animal tag
animal tag

बुलडाण्यात जनावरांना लावले जाणार ईअर टॅग

बुलडाणा  ः पशुसंजीवनी योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील जनावरांना ईअर टॅग लावले जाणार अाहेत. पहिल्या टप्प्यात ४९ हजार १०० इतके टॅग प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटप सर्व तालुका स्तरावर करण्यात आले असून लवकरच हे टॅग लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार अाहे.
या टॅगमुळे जनावरांची स्वतंत्र ओळख निश्चित करता येईल. तसेच रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी उद्रेकाचे ठिकाण शोधणेही सोपे होणार आहे. टॅगिंग केलेल्या जनावरांना १२ अंकी यूआयडी कोड दिले जाणार आहेत. देशभरात हे जनावर कुठेही असले तरी त्याचा शोध घेता येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १२९ पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत ठरलेल्या कालावधीत ईअर टॅगिंगचे काम करण्यात येणार आहे. याबाबतचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या दुधाळ जनावरांना टॅगिंग करून ‘आयएनएपीएच’ या संगणकीय प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. व्ही. बी. जायभाये यांनी केले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com