Agriculture stories in Marathi, agrowon special story of Tanishka women self help group,Nashik | Agrowon

लाँड्री व्यवसायातून गवसला ‘तनिष्कां'ना आत्मनिर्भरतेचा मार्ग
ज्ञानेश उगले
रविवार, 28 जानेवारी 2018

सुखदु:खाला सहज एकत्र आलेल्या चार चौघीजणी तितक्‍यात सहजतेने व्यवसायाची वाट धरतात. ही वाटही असते वेगळीच. त्या लाँड्री सुरू करायचं ठरवतात. घरातल्या कामांइतकंच निगुतीनं व्यवस्थापनाची घडी बसवतात. नाशिक शहराच्या जेलरोड परिसरातील गणेश आराधना महिला मंडळाच्या ‘मिळून साऱ्या जणींनी` हे करुन दाखवलंय. 

सुखदु:खाला सहज एकत्र आलेल्या चार चौघीजणी तितक्‍यात सहजतेने व्यवसायाची वाट धरतात. ही वाटही असते वेगळीच. त्या लाँड्री सुरू करायचं ठरवतात. घरातल्या कामांइतकंच निगुतीनं व्यवस्थापनाची घडी बसवतात. नाशिक शहराच्या जेलरोड परिसरातील गणेश आराधना महिला मंडळाच्या ‘मिळून साऱ्या जणींनी` हे करुन दाखवलंय. 

नाशिक शहरातील पुणे रोड आणि औरंगाबाद रोड या दोन्हींच्या मधोमध वसला आहे जेलरोड परिसर. सेंट्रल जेल आणि इंडिया सिक्‍युरिटी प्रेसमुळे हा परिसर प्रसिद्ध आहे. याचबरोबरीने आता तनिष्का महिला लाँड्री ही या परिसराचीच ओळख बनली आहे. एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये या लाँड्रीचं कामकाज चालतं. आठवड्यातील सातही दिवस सकाळी आठपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लाँड्रीची लगबग असते. कपडे आणणे, इस्त्री करणे, पुन्हा स्वत:च्याच वाहनातून पोच करणे, ही कामे गटातील महिलांकडून दिवसभर सुरू असतात. गुणवत्ता, सुविधा या दोन गुणवैशिष्ट्यांमुळे ‘तनिष्का महिला लाँड्री`चा बिझनेस दिवसेंदिवस वाढतच  आहे.

वैशाली राठोड, चंद्रकला साबळे, प्रज्ञा वाकचौरे यांच्या पुढाकारानं राज्यातील पहिली महिला लाँड्री अशी ओळख मिळविलेली ‘तनिष्का लाँड्री’  सहा महिन्यांपूर्वी कार्यरत झाली. सध्या दहा महिलांना रोजगार दिलेल्या या लाँड्रीने पहिल्याच टप्प्यात १५० नियमित ग्राहकांचा पल्ला गाठला.
जेलरोड परिसरात मागील दहा वर्षांपासून वैशालीताईंच्या प्रयत्नांतून गणेश आराधना महिला मंडळाचे काम सुरू आहे. हळदीकुंकू, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव या निमित्ताने मंडळाच्या तीस महिला एकत्र येतात. गृहिणींपासून नोकरी, छोटे- मोठे व्यवसायामध्ये मंडळातील महिला आधीपासून कार्यरत आहेत. एकत्र येऊन आपण काहीतरी नवीन व्यवसाय केला पाहिजे हा विचार मागील काही वर्षांपासून मनात घोळत होता. दरम्यानच्या काळात या महिला ‘सकाळ’च्या तनिष्का गटाच्या सदस्या झाल्या. गटातील महिलांना तनिष्काचे नाशिक समन्वयक विजयकुमार इंगळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
गणेश आराधना महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि नाशिक पूर्वमधून तनिष्का आमदार झालेल्या वैशाली राठोड म्हणाल्या, की मागील अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र येऊन नवरात्रोत्सव, सार्वजनिक हळदीकुंकू असे कार्यक्रम करीत होतो. तनिष्काच्या माध्यमातून आम्हाला उद्योजकतेची प्रेरणा मिळाली. काय व्यवसाय करायचा, हा प्रश्‍न होताच. महिलांचा पूरक व्यवसाय म्हणजे पापड, मसाले, लोणचे निर्मिती उद्योग हे ठरलेलं आहे. आम्ही वेगळा विचार करीत होतो. त्यातून लाँड्रीचा पर्याय समोर आला. आमच्या परिसरात लाँड्री क्षेत्रात मोठे व्यावसायिक आहेत. मात्र तरीही आपण आपलं वेगळंपण तयार करायचं आणि हा व्यवसाय करायचा, असं ठरवलं. व्यवसाय करण्यासाठी पाच जणींनी पुढाकार घेतला.

