जळगाव जिल्ह्याला ठिबक संचासाठी ४५ कोटी अनुदान

drip
drip

जळगाव : जिल्ह्यातील ठिबक व तुषार सिंचन संच अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून ४५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्हा नियोजन समितीने तत्परता दाखवून आपला तीन कोटी ६८ लाख रुपये हिस्सा दिल्याने हे अनुदान प्राप्त होऊ शकले आहे.  जिल्हाधिकारी व कृषी विभाग यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाहीसंबंधी सूचना दिल्या होत्या. तसेच पालकमंत्र्यांपर्यंतही हा विषय पोचला होता. परिणामी हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने आपला हिस्सा तातडीने जमा केला.

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत आठ कोटी रुपये अनुदान यंदा अधिक मिळाले आहे. मागील वर्षी ३७ कोटी रुपये अनुदान मिळाले होते. त्यातून ४१३ तुषार सिंचन संचासाठी व १० हजार ५३१ हेक्‍टरवरील २८७ ठिबक संचासाठी अनुदान दिले होते. ठिबक व तुषार सिंचनाच्या अनुदानाची वर्गवारी करून त्यासंबंधीचे वितरण तालुका स्तरावर कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे. पात्र लाभार्थींना ते तातडीने वितरीत केले जावे, असे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यात नोंदणीकृत ठिबक, तुषार सिंचन उत्पादक कंपन्यांच्या वितरक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यासाठी थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती, परंतु या मदतीत नोंदणी करण्यापासून अनेक वितरक वंचित राहिल्याने नोंदणी पुन्हा सुरूच ठेवण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com