तोट्यातील कारखाने फायद्यात कसे आणाल?

ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध नसेल तर साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत. कारखान्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो व खर्च वाढतात. त्यामुळे बहुतेक साखर कारखाने तोट्यात जात आहेत. कारखाने अडचणीत येण्यामागचे साखरेचे कमी दर हेही एक प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत नेमके काय उपाय करायला हवेत, याचा घेतलेला हा वेध ...
संपादकीय
संपादकीय

महाराष्ट्र व देशातील साखर कारखान्यांना सध्या फार मोठी समस्या आहे, ती म्हणजे बाजारपेठेतील साखरेची किंमत दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, कारखाना चालविण्यास लागणारे इतर खर्च कसे भागवायचे व खर्च भागवून शेतकऱ्यांना एफआरपी कशी द्यायची. माझ्या अभ्यासातून कारखाना चालविण्याचे विविध प्रकारच्या खर्चाची टक्केवारी सध्याच्या स्थितीत तक्ता क्र. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे आहे. ऊस मटेरियल खर्च  :   टक्के एफआरपी  :  ६५ ते ६६ ऊसतोडणी, वाहतूक व इतर कर  :  १७ ते १८ पगार खर्च  :   ८ ते १० उत्पादन व इतर खर्च  :  ७ ते ८ व्याज खर्च  :  १ ते २

तक्ता क्र. १ मध्ये दिलेला खर्च कसा भागवायचा व शेतकऱ्यांना एफआरपी कशी द्यायची, ही फार मोठी समस्या सध्याच्या घडीला सर्वच कारखान्यांपुढे आहे. त्यानंतर ऊस पिकाची उपलब्धताही आणखी मोठी समस्या मराठवाड्यातील कारखान्यांचा भासते. ऊस मुबलक उपलब्ध नसेल तर कारखाने पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत. त्यामुळे कारखान्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो व खर्च वाढतात. जो स्थिर खर्च (फिक्‍सड्‌ कॉस्ट) आहे, तो चालू राहतो. त्यामुळे बहुतेक साखर कारखाने तोट्यात जातात.

आजमितीला बोटावर मोजण्याइतके साखर कारखाने फायद्यात आहेत, तर बहुतांश साखर कारखाने तोट्यात आहेत. दरवर्षी पर्जन्यमान नेहमीसारखे नसते, त्यामुळे उसाची मागणी व पुरवठा यात तफावत होते. साखर कारखाने हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. ते जर तोट्यात जाऊन आजारी झाले, तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडू शकते; कारण ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या संधी व शेतकऱ्यांचे आर्थिक गणित साखर कारखान्यांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीतून साखर कारखान्यांनी वर येण्यासाठी काही उपाययोजना सुचवाव्या वाटतात. त्या अशा आहेत...    - सरकारने धोरणात्मक बदल करून, नवीन कारखान्यांना परवाने देऊ नये.    - साखरेची आधारभूत किंमत वाढवायला हवी.    - साखर कारखान्यांचे जे कर्मचारी निवृतीच्या (रिटायरमेंट) आसपास आहेत, त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन नवीन कर्मचारी भरू नयेत.   -  साखर कारखान्यांनी आपल्या यंत्रसामग्रीचे मॉडिफिकेश करून घ्यावे. आज बहुतांशी कारखाने जुन्या यंत्रसामग्रीवर चालविले जातात, त्यामुळे देखभाल वा दुरुस्ती खर्च (मेंटेनन्स) प्रचंड प्रमाणात वाढून याचा परिणाम उत्पादनावर होतो; परिणामी इतर खर्चही वाढतात.   -  कारखान्यांनी आताच्या काळात खर्चात काटकसर करणे गरजेचे आहे. स्वतःची गंगाजळी निर्माण करून पुढील समस्येवर मात करण्याची मानसिकता तयार करावी लागेल.   -  साखर कारखान्यांची साखर उत्पादनाबरोबर सौरऊर्जा प्रकल्प राबविणे गरजेचे दिसते. सौरऊर्जा प्रकल्प राबविल्यास कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन एनटीपीसी व इतर कंपन्या ही वीज वाढीव किमतीत खरेदी करतात. या प्रोजेक्‍टचा उत्पादन खर्च शून्य असून, यात नफा चांगला आहे.   -  कारखान्यांनी जिथे शक्‍य असेल तिथे एलईडी ट्यूब व बल्बचा वापर करावा; कारण सीझनमध्ये लागणारी वीज ही कारखान्यांच्या बाहेर एक्‍स्पोर्ट करता येईल व विजेचा वापर कमी होईल.  -   प्रत्येक कारखान्यांनी को जनरेशन प्रकल्प जरूर बसवावेत, जेणेकरून वीज उत्पादित करून, एक्‍स्पोर्टदेखील करता येईल.  -  दर महिन्याला बजेटरी कंट्रोल सिस्टीम व नफा रिपोर्टिंग चालू करावे.  -   खर्चाचे बजेट दर महिन्याला आखून त्याबरोबर प्रत्यक्ष खर्च तपासावेत व फरक आल्यास त्या खर्चावर नियंत्रण आणावे.  -   दर महिन्याला एमआयएस रिर्पोटिंग मॅनेजमेंटला सादर करावे. ही पद्धत अवलंबावी. या पद्धतीत दर महिन्याला प्रॉफिट रिपोर्ट होतो व आपण कुठे आहोत हे समजते.  -   जर ऊस मुबलक प्रमाणात असेल तर प्लान्ट कपॅसिटी वाढवावी, यामुळे खर्चावर नियंत्रण येईल व उत्पादन वाढेल.   -  साखर कारखाने पूर्ण वर्ष चालू नसतात, तर शुगरबीटच्या उत्पादन व वापरामुळे प्लान्ट कपॅसिटीचा पूर्ण वापर होऊन कारखाने वर्षभर चालू राहतील. यामुळे कारखाने फायद्यात यायला मदत होईल.  -   साखर कारखान्यांनी कॉस्ट ऑडिट (लेखा परीक्षण) जरूर करून घ्यावे. यामध्ये कारखान्यांना होणारे खर्च व तो कसे कमी करता येतील याचे विवेचन दिलेले असते. यामुळे कारखान्यांना याचा फायदाच होईल.

दीपक मारणे  ः ९८२२२६३०५२ (लेखक कॉस्ट अकाउटंट आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com