शेतीतील ‘जादू’

अॅग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी मोहन जगताप यांची शेडनेटमधील टोमॅटो लागवड
अॅग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी मोहन जगताप यांची शेडनेटमधील टोमॅटो लागवड

अॅग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी अॅवॉर्ड     मोहन तेजराव जगताप, वळती, जि. बुलडाणा ----------------------------------------------------------- मोहन जगताप यांनी वळती (ता. चिखली, जि. बुलडाणा) शिवारात विविध फळपिके आणि कोरडवाहू पिकांमध्ये अभिनव प्रयोग केले. त्यातून शेतीचे सगळे चित्रच पालटून टाकले. या पीकपद्धतीला देशी गायींचे संगोपन, शेततळे, शेडनेट, रोपवाटिका यांची जोड दिली आहे. आपल्या शेताला ‘जादू’ असे नाव देऊन प्रगतीचा मार्ग धरला आहे.

मोहन जगताप यांनी बंधूच्या मदतीने आपल्या शिवारात अक्षरशः `जादू` घडवून आणली आहे. त्यांनी आपल्या शेताचं नावच (jagtap agriculture development unit (jadu) असं ठेवलं आहे. विविध फळपिकांची शेती आणि कोरडवाहू पिकांमध्ये अभिनव प्रयोग यातून त्यांनी सगळं चित्रच पालटून टाकलं. या पीकपद्धतीला देशी गायींचे संगोपन, शेततळे, शेडनेटहाऊस, रोपवाटिका यांची जोड दिली. त्यातून निसर्गपूरक आणि नफ्याच्या शेतीचं उत्कृष्ट मॉडेल आकाराला आलं अाहे. परंपरागत शेतीला नवतंत्राची जोड देण्याचा त्यांचा ध्यास आहे.

मोहन जगताप यांनी राज्याच्या विविध भागांतील शेती प्रयोगांना भेटी दिल्या. त्यातून प्रेरणा घेत धाडसी पाऊल टाकले. आणि सघन लागवड पद्धतीने फळबागा उभ्या केल्या. सीताफळ, केसर आंबा, पेरू या फळपिकांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. त्यांचं एकेक सीताफळ ३०० ते ५०० ग्रॅम वजनाचं आहे. फळांची स्वतः विक्री करत असल्याने दर चांगला मिळतो. अाता ते सीताफळापासून गर काढण्याकडेही वळाले अाहेत. केसर आंब्याचं प्रतिझाड सरासरी १५ ते २० किलो उत्पादन मिळतं. फळं नैसर्गिकरीत्या पिकवतात आणि स्वतः विक्री करतात. पेरूमध्ये वैशिष्ट्यपूर्ण छाटणी तंत्राचा वापर करून प्रतिझाड १५ ते २० किलोपर्यंत उत्पादन मिळवतात. याशिवाय कागदी लिंबू, ॲपल बोर, ड्रॅगनफ्रुट, शेवगा लागवडीचे प्रयोग सुरू आहेत. फळपिकांबरोबरच सोयाबीन, तूर, हरभरा या कोरडवाहू पिकांमध्ये जगताप यांनी विविध प्रयोग केले आहेत. त्यामुळे या पिकांचा उतारा वाढला आहे.

जगताप यांनी स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन अनुरूप अशी पीकपद्धती निवडली. उपलब्ध साधनसामुग्रीचा ते कसोशीने उपयोग करतात. शेतीत सतत नव-नवीन प्रयोग करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शेतमालाचा उत्तम दर्जा राखून त्याची थेट विक्री करण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरलाय. जगताप यांच्या शेतीला भेट देण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत असतात. त्यातले अनेक शेतकरी या `जादू`चे अनुकरण करत  आहेत.

जादू`चे उपक्रम

  • देशी गायींचे संगोपन ः जगतापांकडे सध्या पाच गायी व तीन वासरे अाहेत. या गायींपासून मिळणारे शेण बायोगॅस तसेच शेतीसाठी वापरले जाते. या गायींच्या चाऱ्यासाठी १५ गुंठे क्षेत्रावर चाऱ्याची लागवड केली अाहे.
  •  अाधुनिक बायोगॅस युनिट ः स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसची गरज यातून भागवली जाते. शिवाय निघणाऱ्या स्लरीचा फळबागांना सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो.  
  •  बायोडायनॅमिक खत ः पिकांचे अवशेष, गाईच्या खाद्यातील राहलेला भूसा, शेणकाला यात बायोडायनॅमिक मदर कल्चर मिसळून कमी कालावधीमध्ये खत तयार होते.
  •  शेण व गोमूत्रापासून विविध उत्पादने ः देशी गायींचे शेण व गोमूत्र हे गुणकारी समजले जाते. त्यापासून साबण, दंतमंजन, फिनाईल, फेसपॅक, धूपबत्ती व मालिश तेल इत्यादी उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण जगताप यांनी घेतले आहे.
  • शेततळे   जगताप यांना शेती करताना सर्वांत मोठी अडचण पाण्याची येते. त्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी २००९ मध्ये २५ बाय २० मीटर अाकाराचे शेततळे घेतले. त्यात पॉलिथीनचे अस्तरीकरण केले अाहे. त्यातून बाष्पीभवन झाल्यानंतरही सुमारे १० ते १२ लाख लिटर पाणी मिळते. संरक्षित अोलिताची सोय झाली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com