agriculture stories in marathi agrowon special story on Bee Basket NGO,Pune | Agrowon

‘बी बास्केट’ करतेय मधमाशीपालनाची जागृती
अमित गद्रे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मधमाशी ही परागीकरणातील महत्त्वाचा घटक.  त्याचबरोबरीने मध आणि मधाच्या उपउत्पादनाला औषधी महत्त्व असल्याने बाजारपेठेत मागणी वाढत आहेत. हे लक्षात घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागात मधमाश्यांचे संरक्षण, संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी  संगणक विषयातील पदवीधर अमित गोडसे याने पुणे शहरात ‘बी बास्केट सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून मधमाशी संवर्धनाबाबत कार्यशाळा, प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. तसेच शहरी ग्राहकांना मधविक्रीसाठीही विशेष उपक्रम राबविले जातात.
 

मधमाशी ही परागीकरणातील महत्त्वाचा घटक.  त्याचबरोबरीने मध आणि मधाच्या उपउत्पादनाला औषधी महत्त्व असल्याने बाजारपेठेत मागणी वाढत आहेत. हे लक्षात घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागात मधमाश्यांचे संरक्षण, संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी  संगणक विषयातील पदवीधर अमित गोडसे याने पुणे शहरात ‘बी बास्केट सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून मधमाशी संवर्धनाबाबत कार्यशाळा, प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. तसेच शहरी ग्राहकांना मधविक्रीसाठीही विशेष उपक्रम राबविले जातात.
 

‘‘मी मुंबईमध्ये पाच वर्षे संगणक कंपनीत नोकरी करत होतो. पुणे येथे घर असल्यामुळे सुट्टीच्या दिवसात यायचो. याचदरम्यान पुण्यातील आमच्या सोसायटीच्या इमारतीमध्ये मधमाश्यांनी पोळे तयार केले होते. रहिवाशांनी हे पोळे योग्य पद्धतीने न काढता पूर्णपणे नष्ट केले. यामध्ये पोळे पूर्णपणे नष्ट झाले, बऱ्याच मधमाश्याही मेल्या. हे पाहताना मला प्रश्न पडला, की लोकांना मध हवा आहे, पण मधमाशा नकोत? या घटनेतून मी मधमाश्यांचा अभ्यास करताना शेती आणि मानवी आरोग्यासाठी मधमाश्यांचे महत्त्व लक्षात आले. यातून प्रेरणा घेत मधमाश्यांचे संवर्धन आणि तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी मी पाच वर्षांपूर्वी संगणक कंपनीतील नोकरी सोडली. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामध्ये मधमाशीपालनाबाबत रीतसर प्रशिक्षण घेतले. याचबरोबरीने केरळ, गुजरात, ओडिशा राज्यात मशमाशीपालक आणि संशोधन संस्थांना भेट देऊन मधमाशीपालनातील बारकावे समजावून घेतले. शहरी तसेच ग्रामीण भागात मधमाश्यांचे संवर्धन, मधाच्या औषधी गुणधर्माच्या प्रसारासाठी दोन वर्षांपूर्वी मी मधमाशी संवर्धनाची आवड असणाऱ्या अनिल गायकवाड आणि प्रिया फुलंब्रीकर या सहकाऱ्यांच्या समवेत ‘बी बास्केट सोसायटी’ची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून मधमाशीपालन करणारे शेतकरी, तज्ज्ञ आणि अभ्यासू सहकारी जोडले गेले. सर्वांच्या समन्वयातून ग्रामीण आणि शहरी भागात मधमाशी पालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण, गुणवत्तापूर्ण मध निर्मिती आणि विक्रीसाठी सोयायटी कार्यरत आहे. मी प्रामुख्याने एपीस मेलिफेरा, सातेरी माशी, आग्या माशी, फुलोरी माशी संवर्धन आणि मधविक्री नियोजनाबाबत काम करतो.’’ गेल्या पाच वर्षांतील प्रवासाबाबत अमित गोडसे सांगत होता.
 

