मुक्तसंचार गोठ्याचे फायदे

मुक्तसंचार गोठ्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले रहाते.
मुक्तसंचार गोठ्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले रहाते.

मुक्तसंचार गोठ्यामध्ये गाई, म्हशी मुक्तपणे फिरतात. त्यामुळे मानसिक ताणाखाली राहत नाहीत. गरजेनुसार व आवडीनुसार चारा, पाणी पितात. त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात. जनावरांना व्यायाम मिळतो. प्रकृती निरोगी राहते. भूक, आहारक्षमता वाढते. स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते.

  • थंडीच्या वेळी गायी, म्हशी अधिक वेळ चारा खातात, अधिक वेळ बसून 
  • विश्रांती घेतात. रवंथ करतात. त्यामुळे अन्नद्रव्यांची पाचकता वाढते. दूध उत्पादनासाठी अन्नद्रव्ये कार्यक्षमतेने वापरली जातात. वासरांची जलद वाढ होते.
  • मजूर व चारा व्यवस्थापनावरील खर्च कमी होतो. निर्जंतुकीकरण, साफ सफाई करण्यासाठी वेळ कमी लागतो.
  • गोठ्यामध्ये सोयीनुसार फेरबदल करता येतात. असे गोठे बहुउद्देशीय असतात. किरकोळ बदलासह सर्व प्रकारच्या जनावरांसाठी सर्व हंगामात उपयोगी येतात. विस्तार करण्यास सुलभ असतात.
  • गाई, म्हशी गोठ्यामध्ये मुक्तपणे संचार करत असल्यामुळे मानसिक ताणाखाली राहात नाहीत. गरजेनुसार व आवडीनुसार चारा, पाणी, क्षार मिश्रण खातात. त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात.
  • मुक्त संचारामुळे जनावरांना व्यायाम मिळतो. प्रकृती निरोगी राहते. भूक, आहारक्षमता वाढते. पायाच्या वाढलेल्या नख्या छाटाव्या लागत नाहीत. स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते. माजावरील गाय, म्हैस चटकन ओळखता येते.
  • क्षमतेपेक्षा १० ते १५ टक्के अधिक जनावरे ठराविक कालावधीकरिता सामावू शकतात.
  • बांधकामासाठी खर्च कमी लागतो. नुकसानीचा धोका कमी असतो.
  • या गोठा पद्धतीमध्ये जनावरांच्या शरीरातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. गायी अधिक पाणी पितात.
  • संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, पारंपरिक बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत मुक्त गोठ्यामध्ये जोपासलेल्या कालवडींचा वाढीचा दर, वाढीच्या काळात जोपासण्याचा खर्च, दुभत्या गाई, म्हशीचे दूधउत्पादन व दुधाच्या गुणवत्तेमध्ये (स्निग्ध व अस्निग्ध पदार्थ) सुधारणा दिसून आली. मुक्त हवेशीर गोठ्यामध्ये उन्हाळी हंगामात म्हशीच्या कालवडीला प्रखर उष्णतेपासून संरक्षण मिळाल्यामुळे कालवडीचे प्रथम विताचे वय १०० दिवसांनी कमी व दुग्धोत्पादन १५० लिटरने वाढलेले दिसून आले आहे.
  • संपर्क : डॉ. गणेश गादेगावकर : ९८६९१५८७६० (पशुपोषणशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com