Agriculture stories in Marathi, agrowon special story of village development,Mudhewadi,Dist.Sangli | Agrowon

उच्चशिक्षित बनवताहेत मुढेवाडीला ‘ड्रीम व्हिलेज`
नागेश गायकवाड
गुरुवार, 11 जानेवारी 2018

 गावातील तरुण उच्चशिक्षित बनून पैसे मिळवून समाधानी नाहीत. एकमेकांच्या ओळखीतून एकत्र आलेल्या राज्यभरातील तरुणांनी स्वतः आर्थिक भार उचलत ग्राम विकास आणि समाज परिवर्तनाचे काम सांगली जिल्ह्यातील मुढेवाडीत दीड वर्षापासून सुरू केले. देश, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या ऊर्जेतून मुढेवाडीत ‘ड्रीम व्हीलेज’ प्रकल्प साकारत आहे. 

 गावातील तरुण उच्चशिक्षित बनून पैसे मिळवून समाधानी नाहीत. एकमेकांच्या ओळखीतून एकत्र आलेल्या राज्यभरातील तरुणांनी स्वतः आर्थिक भार उचलत ग्राम विकास आणि समाज परिवर्तनाचे काम सांगली जिल्ह्यातील मुढेवाडीत दीड वर्षापासून सुरू केले. देश, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या ऊर्जेतून मुढेवाडीत ‘ड्रीम व्हीलेज’ प्रकल्प साकारत आहे. 

खेडेगावातील अनेक तरुण शिक्षण घेऊन सांगलीपासून पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकता या शहरात नोकरी,व्यवसायायानिमित्त स्थायिक झाले आहेत. याचबरोबरीने काही जण अमेरिका, दुबई आदी देशात कार्यरत आहेत.  हे सर्व जण सोशल मीडियाच्या माध्यमातून गाव विकासाच्या ओढीने मित्र बनले. गावच्या ऋणातून मुक्‍त होण्यासाठी विचारमंथन सुरू झाले. उच्चपदस्थ, आय.ए.एस. अधिकारी, शासकीय अधिकारी, उद्योगपती, व्यावसायिक, अभिनेते, अभियंते, डॉक्‍टर, वकील, समाजसेवकांची मोट बांधली. कॉन्सफरन्सवर या तरुणांनी चर्चा केली. त्यातून ३ एप्रिल, २०१७ मध्ये ‘ड्रीम व्हीलेज फाउंडेशन’चा जन्म झाला. या समूहात दोन, चार नव्हे तर तब्बल पाचशेवर उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग आहे. त्यांच्या कष्टाच्या पैशातून मुढेवाडीला आदर्श बनवण्याचे प्रत्यक्ष कामही सुरू झाले. युवकांनी लोकसहभागातून गावाचा आराखडा तयार केला. पहिल्या टप्प्यात सुविधा व गरजा, दुसऱ्या टप्प्यात सौंदर्य आणि सुशोभीकरण; आणि त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर ग्राम विकासामध्ये केला जाणार आहे. सध्या सुरक्षा रक्षक केबिनसह गावाच्या स्वागत कमानीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी देखणी कमान राज्यात क्‍वचित पहायला         मिळेल.

सध्याचे उपक्रम 

  • गावाचे सर्व्हेक्षण करून प्रकल्प तयार.
  • प्रबोधन आणि जागृतीपर बैठका.
  • तज्ज्ञ आणि सल्लागारांच्या भेटी.
  • गावांतर्गत छोटे रस्ते पूर्ण.
  • गाव परिसरात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम.
  • सुरक्षा रक्षकासह केबिन स्वागत कमान अंतिम टप्प्यात. 

नियोजित उपक्रम 

  • शेतकऱ्यांना सुधारित शेती, पूरक उद्योगाचे प्रशिक्षण.
  • पाणी आडवा-पाणी जिरवा उपक्रम.
  • सौरऊर्जा प्रकल्प.
  • अत्याधुनिक ग्रामसचिवालय.
  • भुमिगत गटार योजना. 
  • व्यायामशाळा आणि क्रीडांगण.
  •  सुसज्य ग्रंथालय, पार्किंग व्यवस्था.
  • बॅंक, एटीएम, सीसीटीव्ही, वाय-फाय सुविधा.

   लोकसहभागातून विकासाचे सूत्र  
ड्रीम व्हीलेज फाउंडेशनचे अध्यक्ष महेश पाटील म्हणाले की, मुढेवाडीतील ग्रामस्थांशी आम्ही पहिल्यांदा चर्चा केली. लोकसहभागाची तयारी दाखविल्यानंतर आम्ही विविध विकासाच्या कामांना लोकसहभागातून सुरवात केली. लोकांच्या प्रतिसादानुसार कामाची आखणी केली आहे. पहिल्या तीन महिन्यांत तीसवर उपक्रम राबवले. ग्राम विकासाच्यादृष्टीने आराखड्यानुसार सव्वाशे प्रकारची कामे होणार आहेत. येत्या चार वर्षांत ही लोक सहभागातून काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामात गावातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थांचा चांगला सहभाग आहे. आम्ही संकेतस्थळही तयार केले आहे. 
 

फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
ग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती...औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव...
शेती, पूरक उद्योग अन् ग्रामविकासाला...सातारा जिल्ह्यातील डोंगरी, दुर्गम जावळी तालुक्यात...
वडनेर बुद्रुक गावाने मिळवली स्वच्छता,...ग्रामविकासासाठी गावकरी एकत्र आले. प्रत्येक कामात...
‘स्वयम शिक्षण प्रयोग` करतेय ग्रामविकास...पुणे येथील ‘स्वयम शिक्षण प्रयोग` ही स्वयंसेवी...
ग्रामस्वच्छतेचा मंत्र प्रत्यक्षात...स्वच्छतेचा ध्यास मनाशी बाळगून सांगली जिल्ह्यातील...
बचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...
श्रमदानातून पाणी टंचाईवर महागोंड गावाने...महागोंड (ता. आजरा) येथील आंबेओहळ नाल्यावरील...
जळगाव जिल्ह्यातील बारा तालुके... राज्यात हगणदारीमुक्तीसंबंधी मार्च २०१८ ची...
संत गाडगेबाबांचा भक्त करतोय गावोगावी...संतविचार तसेच लोककला यांच्या माध्यमातूनही...
शाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना...जल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव...
कुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत...परभणी (प्रतिनिधी)ः कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील...
प्रयोगशील भाजीपाला शेतीतून अर्थकारण...भाजीपाला व त्यातही टोमॅटो पिकात राज्यात अग्रेसर...
पर्यावरण संवर्धन, शिक्षण हेच ‘ब्राऊन...पुणे शहर आणि आसपासच्या गावात पर्यावरण संवर्धन,...
एकजुटीतून ‘पांगरखेड`ने केला कायापालटएखाद्या गावाने ठरविले तर काहीही अशक्य नाही, याचे...
भूजल प्रदूषण निवारणासाठी प्रयत्न आवश्यकजलप्रदूषण रोखणे हा जल व्यवस्थापनाचाच एक भाग आहे....
महिला सरपंचांच्या कामात हस्तक्षेप पडणार...नगर ः गावपातळीवर महिलांना काम करू न देता...
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन...परभणी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन...
नावीन्यपूर्ण उपक्रमांत तावशीची आघाडीरस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत...
शिक्षण, जलसंधारणातून ग्रामविकासाला गतीमराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा आरोग्य सेओवा,...
मनपाडळेच्या श्रमदानाला अनेकांचे हातघुणकी, जि. कोल्हापूर : मनपाडळे गावातील...