दक्षिण महाराष्ट्रात केळी लागवडीत यंदाही घट
राजकुमार चौगुले
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

कोल्हापूर  ः गेल्या वर्षी कमी असलेला दर व अवर्षणामुळे यंदा दक्षिण महाराष्ट्रात केळी लागवडीत घट झाली आहे. गेल्या वर्षीही पाऊस नसल्याने केळीची लागवड कमी झाली होती. यंदाही त्यात विशेष वाढ झाली नाही. 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकूण सुमारे तीन हजार एकर इतके केळीचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी केळीचे दर टनास तीन हजार रुपयांच्या खाली गेले. यामुळे शेतकऱ्यांनी केळीची लागवड टाळली. त्यातच पाऊस व जिल्ह्यातील धरणांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे पाठ फिरविली. यंदाही या स्थितीत फारसा फरक झाला नसल्याचे केळी उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

कोल्हापूर  ः गेल्या वर्षी कमी असलेला दर व अवर्षणामुळे यंदा दक्षिण महाराष्ट्रात केळी लागवडीत घट झाली आहे. गेल्या वर्षीही पाऊस नसल्याने केळीची लागवड कमी झाली होती. यंदाही त्यात विशेष वाढ झाली नाही. 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकूण सुमारे तीन हजार एकर इतके केळीचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी केळीचे दर टनास तीन हजार रुपयांच्या खाली गेले. यामुळे शेतकऱ्यांनी केळीची लागवड टाळली. त्यातच पाऊस व जिल्ह्यातील धरणांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे पाठ फिरविली. यंदाही या स्थितीत फारसा फरक झाला नसल्याचे केळी उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

उसापाठोपाठ शेतकरी केळी पिकाला महत्त्व देतात. गेल्या वर्षी केळीच्या तुलनेत उसाला चांगला दर मिळाला. यंदाही केंद्राने एफआरपीच्या रकमेत वाढ केल्याने उसाला टनाला तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे यंदाही शेतकरी उसालाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

पावसाने दडी मारल्याने मध्यंतरी काही काळ उसाची लागवडही थांबली होती. पण जलाशयांत पुरेसे पाणी असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा ऊस लागवडीकडे लक्ष दिले आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्रात यंदाही केळीची लागवड समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. अनेक केळी उत्पादकांनी केळीचे क्षेत्र कमी करून पुन्हा उस लागवड केली आहे. यामुळे जितकी लागवड अपेक्षित होती तितकी झाली नाही.

सध्या या भागातही केळी रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांतून राज्यभरातून केळीची रोपे पाठविली जातात. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या इतर भागातून केळी रोपांची मागणी कायम असली तरी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून मात्र केळीची रोपांची मागणी खूपच कमी असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. उसाच्या दरवाढीमुळे केळीला सध्या चांगला दर मिळूनही शेतकरी केळीचे उत्पादन घेण्यास दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दक्षिण महाराष्ट्रात आहे. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...
दहा लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखालीच परभणी : अद्यापर्यंत पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस...
बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणारमुंबई : शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध...
नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीचे अडीच लाखांवर...नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाच्या... सातारा  ः दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला...
पुण्यात कोथिंबीर शेकडा २५०० रुपये पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संतुलित पुरवठ्यामुळे एेन नवरात्रात... आठवडाभरात ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार वाढ...
गुरुवारपर्यत काही ठिकाणी हलक्‍या...पुणे ः राज्यात हवेचा दाब वाढत आहे. त्यामुळे...
बिहारकडून ८० अब्ज पूरग्रस्त निधीची मागणीनवी दिल्ली ः बिहारमध्ये येऊन गेलेल्या...
कर्जमाफीवरून पंजाबमध्ये अारोप-...चंडीगड, पंजाब ः पंजाबमध्ये शेतकरी...
सुधारित पद्धतीमुळे मका पिकात फायदा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
योग्य व्यवस्थापनातून हरभरा उत्पादनात...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...