Agriculture stories in Marathi, agrowon special story of goat farming done by women self help group, Kloshi,Dist.Satara | Agrowon

महिला बचत गटांनी साधली शेळीपालनातून आर्थिक संधी
विकास जाधव
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

गटामुळे मिळाली शेळीपालनाला चालना 
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बचतीची सवय लागली. त्याचबरोबरच शेळीपालनासारखा पूरक व्यवसाय तयार झाला. दरवर्षी एका महिलेला शेळीपालनातून तीस हजारांपर्यंत नफा मिळत आहे. येत्या काळात देशी गाईंचे संगोपन बचत गट करणार आहेत.
- संगीता प्रकाश निकम, ९४२०७५८४३४
(सचिव, एकता महिला बचत गट)

काळोशी (ता. जि. सातारा) गावातील महिलांनी एकत्र येऊन एकता, रेणुका, श्रीगणेश, झाशीची राणी, दुर्गामाता या महिला बचत गटांची उभारणी केली. बाजारपेठेची मागणी ओळखून या गटांनी शेळीपालनास सुरवात केली. यातून मिळणाऱ्या नफ्यातून महिलांनी आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.

सातारा शहराच्या पश्चिम भागात परळी खोरे आहे. या भागातील उरमोडी धरणासाठी अनेक गावांचे पुनर्वसन झाले. या भागातील काळोशी हे सुमारे ८०० लोकसंख्येचे गाव. गावात बागायती क्षेत्र कमी असल्याने हंगामानुसार पिके घेतली जातात. शेतीचे क्षेत्र कमी असल्याने तरुण मुले मुंबई शहरात रोजगारासाठी गेले आहेत. या गावातील संगीता निकम या महिला पोलिस पाटील आहेत. २००९ मध्ये संगीताताईची अॅवॅार्ड संस्थेच्या सचिव नीलिमा कदम यांची भेट झाली. नीलिमाताई गावातील महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी तसेच बचत करण्यासाठी महिला बचत गटाची सुरवात करण्याचा सल्ला दिला. 

गटाची स्थापना 

संगीताताईंनी गावातील महिला संघटित करून त्यांना बचत गटाची संकल्पना समजावून सांगितली. हळूहळू गावातील महिला बचत गटाच्या उभारणीस तयार होऊ लागल्याने संगीताताईचा हुरूप वाढला. अॅवॅार्ड संस्थेच्या माध्यमातून त्यांनी  एकता महिला बचत गटाची स्थापना केली. या गटात २० महिलांचा समावेश आहे. गटाची स्थापनावेळी आर्थिक बचत हा एकमेव उद्देश ठेवण्यात आला होता. बचतीचे महत्त्व पटत जाईल तसतशी गटांची संख्या वाढत गेली. यानंतर टप्पाटप्प्याने रेणूका, श्रीगणेश, झाशीची राणी, दुर्गामाता या पाच गटांची स्थापना झाली. या गटांच्या माध्यमातून गावातील सुमारे १०० महिला संघटित झाल्या आहेत.

गटांनी सुरू केले शेळी पालन 

महिला बचत गट हा नुसता बचतीसाठी नसून या गटाने जमा केलेल्या भांडवलातून शेती पूरक व्यवसाय करण्याचा सल्ला नीलिमाताईंनी दिला. दर महा गोळा केली जाणारी वर्गणी तसेच नाबार्डतर्फे केली जाणारी अार्थिक मदत यामुळे गटांचा भांडवलाचा प्रश्न कमी झाला. चर्चेतून अनेक व्यवसायही शोधण्यात आले. गावच्या बाजूला डोंगर आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात गवत उपलब्ध असतेच, तसेच कमी भांडवलात होऊ शकणारा व्यवसाय म्हणून महिलांनी शेळी पालनाला पहिली पसंती दिली. पारंपरिक पद्धतीने शेळीपालन न करता त्याचे अर्थशास्त्र तसेच आवश्यक गोष्टी समाजावून घेण्यासाठी बचत गटातील महिलांनी अॅवॅार्ड संस्थेच्या माध्यमातून दहीवडी येथील शेळी-मेंढी संशोधन केंद्र तसेच बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. शेळीपालनाचे तंत्र समजाऊन घेतले. २०१४ मध्ये प्रत्येक गटातील  इच्छुक तीन ते चार महिलांनी उस्मानाबादी जातीच्या दोन शेळ्यांची खरेदी करून पूरक व्यवसायास सुरवात केली.  

