Agriculture stories in Marathi, agrowon special story of Are waki pimpalvat,Dist.Ratnagiri | Agrowon

बंधाऱ्यांमुळे भाजीपाला लागवडीला मिळाली चालना
सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

आरे -वाकी पिंपळवट गाव गेली तीन वर्षं जलसंधारणासाठी बंधारे अभियान राबवीत आहे. उत्स्फूर्त लोकसहभाग असेल तर मोठे कामदेखील कसे सहज शक्‍य होते याचे उदाहरण या ग्रामस्थांनी सर्वांसमोर ठेवले आहे. गेली तीन वर्षे सातत्याने ६० पेक्षा जास्त बंधारे बांधणाऱ्या ग्रामस्थांनी या वर्षी ७५ बंधारे बांधले आहेत. यातून जलसंधारणाला चांगली मदत झाली आहे.

आरे -वाकी पिंपळवट गाव गेली तीन वर्षं जलसंधारणासाठी बंधारे अभियान राबवीत आहे. उत्स्फूर्त लोकसहभाग असेल तर मोठे कामदेखील कसे सहज शक्‍य होते याचे उदाहरण या ग्रामस्थांनी सर्वांसमोर ठेवले आहे. गेली तीन वर्षे सातत्याने ६० पेक्षा जास्त बंधारे बांधणाऱ्या ग्रामस्थांनी या वर्षी ७५ बंधारे बांधले आहेत. यातून जलसंधारणाला चांगली मदत झाली आहे.

आरे-वाकी पिंपळवटमधील १५ पैकी १३ वाड्यांमध्ये सरासरी ५ ते ६ बंधारे लोकांनी बांधले आहेत. आरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, हेमचंद्र मोरे, मिलिंद पडवळ, सुधीर भोसले, श्रीकृष्ण परचुरे व गजानन कळझुणकर यांनी वैयक्तिक बंधारे बांधले. या बंधाऱ्यांमुळे गावातील ३५ विहिरींतील पाण्याची पातळी वाढली.
एका वर्षी ग्रामपंचायतीने २५ हजार रुपये खर्च करून बंधाऱ्यांना लागणारा प्लॅस्टिक कागद पुरविला. त्यानंतर लोकसहभागातूनच बंधाऱ्यांसाठी आवश्‍यक खर्च करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. ७५ बंधारे बांधण्यासाठी प्रकाश सावंत, संदीप देवकर, साईनाथ कळझुणकर, जिल्हा परिषद शाळांनी बंधाऱ्यांसाठी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत आणि वेळ दिला. 

बंधारे बांधल्याने वाकी पिंपळवट परिसरात काजूचे क्षेत्र ६७ हेक्‍टर, तर भाजीपाल्याखालील क्षेत्र सात एकराने वाढले. बंधाऱ्यामुळे नवीन लागवड क्षेत्राला पाणी देणे शक्‍य झाले आहे. भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. नागदेवाडी येथील नळपाणी योजनेचा पाणीसाठा वाढल्याने मे महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करणे ग्रामपंचायतीला शक्‍य झाले आहे. शासनाच्या फळबाग लागवडीतून गेल्या वर्षी काजू लागवड करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी काजू लागवडीमध्ये भाजीपाल्याचे आंतरपीक घेतले आहे. याआधी मेपर्यंत पाणी मिळत नसे. मात्र बंधाऱ्यानंतर बागायतदारांना शिंपण्यासाठी पाणीही उपलब्ध झाले. 

अधिकाऱ्यांकडून बंधारे, शेतीची पाहणी
गुहागर पंचायत समितीच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये आरे गावातील बंधाऱ्यांचा वाटा मोठा असतो. तसेच जलसंवर्धनातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण सुरू झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीप्रसाद मिश्रा, जिल्हा सहकारी अधिकारी, आयएएस अधिकारी अभिनव गोयल यांनी गावाला भेट देऊन बंधारे आणि शेतीची पाहणी केली.
 

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...