढणारी...
निर्णयास उशीर म्हणजे झळा अधिकमराठवाड्यातील ८५२५ गावांपैकी ३५७७ म्हणजे ४२ टक्के...
बॅंकांतील ठेवी कितपत सुरक्षित?सन १९६० च्या सुमारास दि पलाई सेंट्रल बॅंक व दि...
भाकड माफसूराज्यात कौतुकाने सुरू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र...