Agriculture stories in Marathi, agrowon ,Hopper pest and anthracnose disease control in mango | Agrowon

आंब्यावरील तुडतुडे, करपा रोगाचे नियंत्रण
डॉ. आनंद नरंगलकर, डॉ. अंबरीश सणस
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

सद्यःस्थितीत पावसाने उघडीप दिलेल्या भागात तापमान वाढ झाल्यामुळे सर्वत्र आंब्यावर मोठ्या प्रमाणावर पालवी येण्याची शक्‍यता आहे. ढगाळ वातावरण तसेच कमाल तापमानात वाढ होत असल्यामुळे आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. तुडतुडे पानांवर, तसेच खोडाच्या भेगांमध्ये सुप्तावस्थेत असतात. सध्या पोषक हवामान निर्माण होत असल्याने प्रादुर्भाव होऊ शकतो. 

सद्यःस्थितीत पावसाने उघडीप दिलेल्या भागात तापमान वाढ झाल्यामुळे सर्वत्र आंब्यावर मोठ्या प्रमाणावर पालवी येण्याची शक्‍यता आहे. ढगाळ वातावरण तसेच कमाल तापमानात वाढ होत असल्यामुळे आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. तुडतुडे पानांवर, तसेच खोडाच्या भेगांमध्ये सुप्तावस्थेत असतात. सध्या पोषक हवामान निर्माण होत असल्याने प्रादुर्भाव होऊ शकतो. 

प्रादुर्भाव ः 
    पिले व प्रौढ कोवळ्या पालवीमधून, मोहोरामधून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात. परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते. पिले तसेच मोठे तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकटपदार्थ (खार) बाहेर टाकतात. हा चिकट पदार्थ आंब्याच्या पानावर तसेच झाडाखालील जमिनीवर पडतो. त्यावर काळ्या रंगाच्या कॅप्नोडीयम बुरशीची वाढ होते. पाने काळी पडतात, त्यामुळे झाडाच्या अन्न बनविण्याच्या क्रियेत अडथळा येऊन त्याचा झाडाच्या वाढीवर तसेच फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. 

नियंत्रण 

  • बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्याची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करून तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच कीटकनाशकांची फवारणी करावी.
  •  कीटकनाशके फवारणी करतेवेळी त्यामध्ये योग्य प्रमाणात सर्फेक्टंटचा वापर करावा. 

कीटकनाशकांचा वापर ः 
१) पहिली फवारणी ः (प्रतिलिटर पाणी)

  • पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही)  ०.९ मि.लि.  
  •  फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटींवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते. 
  •  फवारणी पूर्ण झाड, खोड, फांद्या तसेच बागेलगत असलेल्या रायवळ आंब्याच्या झाडांवरही करावी. 

२) दुसरी फवारणी (बोंगे फुटताना) 
    लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.

बुरशीजन्य करपा रोग नियंत्रण

रोगकारक बुरशी ः कोलेटोट्रीकम ग्लोईओस्पोरिआॅइडस

 लक्षणे ः 

  • पावसाळी वातावरण झाल्यास प्रादुर्भाव दिसतो. 
  • कोवळ्या पानांवर करड्या तपकिरी रंगाचे खोलगट आणि पिवळसर कडा असलेले डाग पडून वाढ खुंटते. 
  • पानावर चट्टे पडतात, पाने करपल्यासारखी दिसतात.
  •  मोहरावर बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास तांबूस डाग पडून मोहोर वाळतो.

नियंत्रण ः 
    कार्बेन्डाझीम (१२ टक्के)  अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) संयुक्त बुरशीनाशक- १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी
 
संपर्क ः डॉ. आनंद नरंगलकर- ७०४५३७४१०६
(कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

इतर अॅग्रोगाईड
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी...सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी...
तुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १...
द्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजनासध्या द्राक्षबागेतील वेली या वाढीच्या विविध...
पीक व्यवस्थापन सल्लारब्बी ज्वारी ः पीक उगवणीनंतर ८ ते १०...
जिरायती गहू लागवडीतील तंत्रेजिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरअखेर ते...
भविष्यातील औद्योगिक पीक ठरण्याची ‘...कित्येक दशकांपासून समशीतोष्ण देशांमध्ये साखर...
कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक...पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे...
फळबागेत आच्छादन, हलकी छाटणी आवश्यक...फळबागेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक...
स्टेम गर्डलर बीटलसाठी एकात्मिक कीड...सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान...
कांदा पिकासाठी अवस्थानुरूप सल्लासध्या रब्बी कांद्याची रोपे रोपवाटिकेत आहेत, तर...