Agriculture stories in Marathi, agrowon special story of Amhi Amchya Aarogyasathi NGO, Kurkheda,dist.Gidchiroli | Agrowon

जपतोय आरोग्य, शेती अन् जंगलही...
विनोद इंगोले
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील महिला, बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यावर ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी` या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय शेती, पिकांच्या देशी जातींच्या संवर्धनाबाबत संस्था उपक्रम राबविते. लोकसहभागातून आरोग्य, शेती आणि वनसंवर्धनावर संस्थेचा भर आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील महिला, बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यावर ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी` या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय शेती, पिकांच्या देशी जातींच्या संवर्धनाबाबत संस्था उपक्रम राबविते. लोकसहभागातून आरोग्य, शेती आणि वनसंवर्धनावर संस्थेचा भर आहे.

कुरखेडा (जि. गडचिरोली) येथे मुख्यालय असलेल्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी` या संस्थेने गेल्या ३५ वर्षांपासून शेती, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवले आहे. डॉ. सतीश गोगुलवार हे मुळचे चंद्रपूरचे. त्यांनी एम.बी.बी.एस.पर्यंतचे शिक्षण नागपुरात पूर्ण केले. त्यांच्या पत्नी शुभदा देशमुख या दोघांनी पुढाकार घेत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी` ही सेवाभावी संस्था स्थापन केली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी देशपातळीवर युवकांच्या संगठनासाठी छात्र युवा संघर्ष वाहिनीची स्थापना केली होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच या संघटनेत डॉ. सतीश आणि शुभदा सहभागी झाले. आंतरजातीय विवाहाचे समर्थन त्यासोबतच हुंडा पद्धतीला विरोध या संघटनेच्या माध्यमातून होत होता. त्यासाठी चळवळही उभारली गेली. यात काम करीत असताना नुसते भाषणच नाही तर समाजासमोर आदर्श आपण उभा करावा याकरिता डॉ. सतीश व शुभदा यांनी १९८२ मध्ये आंतरजातीय विवाह केला. चळवळीत काम करीत असताना तीस वर्षे वयाचा कार्यकर्ता झाल्यानंतर त्याने ग्रामीण भागात जाऊन सेवाकार्य करावे, असा नियम होता. त्यानुसार वडसा देसाईगंज (ता. आरमोरी, जि. गडचिरोली) येथे सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासोबत डॉ. सतीश यांनी काम सुरू केले. रोजगार हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता त्या वेळी चळवळ उभारण्यात आली. लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले. त्याचवेळी (कै.) सुखदेव बाबू उईके यांच्या नेतृत्वात आदिवासींच्या प्रश्‍नांना घेऊन जागृत आदिवासी संघटनादेखील त्या भागात कार्यरत होती. आदिवासी आणि गैर आदिवासींचे प्रश्‍न त्याद्वारे मांडले जात होते. जंगल, जमिनीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी या संघटनेचा पुढाकार होता. या संस्थेच्या सहकार्याने सुरवातीच्या काळात सामाजिक कार्य करण्यावर डॉ. गोगुलवार यांनी भर दिला.
डॉ. गोगुलवार यांनी १९८४ मध्ये कुरखेडा येथे स्थलांतरणाचा निर्णय घेतला. तेथे गेल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी` या संस्थेची नोंदणी केली. जंगल बचाओ, मानव बचाओ, दारूमुक्‍ती आंदोलन त्या वेळी गडचिरोलीत सुरू होते. या सर्व आंदोलनात संस्थेच्या माध्यमातून डॉ. सतीश गोगुलवार आणि संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वैदूंना दिले प्रशिक्षण 

आजही गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये वैदूंच्या माध्यमातून उपचाराची परंपरा आहे. वैदू उपचारासाठी वनौषधींचा उपयोग करतात. आदिवासी एकदम आधुनिक उपचार पद्धती अंगीकारत नाहीत. त्यामुळे वनौषधींच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्या माध्यमातून उपचार पद्धतीवर संस्थेने भर दिला. संस्थेने देशातील सुमारे दोन हजारांवर कार्यकर्त्यांना वनौषधी उपचार पद्धतीचे प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये महिला स्वयंसाह्यता समूहातील सदस्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. वनौषधीच्या उपचाराबाबत जनजागृती वाढावी याकरिता संस्थेने ‘गोंडवाणा की वनौषधींया’ हे हिंदीमध्ये, तर ‘वनौषधी निर्मिती प्रक्रिया’ हे मराठी भाषेत पुस्तक प्रकाशित केले आहे.  

