Agriculture stories in Marathi, agrowon news regarding watershed development | Agrowon

२०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त !
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

राज्यातील सर्व गावांना पाण्याबाबत स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार जलयुक्त शिवार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. २०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार मोहिमेंतर्गत आतापर्यंत ११ हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी मेपर्यंत आणखी पाच हजार गावांचा समावेश करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत ‘जल संवर्धन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत  होते.

राज्यातील सर्व गावांना पाण्याबाबत स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार जलयुक्त शिवार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. २०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार मोहिमेंतर्गत आतापर्यंत ११ हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी मेपर्यंत आणखी पाच हजार गावांचा समावेश करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत ‘जल संवर्धन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत  होते.

‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ पासून जलयुक्त शिवार ही योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत पूर्वीचे जल संवर्धनाचे व वाढीचे सर्व प्रकल्प एकत्र आणण्यात आले. त्याअंतर्गत २०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत गावांची निवड करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात येत असल्याचे डवले यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘राज्यातील पाण्याच्या वापराचा अभ्यास केल्यास ८० टक्के पाण्याचा शेतीसाठी, १५ टक्के पाण्याचा उद्योगांसाठी व पाच टक्के पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो. या पाण्याच्या वापराच्या पद्धतीनुसार अधिकाधिक गावांना पाण्याच्या बाबतीत कसे स्वयंपूर्ण करता येईल त्याबाबत विचार करण्यात आला आहे.’

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...