युवकांना प्रशिक्षण 

 अमित गोडसे म्हणाला, की मी गेल्या दोन वर्षांपासून सह्याद्री पट्ट्यातील काही गावे तसेच गुजरात, छत्तीसगड, ओडिशा राज्यातील आदिवासी गावात मधमाशीपालन करणाऱ्या युवकांचे गट तयार केले आहेत. या युवकांना मधमाशांच्या पेट्यांची हाताळणी तसेच आग्या माश्या, सातेरी माशांच्या पोळ्यांचे संरक्षण, मधकाढणी, एका जागी नको असलेले पोळे दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी नेऊन बसविण्याबाबत प्रशिक्षण देत असतो. या गटांना सोसायटीतर्फे मध काढताना लागणारा विशिष्ट पोशाख, हातमोजे, जाळीचा पडदा, स्मोकर, मध काढण्याचे यंत्र, मध गोळा करण्यासाठी लागणारी भांडी, साठवणुकीसाठी कंटेनर दिले आहेत. सध्या महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड राज्यांतील आदिवासी मुले माझ्या बरोबरीने काम करतात. हे युवक मध गोळा करून कंटेनरमध्ये साठवून ठेवतात. मागणीनुसार मला पुरवठा करतात. दरवर्षी आमच्याकडे खास जंगलपट्ट्यातील ५०० किलो मध जमा होतो. याचबरोबरीने पेटीमध्ये मधमाशीपालन करणाऱ्यांच्या गटाकडून मध जमा होतो. या युवकांच्या गटाला योग्य आर्थिक मोबदला दिला जातो. 
     मधमाशीपालनामुळे या युवकांना उत्पन्नाचा नवा स्रोत तयार झाला आहे. या गटांना मी शास्त्रीय पद्धतीने मध गोळा करणे, पोळी रिलोकेशन, मधमाश्यांच्या पेट्या योग्य पद्धतीने भरणे, मध योग्य पद्धतीने गोळा करणे, मधाची स्वच्छ कंटेनरमध्ये साठवण याचे प्रशिक्षण देतो. नवीन मधमाशीपालक तयार करणे, ग्राहकांशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण या युवकांना दिले जाते. गेल्या काही वर्षांत डाळिंब, आंबा, शेवगा, सूर्यफूल, तीळ, करडई या पिकांमध्ये परागीकरणासाठी मधमाश्‍यांच्या पेट्यांची मागणी वाढत आहे. त्यातून युवकांच्या गटाला चांगला उत्पन्नाचा स्रोत तयार होत आहे.  
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थानमधील हे युवक आहेत. आमच्याकडे उपलब्ध होणारा मध काही कंपन्यांंना थेट विकला जातो. तसेच ३०० ग्रॅम, ५०० ग्रॅम बाटलीमध्ये पॅकिंग करून शहरी ग्राहकांना विकला जातो. मध विक्रीच्या दृष्टीने आम्ही प्रमाणपत्र देखील घेतले आहे. मधविक्रीसाठी ‘बी बास्केट’  ब्रॅंड  आणि कंपनीस सुरवात केली आहे. यामुळे ग्राहकांना गुणवत्तेची खात्री मिळते. मधाच्या बरोबरीने शहरी लोकांसाठी आम्ही हनी कोंब लहान तुकड्यांच्या स्वरूपात विकतो. शहरी भागात याची मागणी वाढत आहे. संस्थेतर्फे मधमाशीपालन करणाऱ्या गटांतील महिलांना पोळ्यातील मेणापासून मेणबत्तीनिर्मिती करायला शिकवतो आहे. बाजारपेठेत मध, मेण, परागकण अशा घटकांना व्यावसायिकदृष्ट्या चांगली मागणी आहे. याचबरोबरीने नवीन मधमाश्यांच्या पेट्या तयार करून शेतकरी तसेच मधमाशीपालकांच्या गटाला संस्थेतर्फे दिल्या जातात. 
     गेल्या तीन वर्षातील मधमाशीसंवर्धन आणि प्रसारातील कामाबद्दल अमित गोडसेला ‘सोशल इनॉव्हेशन’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

‘अर्बन बी कीपिंग’ उपक्रम
 विविध स्वयंसेवी संस्था तसेच ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून अमित गोडसे याने गेल्या तीन वर्षांपासून पुणे शहरातील सोसायटी, महाविद्यालये, शाळा, उद्योगसमूहांमध्ये मधमाश्‍यांच्या संवर्धनाबाबत जागृती सुरू केली आहे. याबाबत तो म्हणाला, की सोसायटी, बंगल्यांमध्ये जेथे मधमाश्‍यांनी पोळे केले आहे, तेथे जाऊन मी पोळे आणि मधमाशा शास्त्रीय पद्धतीने काढून टेकडीवरील झाडे किंवा शेतकऱ्यांना ते पोळे नेऊन देतो. मधमाश्‍यांच्या बद्दल लोकांच्या मनातील भीती नाहीशी करणे, संवर्धनाला चालना देण्यासाठी मी प्रयत्न करतो. मी प्रामुख्याने ज्यांना मधमाश्‍यांचे पोळे नको आहे आणि ज्यांना हवे आहे त्यांच्यामध्ये समन्वय साधून ते पोळे किंवा पेटी रिलोकेट करून देतो. यामुळे मधमाश्‍या वाचतात.  अलीकडे शहरातील बंगले किंवा सोसायटीमधील टेरेसे गार्डन वाढताहेत. याचबरोबरीने शहराजवळील फार्म हाउसमध्येही मधमाश्‍यांच्या पेट्यांची मागणी वाढत आहे. या लोकांच्याकडून बागेमध्ये मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवण्यासाठी मला विचारणा होते. मी मधमाशी संवर्धनाचे प्रशिक्षण देतो. पुण्यात सध्या तीस लोकांनी स्वतःच्या टेरेस गार्डनमध्ये मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवल्या आहेत. या बागेत फुलझाडे, भाजीपाला, फळझाडेही असल्याने त्याच्या परागीकरणासाठी फायदा होतो. तसेच वर्षभरात या पेटीतून किमान दोन किलो मध उपलब्ध होतो. येत्या काही दिवसांत पुण्यातील एका शाळेत मी मुलांमध्ये मधमाश्‍यांच्या संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी मधमाशीची पेटी ठेवणार आहे. यातून मुलांमध्ये लहानपणीच मधमाश्‍यांच्या बद्दलची भीती जाऊन संवर्धनासाठी पुढे येतील.

 - अमित गोडसे ८३०८३००००८

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...
‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...