टप्पाटप्प्याने झाली वाढ

लहान प्रमाणात सुरू झालेला शेळीपालन व्यवसाय गटातील महिलांनी चांगल्या पद्धतीने वाढविला. दोनच्या चार, चाराच्या आठ याप्रमाणे करडांच्या संख्येत वाढ होत गेली. घराच्या बाजूस किंवा काही महिलांनी अगदी घराच्या पडवीत शेळी पालन सुरू ठेवले. टप्पाटप्प्याने शेळ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. सध्या काही महिलांकडे जवळपास पंधराच्यावर शेळ्या व बोकडांची संख्या गेली आहे. महिलांचे शेळीपालनातील कष्ट पाहून घरातील पुरुष मंडळी तसेच तरुण मुलांचेही सहकार्य मिळू लागले. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या शेळीपालन व्यवसायात चांगली वाढ झाली. सध्याच्या काळात या पाच महिला बचत गटांकडे सुमारे दिडशेच्यावर  शेळ्या, बोकडांची संख्या गेली आहे. वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी शेळ्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या जातात.

व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी 

  • बंदीस्त पद्धतीने शेळीपालन न करता दररोज शेळ्यांना चरण्यासाठी डोंगरात किंवा शेतात नेले जाते.
  • डोंगरामध्ये चारल्यामुळे शेळ्यांना चांगला व्यायाम होऊन आरोग्यही सुधारले.
  • गटातील महिलांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे शेळ्यांचे लसीकरण आणि आजारांवर उपचाराची माहिती झाली. त्यामुळे तातडीने प्रथमोपचार.
  • सहा ते आठ महिने वयाच्या बोकडांची पाच ते आठ हजार रुपयांपर्यंत विक्री. वजनानुसार दर कमी जास्त होतो.
  • खरेदीदार गावामध्ये येऊन बचत गटांकडून शेळी, बोकडांची खरेदी करतात. त्यामुळे चांगला दर मिळतो.

शेळीपालन टप्प्याटप्प्याने वाढवत नेले. सध्या माझ्याकडे १६ शेळ्या आणि बोकड आहेत. गेल्या तीन वर्षांपासून बोकडांची विक्री सुरू केली. यातून चांगला नफा होत असल्याने कुटुंबास आर्थिक हातभार लागला आहे.
- रेखा दिनकर निकम, 
अध्यक्ष, रेणूका महिला बचत गट

मी हा व्यवसाय चार शेळ्यांपासून सुरू केला होता. सध्या माझ्याकडे २४ शेळ्या आहेत. सर्व शेळ्या दररोज चरावयास नेल्या जातात. बोकडांच्या विक्रीतून चांगला नफा मिळतो. 
- कमल रमेश निकम, 
सदस्य, रेणूका महिला बचत गट

मी पाच शेळ्याचे संगोपन करत असून बोकडांची विक्री सुरू केली आहे. घरातील काम पाहून हा व्यवसाय करत आहे.
- उषा राजेंद्र निकम, 
सदस्य, झाशीची राणी महिला बचत गट

बचत गटामुळे बचतीची सवय झाली. शेतीला पूरक म्हणून शेळी पालन हा व्यवसायही उपयुक्त ठरत आहे. या व्यवसायासाठी कुटुंबातील सदस्यांची चांगली मदत होते. सध्या माझ्याकडे नऊ शेळ्या आहेत.
- निर्मला शंकर निकम, सदस्य, झाशीची राणी महिला 
बचत गट

मी तीन वर्षांपासून शेळीपालन करत आहे. माझ्याकडे सध्या चार शेळ्या आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. 
- विमल मुरलीधर निकम,
सदस्य, एकता महिला बचत गट

गावातच तयार झाले मार्केट 
मागील पाच वर्षांपासून शेळीपालन करत आहेत. एका शेळीपासून हा व्यवसाय सुरू केला होता. आज माझ्याकडे लहान-मोठ्या मिळून १६ शेळ्या आहेत. स्थानिक मटण व्यावसायिकांकडून सध्या बोकडांची खरेदी केली जाते.

संपर्क ः​  सीमा काशीनाथ निकम, ९८९०७५४२६३
(अध्यक्ष, श्रीगणेश महिला बचत गट)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...