कृषी विभागाने केली यवतमाळ जिल्ह्यात पिकांची पाहणी

Yavatmal
Yavatmal
यवतमाळ ः करपलेला खरीप या मालिकेची दखल घेत कृषी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना कीडरोग निवारण तसेच पीक व्यवस्थापनाविषयी सल्ला दिला.   
‘अॅग्रोवन’ने दोन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पावसाअभावी पिके संकटात आल्याविषयी ‘करपलेला खरीप’ मालिकेतून स्थिती मांडली होती. त्यानंतर खडबडून जागे होत शासकीय यंत्रणेकडून संबंधीत शेतकऱ्यांना संपर्क साधण्यात आला. त्यानंतर महागाव तालुक्‍यातील खडका येथील एका शेतकऱ्याच्या शेतात पीक व्यवस्थापनविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. कृषी विद्यापीठाने कीडरोग निवारणासाठी शिफारस केलेल्या किटकनाशकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, डॉ. सी.यू.पाटील, तालुका कृषी अधिकारी आर. डी. रणवीर यांची यावेळी उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com