गावातील वनांचे संरक्षण 

वनहक्‍क कायदा २००५ मध्ये अस्तित्वात आला. कोरची तालुक्‍यातील ८५ ग्रामसभांना सामूहिक वनहक्‍क अंतर्गत वनावरचा अधिकार प्राप्त झाला. ग्रामसभा आता गाव परिसरातील वनांचे संरक्षण करतात. त्यातून मिळणाऱ्या वनउपजाच्या विक्रीतून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. कोरची तालुक्‍यातील ८५ ग्रामसभांना हे हक्‍क मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर संस्थेद्वारे प्रयत्न झाले. संस्थेच्या पुढाकारातून त्यासंबंधीची प्रक्रिया झाली. कोरची तालुक्‍यातील सहा गावांमध्ये मागील तीन वर्षांमध्ये शंभर हेक्‍टर क्षेत्रावर बांबू, फळझाडांची लागवड तसेच संवर्धन करण्यात आले. वन व्यवस्थापन आराखडा आणि जैवविविधता नोंदणीसाठी संस्था या गावांना मदत करत आहे.

सेंद्रिय शेतीला दिले प्रोत्साहन
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्‍यातील दोनशे शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात परसबागांची उभारणी करण्यात आली. आदिवासी महिला परसबागेत कुटुंबापुरता सेंद्रिय भाजीपाला उत्पादित करू लागल्या आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संस्थेच्या पुढाकारातून सेंद्रिय शेतीमाल उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. शेती निविष्ठांचा वापर, गांडूळ खत, जैविक कीडनाशक निर्मितीसाठी संस्थेकडून मार्गदर्शन करण्यात येते.  गेल्या पाच वर्षांपासून नागपूर शहरात सेंद्रिय तांदळाला ग्राहक मिळविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

बीजोत्सवाचे आयोजन
संस्था शेतकऱ्यांच्या सहभागातून भाजीपाला, तसेच भाताच्या स्थानिक तसेच देशी जातींचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करते. याकरिता नागपूर शहरात बीजोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी देशी जातींच्या संवर्धनासाठी या क्षेत्रात कार्यरत इतरही संस्थांची मदत घेतली जाते.

आठ जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम 
संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती देताना डॉ. गोगुलवार म्हणाले, की आमची संस्था राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, औरंगाबाद, नगर, नाशिक, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये बालमृत्यू आणि बालकांच्या कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यरत आहे. गावकरी तसेच स्थानिक महिला कार्यकर्त्यांना यासाठी संस्थेतर्फे प्रशिक्षित करण्यात आले. कुपोषणाबाबत जागृती, तसेच बालमृत्यू नियंत्रणासाठी शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन दिली जाते. आरोग्यविषयक योजनांचा प्रचार-प्रसार करण्यावर संस्थेने भर दिला. या माध्यमातून गेल्या चार वर्षांत गडचिरोलीच्या कोरची विभागातील बालमृत्यूवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. कोरची तालुक्‍यात तीस गावे आणि सुमारे दहा हजारांवर लोकसंख्या आहे. या ठिकाणी बालमृत्यूचे प्रमाण वर्षाला सरासरी १०५ (एक हजार जिवंत जन्मामागे) असे होते. जाणीव जागृतीच्या परिणामी हा आकडा चार वर्षांत ५२ वर आला आहे. कुपोषणावर देखील याच प्रकारच्या मोहिमेतून गेल्या तीन वर्षांत नियंत्रण मिळविता आले. कुपोषणदेखील ३५ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत कमी आणण्यात यश मिळाले. संस्था गरोदर मातांनाही मार्गदर्शन करते. जन्मजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता विविध तपासण्या संस्थेद्वारे होतात. याकरिता शासनाच्या आरोग्यसेवेची मदत घेतली जाते. बालकांच्या वाढीकरिता आईच्या दुधाचे महत्त्व, तसेच वाढीच्या काळात बालकांचा आहार कसा असावा, या विषयी विविध गावांमध्ये संस्थेचे कार्यकर्ते मार्गदर्शन करतात. याचा परिणाम म्हणजे दुर्गम गावातील बालकांचे कुपोषण आणि बालमृत्यूवर नियंत्रण आणण्यास मदत झाली.

संपर्क ः डॉ. सतीश गोगुलवार ,
९४२२१२३०१६, ९६५७५३११८४

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...