अन्नप्रक्रिया उद्योगासाठीचे वैश्‍विक व्यासपीठ

‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन ३ ते ५ नोव्हेंबर २०१७ या दरम्यान नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. भारतीय आणि जागतिक स्तरावरील उद्योजक-व्यावसायिक यांच्यामधील भागीदारीतून देशातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. अन्नप्रक्रिया क्षेत्रातील जगभरातील उद्योजकांना भारताशी जोडून घेण्याची सुवर्णसंधी या कार्यक्रमाद्वारे लाभणार आहे.
संपादकीय
संपादकीय

‘वर्ल्ड फूड इंडिया’ (डब्लूएफआय) या कार्यक्रमाचे आयोजन अन्नप्रक्रिया मंत्रालय, भारत सरकारतर्फे करण्यात येत असून ‘कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (सीआयआय) यात भागीदार आहे. या कार्यक्रमाद्वारे उत्पादक, प्रक्रिया उद्योजक, गुंतवणूकदार, धोरणकर्ते यांना एकत्र आणून अन्नप्रक्रिया उद्योगाच्या जागतिक विकासासाठीचे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. भारतातील मोठी बाजारपेठ लक्षात घेता गुंतवणूकदार, उद्योजक, व्यापारी यांना आपल्या उत्पादनाची निर्मिती त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देता येईल. भारतात अन्नप्रक्रिया उद्योगाचा विकास साधून येथील उत्पादक शेतकरी यांना अधिक मिळकत, युवकांना रोजगार-उद्योग-व्यवसायात उतरण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, हाही या कार्यक्रमाचा हेतू आहे.  

डब्लूएफआय म्हणजे संधीच संधी :       अन्नप्रक्रिया उद्योगाबाबतचे धोरण जाणून घेणे.        बिझनेस-टू गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट अशा थेट चर्चेमधून समस्या मार्गी लावल्या जातीस.       अन्नप्रक्रिया व वितरणसाखळी यातील प्रकल्पनिर्मिती गुंतवणुकीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.      अन्नप्रक्रिया क्षेत्रातील पारंपरिक प्रक्रिया प्रकल्पांतील भारताच्या ताकदीची गुंतवणूकदारांना जाणीव होईल.      शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रगतिशील शेतकरी व मोठ्या पुरवठादारांना या क्षेत्रातील जागतिक संधीची विस्तृत माहिती मिळेल.      भारतातील अन्नप्रक्रिया उद्योगातील किरकोळ बाजार (रिटेल मार्केट) समजून घेता येईल.  

आयोजकांबाबत थोडक्‍यात :  अन्नप्रक्रिया मंत्रालय, भारत सरकार : भारतातील अन्नप्रक्रिया, तंत्रज्ञान व यंत्रनिर्मिती उद्योगातील धोरणनिर्मिती, संशोधन विकास, उद्योगांना मान्यता आदींबाबतची जबाबदारी या मंत्रालयावर आहे. भारतात या क्षेत्रात देशातील आणि विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून गती देण्याबाबत हे मंत्रालय कार्यरत असते.      भारत उद्योग महासंघ (सीआयआय) : भारतातील उद्योगविश्‍वाच्या भरभराटीसाठीचे वातावरण निर्मितीसाठी ही संस्था कार्य करते. योग्य धोरणनिर्मिती, उपाय व त्यांच्या अंमलबजावणीबाबत सरकारला मार्गदर्शन करते.   

दृष्टिक्षेपात भारत :

जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी एक अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जाते. देशात थेट परकीय गुंतवणूक वाढत आहे. २०१६ -१७ मध्ये भारतात ६० अब्ज अमेरिकन डॉलर्स परकीय गुंतवणूक झाली होती. त्यात ७२७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक अन्नप्रक्रिया उद्योगक्षेत्रात झाली. गतवर्षीच्या तुलनेत ही गुंतवणूक ४० टक्के अधिक आहे.  गुंतवणुकीबाबत पसंतीच्या क्रमात भारत, अमेरिका व चीननंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्‍स, ग्लोबल लॉजिस्टिक इंडेक्‍स तसेच गुंतवणूकीशी संबंधित इतर मानांकनातही भारताने जागतिक पातळीवर मोठी प्रगती केली आहे. ‘‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’’याबाबतीत अल्पावधीतच भारत १२ व्या क्रमांकावर पोचला आहे.  अन्नप्रक्रिया उद्योगातील देशाची व्याप्ती पाहता या क्षेत्रात नफा कमविण्याच्या संधीही वेगाने विकसित होत आहेत. अन्नप्रक्रिया क्षेत्रात उच्च गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती करण्याची प्रचंड क्षमता देशात आहे. अन्नप्रक्रिया उद्योगात २०१३ मध्ये ३९.७१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी उलाढाल झाली. २०१८ पर्यंत दरवर्षी ११ टक्‍के सकल वार्षिक वृद्धीदराने ही उलाढाल ६५.५  अमेरिकन डॉलर्स होईल. भारतात अन्नधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी येथील वैविध्यपूर्ण शेतीमाल उत्पादन, अन्नप्रक्रियेस पूरक असे नुकतेच विकसित करण्यात आलेले धोरण, थेट परकीय गुंतवणुकीसाठीचे मुक्त आणि सोयीचे धोरण, पायाभूत सुविधांचा करण्यात आलेला विकास, मोठा ग्राहकवर्ग असलेल्या देशातील लोकांची बदलती खाद्य संस्कृती या सर्व बाबी पाहता जागतिक पातळीवरील कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.    

 वर्ल्ड फूड इंडियामध्ये केंद्र सरकारतर्फे या क्षेत्रात गुंतवणूक, आर्थिक पुरवठा तसेच व्यवसाय स्थापनेसाठी सुलभ धोरणांची माहिती या संमेलनात मिळणे अपेक्षित आहे.      घाऊक व किरकोळ क्षेत्रातील थेड परकीय गुंतवणुकीसंबंधीचे नियम, अटी, नियंत्रणा याबाबत येथे चर्चा केली जाणार आहे. तसेच विक्री साखळीतील महत्त्वाचे मुद्देही या कार्यक्रमाद्वारे चर्चिले जातील.     भारतात कार्यरत बहुराष्ट्रीय व देशी कंपन्यांना अन्नप्रक्रिया क्षेत्रात आलेला अनुभव शेवटच्या सत्रात सांगितला जाणार आहे.  फळे व भाजीपाला  भारतातील वातावरणात विविध फळे भाजीपाल्यांचे उत्पादन होते. तसचे लोकसंख्येने मोठ्या या देशात ग्राहकवर्गही मोठा असल्याने फळे-भाजीपाल्यावर प्रक्रिया करून देशातील मोठ्या बाजारपेठेचा उद्योजकांना फायदा मिळेल.      फळ व भाजीपाला उत्पादन क्षेत्रात भारत जागातील दुसरा सर्वाधिक मोठा देश आहे. जागतिक उत्पादनाच्या १४ टक्के उत्पादन भारतात होते. मात्र त्याचवेळी फळ व भाजीपाल्याची होणारी नासाडीचे प्रमाण भारतात सुमारे ५ ते १८ टक्के इतके आहे. संबंधित मालावर प्रक्रियेच प्रमाण केवळ २ टक्के आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड सधी आहेत.      दुग्धोत्पादन क्षेत्रात भारत जगात अव्वलस्थानी आहे. जागतिक उत्पादनाच्या १९ टक्के दुग्धोत्पादन भारतात होते. भारतीय डेअरी उद्योग हा जगात सर्वाधिक वेगाने (१३ -१५ टक्के) वाढत आहे. मात्र, देशात केवळ ३५ टक्के दुग्ग्धोत्पादनावर प्रक्रिया होते.     

भारतीय कुक्कुटपालन उद्योग हाही एक अत्यंत वेगाने वाढणारे क्षेत्र असून त्यातील अंडी आणि कोंबड्यांचा (ब्रॉयलर) वार्षिक वृद्धीदर अनुक्रमे ५.५७ आणि ११.४४ टक्के आहे. तसेच भारतातील मत्स्योत्पादन १०.८ दशलक्ष टन (जगात दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन) असून जागतिक मत्स्योत्पादनात देशाचा वाटा सहा टक्के आहे. देशातील भौगोलिक परिस्थिती पाहता येथे गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यास मोठा वाव आहे. परंतु, देशात केवळ २० टक्के कोंबडी उत्पादन आणि २५ टक्के माशांवर प्रक्रिया होते. हे प्रमाण खूपच कमी आहे.  

फळे भाजीपाला असो, की अंडी-कोंबडी, मासे यांचे उत्पादन आणि प्रक्रियेतील ही तफावत पाहता देशात यावरील प्रक्रिया उद्योगात वाढ साधून प्रक्रियायुक्त पदार्थ देशांतर्गत बाजारात सर्वदूर तसेच निर्यातीस मोठा वाव आहे. आणि यातील प्रत्येक टप्प्यात उदा. उत्पादन, प्रक्रिया, प्रक्रियेसाठीची यंत्रसामग्री, आर्थिक मदतगार संस्था, सेवा-तांत्रिक माहिती पुरविणाऱ्या संस्था तसेच लहान मोठे उद्योजक यांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. या सर्व पार्श्‍वभूमीवर क्षेत्रनिहाय व्यवसायाचा कलापासून ते प्रक्रिया, तंत्रज्ञान निर्मिती, संशोधन, धोरण व वित्तपुरवठा ग्राहकांच्या बदलता कलापर्यंत ‘वर्ल्ड फूड इंडिया’चा फोकस असणार आहे.

विजयकुमार चोले, सुमेधा जालगावकर   ः ९६८९८८७२३१. (विजयकुमार चोले सातारा मेगा फूड पार्कचे उपाध्यक्ष, तर सुमेधा जालगावकर फुडीसीसच्या संचालिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com