  अशी झाली सुरवात  

चंद्रकलाताई साबळे म्हणाल्या, की जानेवारी २०१७ पासून आम्ही परिसरात सर्वेक्षण सुरू केले. परिसरात लाँड्री व्यावसायिक बऱ्याच प्रमाणावर असले तरी घरपोच सेवा कुणीच देत नव्हतं. आम्ही त्यावर भर द्यायचं ठरवलं. भांडवल म्हणून सुरवातीला आठ महिलांनी प्रत्येकी चार हजार रुपये जमा केले. लाँड्रीसाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला. कपडे आणणे, इस्त्री काम करणे, पोच करणे ही सर्व कामे आम्ही चारजणी करीत होतो. नंतर आम्हाला परिसरातील दहा महिलांची जोड मिळाली. लाँड्री व्यवसाय हे क्षेत्र महिला गटासाठी नवीन असल्याने त्याबाबत अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण गरजेचे होते. महिला मंडळाचे सुरवातीपासून हितचिंतक असलेले लाँड्री व्यावसायिक गणेश रंदे यांनी कपड्याची इस्त्री कशी करायची? काय काळजी घ्यायची? याबाबत प्रशिक्षण दिले. विश्‍वास, संयम आणि जिद्द या तीन गुणांच्या जोरावरच एकत्र राहणे आणि प्रगती करणे शक्‍य आहे हे आमच्या गटाने दाखवून दिले  आहे.

उपक्रमाला मिळाला प्रतिसाद 
लाँड्री व्यवसायातील नियोजनाबाबत वैशालीताई म्हणाल्या, की आम्ही इस्त्रीचा दर इतरांपेक्षा कमी ठेवला. ग्राहकांना कपडे २४ तासांच्या आत घरपोच मिळतील अशी व्यवस्था केली. यामुळे ग्राहकांचा वेळ, पैसा वाचला. परिणामी, ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. दरातील हा फरक हेही आकर्षण ठरले. रोज सकाळी दहा वाजता लाँड्रीचे कामकाज सुरू होते. सकाळी १० ते २ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत इस्त्रीची कामे चालतात. संध्याकाळी पाचनंतर ग्राहकांना कपड्यांची पोच दिली जाते. रोज सकाळी कपडे ग्राहकांकडून आणले जातात. काही महिला सायकलवरूनही कपडे घेऊन येतात.

मागील सहा महिन्यांचा आढावा घेतला तर दर महिन्याला आमच्या ग्राहकांची संख्या ५ ते १० ने वाढतच आहे. आम्ही सोशल मीडियाचाही वापर करतो. ‘तनिष्का लाँड्री’च्या ग्राहकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. या ग्रुपवर ग्राहक इस्त्रीची मागणी नोंदवितात, तसेच पत्ताही पाठवितात. त्यामुळे ग्राहकांशी संवाद वाढला. त्याचा व्यवसायवाढीसाठी उपयोग होतो. नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप यांनी गटाला कपडे वाहतुकीसाठी व्हॅन भेट दिली. गटातील चार महिला स्वत: गाडी चालवून ग्राहकांना कपड्यांची घरपोच सुविधा देतात.

येत्या काळातील उपक्रम 
येत्या वर्षभरात तनिष्का लाँड्रीच्या माध्यमातून परिसरातील एक हजार घरांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट या महिलांनी  ठेवले आहे. याचबरोबरीने नाशिक पोलिस विभागानेही या सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. नोकरी तसेच काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर चालविणे, तसेच भाजीपोळी केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. 
 

संपर्क ः वैशाली  राठोड, ८६००८६३८४९
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...