पाऊस संपून थंडीस होणार सुरवात

डॉ.रामचंद्र साबळे
डॉ.रामचंद्र साबळे

येत्या काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आदी राज्यांतील पाऊस थांबेल. त्यानंतर सकाळ व दुपारच्या तापमानात घट सुरू होऊन थंडीची चाहूल मिळेल. यंदा हिवाळ्यात चांगली थंडी राहील अशी स्थिती आहे. दिनांक २५ ऑक्‍टोबर बुधवारी संपूर्ण भारतात हवेच्या दाबात १०१२ हेप्टापास्कलपर्यंत वाढ होईल. हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेकडे थंड वारे वाहतील. त्यामुळे आठवड्याच्या मध्यापासून थंडी वाढेल. त्यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण करावीत.  दिनांक २५ ऑक्‍टोबरपर्यंत दक्षिण कोकणात पावसाची शक्‍यता राहील. 

कोकण   ठाणे जिल्ह्यात ७ मिलिमीटर तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात काही दिवशी १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. दक्षिण कोकणात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर रायगड व ठाणे जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील. रत्नागिरी जिल्ह्यात ताशी १२ किलोमीटर ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी १० किलोमीटर, रायगड व ठाणे जिल्ह्यात ताशी ५ ते ६ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहिल.  उत्तर महाराष्ट्र 

  • नाशिक जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. नाशिक व धुळे जिल्ह्यात ताशी १० ते ११ किलोमीटर ,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ताशी ८ ते ९ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. 
  • धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कमाल तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. 
  • मराठवाडा  मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात ताशी १३ किलोमीटर तर उर्वरित जिल्ह्यात ताशी ९ ते ११ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. परभणी व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. बीड व जालना जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९१ टक्के राहील तर दुपारीची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६२ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  आठवड्यात काही दिवशी ५ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर बुलढाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा व अमरावती जिल्ह्यात तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशिम जिल्ह्यात कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के राहील.  मध्य विदर्भ  नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी १० ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहिल. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात या आठवड्यातील काही दिवशी १५ ते १६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १० ते १२ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहिल. गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहिल. तर चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के दर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील.

    दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र  वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली व सोलापूर जिल्ह्यात ताशी १७ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ किलोमीटर राहील. सांगली जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात २६ ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यात २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७४ टक्के राहील.

    कृषी सल्ला

  •  पेरणी केल्यानंतर जेथे बियाणे उगवले नसेल तेथे बियाणे टोकावे. बियाणे दाट पेरले असल्यास विरळणी करावी.
  •  वाफसा येताच हरभरा पिकाची पेरणी पूर्ण करावी.
  •  रब्बी ज्वारीचे पीक तीन आठवड्यांचे झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
  •  कांदा लागवड पूर्ण करावी. पात विक्रीसाठी पीक तयार केल्यास चांगला आर्थिक फायदा होईल. 
  • टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर रोपांची लागवड करावी.
  •  नवीन बागांचा बहर धरावा.
  • - डॉ.रामचंद्र साबळे (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com