कॉर्पोरेट फार्मिंग नव्हे; समूहशेती हेच भविष्य

कॉर्पोरेट फार्मिंग नव्हे; समूहशेती हेच भविष्य
कॉर्पोरेट फार्मिंग नव्हे; समूहशेती हेच भविष्य

शेतकऱ्यांच्या समूहशक्तीची वज्रमूठ घट्ट बांधून स्थापन झालेल्या नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने भारतातील पहिल्या क्रमांकाची द्राक्ष निर्यातदार कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. तसेच, फळे व भाजीपाल्याच्या क्षेत्रात पेरणीपासून ते ग्राहकांना थेट विक्रीपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी या कंपनीने विकसित केली आहे. शेतमाल प्रक्रियेच्या क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीस तोड असे जागतिक दर्जाचे काम या कंपनीने उभे केले आहे. 

`सह्याद्री`ने आज आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांसमोर गटशेतीचं, समूहशेतीचं एक शाश्वत मॉडेल आम्ही ठेवलं आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं आव्हान आम्ही पेललं आहे. अर्थात हा प्रवास साधा-सोपा नव्हता. मोठ्या संघर्षातून, खाच-खळग्यातून आम्ही वाटचाल केली. मी १९९६ मध्ये व्याजाने पैसे घेऊन शेती व्यवसायात उतरलो होतो. राहुरीच्या कृषी विद्यापीठातून एमटेक केल्यानंतर शेतीत हजार समस्या असूनही शेतीतच राहण्याचा निर्णय घेतला. शेतीआधारित व्यवसायातच करियर करायचं असं पक्कं ठरवलं होतं. सुरवातीच्या टप्प्यात आपटी बसली. दुधासाठी जनावरांचा गोठा सुरू केला. पण डेअरीत कर्जबाजारी झालो. डोक्यावर ७०-७५ लाखांचं कर्ज झालं. पण डोक्यात सकारात्मक विचार होते. एका समस्येतून सुटण्यासाठी उपायांचा शोध घेत प्रयत्नांची शर्थ केली तर पुन्हा तिथं समस्या दत्त म्हणून हजर असायची. पण मी जिद्द सोडली नाही.  गोठ्यातील शेण विकले, गोमूत्र विकून पाहिले, गांडूळखत विक्रीचा प्रयोग केला. डेअरी बंद पडल्यावर तीच बंद यंत्रे कोल्डस्टोअरला वापरली. म्हणजे ही व्यावसायिक चिकाटी मी सतत जागी ठेवली. अर्थात ते माझ्या एकट्याचे श्रेय कधीच नव्हते. माझ्या मित्रांची आणि माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या शेतकऱ्यांची ही किमया आहे. बघा ना आता २०११ ला केवळ १० शेतकऱ्यांना घेऊन आम्ही सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्यावेळी केवळ चार कंटेनर द्राक्षाची निर्यात आम्ही केली होती. आज आमच्या सोबत १०४१ शेतकरी जोडले गेले आहेत. (अधिक वाचा ॲग्रोवन दिवाळी अंकात) याशिवाय.... संकल्पनात्मक लेख

  •  टोळीराज्य आणि बळी : अतुल देऊळगावकर 
  •  शेतीचं ‘इंटेलिजंट’ भविष्य : सम्राट फडणीस
  •  प्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी : सतीश कुलकर्णी
  •  जीएम तंत्रज्ञानाचे अडखळलेले पाऊल : डॉ. सी. डी. मायी
  •  मॉन्सूनचे भवितव्य : डॉ. रंजन केळकर
  •  कॉर्पोरेट फार्मिंग आणि रोबोट युगाची नांदी : मनोज कापडे  
  • अनुभव 

  • कोरडवाहू दुष्टचक्र आणि माझे म्हशीपालनाचे प्रयोग : महारुद्र मंगनाळे
  • धांडोळा

  • भविष्याच्या पोटात शेतकऱ्यांसाठी अमाप संधी : राजेंद्र जाधव   
  • भविष्यातली शेती असावी पर्यावरण अनुकूल : डॉ. नीलेश हेडा   
  • ग्रामीण भारतासाठी अलीबाबाची गुहा : उदय अ. देशमुख   
  • पर्माकल्चर...एक आनंदी प्रयोग : डॉ. मयूरा बिजले  
  • मुलाखती 

  • कॉर्पोरेट फार्मिंग नव्हे; समूह शेती हेच भविष्य : विलास शिंदे  
  • इनोव्हेशन हीच भविष्याची गुरुकिल्ली :  प्रा. अनिल गुप्ता  
  • ललित 

  • कथा 
  • नवस : द. ता. भोसले   
  • लाल सावट : सुभाष किन्होळकर  
  • ललित लेख 

  • व्हिलेज डायरी : आकाश चटके   
  • आठवणीतली दिवाळी - कल्पना दुधाळ  
  • तुमी मॅडम कशाला झाल्या कायनू? : भाऊसाहेब चासकर  
  • माझ्या सिनेमाची गोष्ट : राजकुमार तांगडे
  • कविता

  • व्यंग्यचित्रे
  • राशिभविष्य
  • ​(अंक सर्वत्र उपलब्ध, विक्रेत्याकडे संपर्क साधावा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com