Agriculture stories in Marathi, agrowon cultivation of mustard | Agrowon

प्रश्न तुमचा, उत्तर तज्ज्ञांचे : मोहरी लागवड
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

प्रश्न : मोहरी लागवड कशी करावी?

प्रश्न : मोहरी लागवड कशी करावी?

उत्तर : मोहरी लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीची निवड करावी. एसीएन- शताब्दी (एसीएन- ९) या जातीचे प्रति हेक्‍टरी ८ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. यात तेलाचे प्रमाण ३२ ते ४० टक्के असते. पुसा बोल्ड या जातीचे हेक्टरी ७ ते ११ क्विंटल उत्पादन मिळते. प्रति हेक्‍टरी पाच किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. पेरणी ऑक्‍टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. पेरणी ४५ सें.मी. बाय १५ सें.मी. अंतराने करावी. बियाणे आकाराने लहान असल्यामुळे मोहरीच्या आकाराची वाळू सम प्रमाणात मिसळून नंतर पेरणी करावी, त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात सारखे पडण्यास मदत होते.बियाणे तीन ते चार सें.मी. खोल ओलित पडेल अशा बेताने पेरावे. बियाणे जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. मोहरीच्या पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वाफसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत. पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. निश्‍चित ओलिताची सोय असल्यास हेक्‍टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. त्यापैकी पेरणीच्या वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व उरलेली अर्धी नत्राची मात्रा पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिल्या ओलिताच्या वेळी द्यावी. निश्‍चित ओलिताची सोय असल्यास उगवणीनंतर २५ दिवसांच्या अंतराने ओलिताच्या तीन पाळ्या द्याव्यात. दोनच ओलिताच्या पाळ्या देणे शक्‍य असल्यास पेरणीनंतर एक महिन्याने पहिले व पीक फुलांवर असताना दुसरे ओलित करावे. एकच ओलित करणे शक्‍य असल्यास पीक फुलांवर असताना ओलित करावे. संपर्क : ०७२४-२२५९२६२ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...