Agriculture stories in Marathi, agrowon weather forecast for coming week | Agrowon

थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल
डॉ.रामचंद्र साबळे
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

महाराष्ट्रासह उत्तर व दक्षिण भारतावर; तसेच पश्‍चिम व पूर्व भारतावर हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कल इतका राहील. सद्यस्थितीत संपूर्ण भारतावर समान हवेचा दाब राहण्यामुळे हवामान स्थिर राहील. बंगालच्या उपसागरात हवेच्या दाबात बदल होण्याने २८ ऑक्‍टोबर रोजी दक्षिण कोकणात हलक्‍या अल्प स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील. महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल हवेचा दाब कमी राहण्यामुळे वारे उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेस वाहतील आणि त्याचा परिणाम थंडीचे प्रमाण वाढण्यात होईल. 

महाराष्ट्रासह उत्तर व दक्षिण भारतावर; तसेच पश्‍चिम व पूर्व भारतावर हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कल इतका राहील. सद्यस्थितीत संपूर्ण भारतावर समान हवेचा दाब राहण्यामुळे हवामान स्थिर राहील. बंगालच्या उपसागरात हवेच्या दाबात बदल होण्याने २८ ऑक्‍टोबर रोजी दक्षिण कोकणात हलक्‍या अल्प स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील. महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल हवेचा दाब कमी राहण्यामुळे वारे उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेस वाहतील आणि त्याचा परिणाम थंडीचे प्रमाण वाढण्यात होईल. 

उस्मानाबाद, नागपूर, सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात सकाळी हवामान थंड राहून थंडी जाणवेल; तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांत दुपारी हवामान उष्ण राहील. दिवसाचा कालावधी कमी होत जाईल व रात्रीचा कालावधी वाढण्यास सुरवात होईल. 

 कोकण 
ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील; तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि २८ ऑक्‍टोबर रोजी अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अल्पशा पावसाची शक्‍यता असून ठाणे जिल्ह्यात आकाश निरभ्र राहिल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ७३ टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९० टक्के राहिल. 

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअर राहील; तर जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. नंदुरबार व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील; तर नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस आणि धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व धुळे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ टक्के; तर नंदुरबार जिल्ह्यात ५० टक्के; तर धुळे व जळगाव जिल्ह्यात ५४ ते ५९ टक्के राहिल. 

 मराठवाडा 
 लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत  कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान केवळ १८ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. उर्वरित जिल्ह्यात किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्यात ८० ते ८२ टक्के राहील. बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ७८ टक्के राहिल. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ५१ टक्के राहील. 

पश्‍चिम विदर्भ 
भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागाने वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात अत्यअल्प पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. अमरावती जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील; तर उर्वरीत सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ किलोमीटर राहील. अकोला जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस; तर बुलढाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशिम जिल्ह्यात ८५ टक्के, उर्वरित जिल्ह्यात ७३ ते ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ५३ टक्के राहील. 

 पूर्व विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. वाऱ्याची दिशा नागपूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. तर उर्वरीत जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ९० टक्के राहिल. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ४७ टक्के राहील.

 चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागाने अल्पशा पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस व भंडारा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९६ टक्के, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ७८ ते ८२ टक्के राहिल. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ६० टक्के राहील. 

 दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागाने ७ ते ९ मिलीमीटर पावसाची शक्‍यता सांगितलेली आहे. पुणे व नगर जिल्ह्यातही अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान १६ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ९५ टक्के; तर उर्वरुत जिल्ह्यात ६९ ते ८९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ६४ टक्के राहील. 

कृषी सल्ला 

  • गहू पेरणीसाठी चांगले हवामान असल्याने लवकरात लवकर पेरणी करावी. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. पाणी द्यावे. शिफारशीनुसार खते पेरणी बरोबर द्यावीत. दहा किलो बियाणास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
  •   पूर्वहंगामी ऊस लागवड करावी. पेरणीपूर्वी शिफारशीत मात्रेमध्ये खतमात्रा देऊन ती जमिनीत चांगली मिसळावी.  को-८६०३२ किंवा को-१०००१ यापैकी जातीची निवड करावी. उसामध्ये कोबी, फ्लॉवर या आंतरपिकांची लागवड  करावी.
  •  हरभरा पिकाची पेरणी वेळेवर करावी. पेरणीपूर्वी दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबीयम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. 
  •   भाजीपाला, मोहरी, कुळथी, सूर्यफुल या पिकांच्या पेरण्या पूर्ण कराव्यात.

डॉ.रामचंद्र साबळे
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर ताज्या घडामोडी
कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रणराज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट...
अधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...
कर्जमाफीच्या २१ लाख शेतकऱ्यांचे खाते '...यवतमाळ : कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे....
नगर जिल्ह्यात `नरेगा’च्या कामांवर...नगर : मजुरांना रोजगार मिळावा म्हणून राबवल्या...
वऱ्हाडात कांदा बिजोत्पादनाला गारपिटीचा...अकोला ः कांदा बिजोत्पादनाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या...
हमीभाव : धूळफेकीचे चक्र पूर्ण सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने सत्तेवर...
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी :...दीडपट हमीभावाची सरकारची घोषणा ही शुद्ध बनवाबनवी...
उत्पादन खर्चाबद्दल खुलासा करावा : डॉ....केंद्र सरकारने आगामी खरिपात सर्व अघोषित पिकांसाठी...
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
गारपीटग्रस्त केळी बाग सुधारणेच्या...अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  केळी पिकाचे कमी-...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला,...ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी...
पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढपुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये...