दीड वर्षात शंभरावर रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास

गंगापूर : तालुक्‍यातील आगर कानडगाव (जुने) ते भिवधानोरा रस्त्याची मोजणी करताना उपस्‍थित तहसीलदार चंद्रकांत शेळके व अन्य.
गंगापूर : तालुक्‍यातील आगर कानडगाव (जुने) ते भिवधानोरा रस्त्याची मोजणी करताना उपस्‍थित तहसीलदार चंद्रकांत शेळके व अन्य.

गंगापूर, जि.औरंगाबाद  : तालुक्‍यात अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आलेल्या एकशे दहा रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाकडे तालुक्‍यातील विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार धडक कारवाई राबवून सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्‍न त्वरित निकाली काढण्यात आले आहेत. यात अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शेतरस्ते, शिवरस्ते मोकळे केले असून यात शेतकऱ्यांनीही प्रतिसाद दिला आहे.  शेताकडे जायच्या रस्त्याला खेटून अतिक्रमण वाढल्याने अनेक पिढ्यांपासून शेजारी शेतकऱ्यांमध्ये धुसफूस सुरू होती. अनेक ठिकाणी वादावादी होत होत्या. अनेक भांडणे तर न्यायालयात पोचली. यावर उपाय शोधण्यासाठी प्रशासनाच्या पुढाकाराने तालुक्‍यातील रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्यात आली.

रस्ते झाले मोकळे शेतीची वाटणी करताना चारचौघांच्या मध्यस्थीने शेत देण्याबरोबर त्या शेतातील वहिवाटीसाठी शेतरस्ता दिला जातो. त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असते किंवा नसतेही. हे फक्‍त एकमेकांच्या विश्‍वासार्हतेवर चालते. शेतकऱ्यांचा शेतमाल ने-आण करण्यासाठी शेतशिवारापर्यंत बैलगाडी पोचावी, शेतरस्ते वापरण्यासाठी मिळावेत, यासाठी शासनाने आजही शेतरस्ते, पाणंदरस्ते वापरास ठेवले आहेत. काही वेळी आपापसांतील मतभेद वाद वाढल्याने किरकोळ कारणांवरून या रस्त्यांवर अतिक्रमण होते व या रस्त्यांवर अडवणूक केली जाते. परंतू  अतिक्रमणे हटविल्याने रस्ते मोकळे झाले आहेत.

प्रतिक्रिया... शेताकडे जाणाऱ्या पाऊलवाटा, गाडीवाट व शिवरस्त्यावर लगतच्या शेतकऱ्यांची अतिक्रमणे वाढली होती. लहान शेतकरी अडचणीत होते. अनेक रस्त्यांवरून भांडणे झाली आहेत. एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशा सर्वच रस्त्यांचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत. रस्ते मोकळे करताना गावांचे तलाठी, पोलिस पाटील, तंटामुक्त समिती, पोलिस व गावकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला.  -चंद्रकांत शेळके, तहसीलदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com