दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी मुळे, पाने कार्यक्षम हवीत

vinay supe
vinay supe

नाशिक : कीडनाशके व रसायनांचा अनियंत्रित वापर केला तर डाळिंब शेतीचे नुकसान होऊ शकते. दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी झाडाची मुळे व पाने कार्यक्षम असणे हे जास्त महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विनय सुपे यांनी केले.  नाशिक येथे  आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७ मध्ये रविवारी (ता. ३) ‘दर्जेदार डाळिंब उत्पादनाचे सुधारित तंत्रज्ञान आणि तेलकट डाग नियंत्रण’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. सुपे बोलत होते.  सहायक व्यवस्थापक रुपेश रहाणे यांनी स्वागत केले. नाशिक जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश उगले यांनी सूत्रसंचालन केले.  

डॉ. विनय सुपे म्हणाले की,

  • एका एकरात किती उत्पादन मिळते, त्यापेक्षा दर्जेदार उत्पादन किती मिळते हे महत्त्वाचे.
  • जमिनीचे आरोग्य जमिनीतील सूक्ष्मजीवांवर अवलंबून असते.
  • रसायनांच्या बेसुमार व अनियंत्रित वापरामुळे लाभदायक सूक्ष्मजीवांवर परिणाम होऊ शकतो.
  • चुकीच्या व्यवस्थापनामुळे झाडाचे नुकसान होते. ते लवकर भरून काढता येत नाही.
  • डाळिंब उत्पादन घेताना निश्‍चित उद्दिष्ट समोर ठेवावे.
  • झाडाच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्पादन घेऊ नका. 
  • शास्त्र समजून न घेता काम करणाऱ्या सल्लागारांमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
  • आधी अभ्यास करा अन्‌ मग प्रामाणिक सल्ला द्या.
  • झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यावर भर द्या.
  • अनावश्‍यक कामे करू नका. 
  • मातीच्या परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. 
  • मुळं कार्यक्षम असतील तर झाडात प्रतिकारक्षमता सहज येते.
  • झाड जास्तीत जास्त मोठं असावे. त्याचा डेरा मोठा असावा.
  • दोन झाडातील अंतर खूप कमी ठेवू नका.
  • झाडाची गरज, हंगामाची स्थिती त्यानुसार पाणी व्यवस्थापन करावे.
  • ठिबक सिंचनाचा ड्रीपर हा झाडाच्या सावलीत न ठेवता सावलीच्या बाहेर उन्हात असावा.
  • पाणी कमी असले तरी चालेल, मात्र शेतात वाफसा अधिक असावा.
  • मुळं आणि पाणी उन्हात असेल तर बाष्पीभवन सुरू राहते. त्यामुळे निमॅटोड नियंत्रणात राहतो.
  • झाडाची प्रतिकारक्षमता टिकवायची असेल तर योग्य बहार नियोजन हवे.
  • छाटणीपूर्वी बागेला पुरेशी विश्रांती द्यावी. या काळात पुरेसे अन्नद्रव्य पुरवावे.
  • पानगळ ही ३० ते ४० टक्के करून मगच छाटणी करावी. १०० टक्के पानगळ करू नये.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com