Agriculture stories in Marathi, agrowon news regarding rural area start up | Agrowon

गावातील ‘स्टार्टअप’ना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी
सलील उरुणकर
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

राज्यातील गाव-जिल्हा पातळीवरील स्टार्टअपना आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील तरुणांच्या कल्पकतेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी राज्य सरकार ‘स्टार्टअप सप्ताह’ साजरा करेल आणि त्यातील निवडक स्टार्टअपना थेट जर्मनीतील हॅनोव्हरच्या स्पर्धेमध्ये पाठविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर यांनी दिली. 

राज्यातील गाव-जिल्हा पातळीवरील स्टार्टअपना आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील तरुणांच्या कल्पकतेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी राज्य सरकार ‘स्टार्टअप सप्ताह’ साजरा करेल आणि त्यातील निवडक स्टार्टअपना थेट जर्मनीतील हॅनोव्हरच्या स्पर्धेमध्ये पाठविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर यांनी दिली. 

स्टार्टअप धोरणाचे वेगळेपण काय आहे?
आपल्याकडे संकल्पना असतात; पण त्या मांडण्यासाठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नसते. केवळ करसवलती किंवा आर्थिक साह्यतेपुरते मर्यादित न राहता इनोव्हेशन म्हणजे नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना देणारे हे एकमेव धोरण आहे. बौद्धिक संपदा हक्क आणि त्याला पूरक असे हे धोरण पहिल्यांदाच तयार करण्यात आले आहे. ‘पेटंट’ दाखल करण्यासाठी देण्यात येणारी मदत ही फक्त नवउद्योजकांसाठी नाही, तर इनोव्हेशनला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. 

नवउद्योजकांसाठी कोणत्या संधी आहेत?
राज्यात दहा हजार स्टार्टअप स्थापन करण्याचे उद्दिष्ट धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी पूरक परिसंस्थाही निर्माण केली जात आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमानंतर आता स्टार्टअप सप्ताहात जिल्हानिहाय स्पर्धा होतील. या स्पर्धांतर्गत निवड झालेल्या स्टार्टअपना विभागीय आणि राज्य पातळीवर निवडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण आणि मुंबई अशा सहा विभागांतील स्टार्टअपना उत्तेजन देण्यात येणार आहे. या स्टार्टअपची निवड संपूर्णतः गुणवत्तेवर आधारित असेल. राज्य सरकारतर्फे सचिव स्तरावरचे अधिकारी, तसेच बॅंक आणि उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधी या स्टार्टअपची निवड करतील. राज्य पातळीवर निवड झालेल्या पाच स्टार्टअपना आंतरराष्ट्रीय पातळीवर हॅनोव्हर येथे २४ एप्रिल रोजी होणाऱ्या स्टार्टअप प्रदर्शनात सादरीकरण करण्याची संधी दिली जाईल. 

तरुणाईपुढील सध्याची प्रमुख आव्हाने कोणती? सरकार काय करत आहे?
सध्याच्या काळात सर्व्हिस म्हणजे सेवा क्षेत्राला महत्त्व आले असून, त्यात अमर्याद संधी आहेत; मात्र त्यासाठी त्यांना पूरक पायाभूत सुविधा उपलब्ध होणे हे मोठे आव्हान आहे. या सुविधा उपलब्ध करून देण्याचा एक भाग म्हणून राज्यात १५ इन्क्‍युबेशन सेंटरची निर्मिती सुरू आहे. या इन्क्‍युबेटर्सद्वारे नवउद्योजक आणि बॅंक व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी भेटणार आहेत. वीजपुरवठ्यापासून इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीपर्यंत आणि व्यवसायासाठी किमान जागा पुरविण्याचे काम सरकार करत आहे.

इतर ग्रामविकास
स्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...
विकासातच नव्हे, तर ‘स्मार्टकामा’तही...उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर)...
पिंगोरीची दुष्काळावर मात, भाजीपाला... अगदी २०१२ पर्यंत दुष्काळी असलेल्या पिंगोरी...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
अंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
एकीच्या बळावर मावलगाव होतेय सुजलाम...लातूर जिल्ह्यातील मावलगाव (ता. अहमदपूर) गावाने...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
पाणी, स्वच्छता, विजेसह कुरुंदवाडीत...हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने...
महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...
कृष्णाकाठच्या वडगाव हवेलीने हळदीतून...कृष्णाकाठ परिसरातील बागायती गाव म्हणून कऱ्हाड...
सांडपाण्यावर जगवणार दोन हजार झाडेनगर : डोंगरगण (जि. नगर) येथील ग्रामस्थ दोन हजार...
माळीवाड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा... पाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (...
प्रयोगशील शेतीला शंकरवाडीने दिला दुग्ध...लातूर जिल्ह्यातील चापोली गट ग्रामपंचायतीमधील...
पेढा, बासुंदी, खव्यासाठी प्रसिद्ध...यवतमाळ जिल्हयातील वटबोरी हे दुग्धव्यवसाय व...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
विकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...
एकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...
राज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...