agriculture stories in marathi agrowontechnowon, dusters for agricultural use | Agrowon

धुरळणी यंत्र फायदेशीर
वैभव सूर्यवंशी
सोमवार, 6 मे 2019

धुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक कीडनाशके पिकांवर धुराळले जातात. धुरळणी करताना या यंत्राचा वापर योग्य काळजीपूर्वक करावा.

हाताने चालविण्याची धुरळणी यंत्रे ः
रूट डस्टर:

 • परस बागेसाठी उपयुक्त.
 • मुख्य भाग लांब काटकोनीय ५० सें. मी. व्यासाचा असतो.
 • यामध्ये साधारण अर्धा किलो कीडनाशक पावडर भरता येते.

बिलो डस्टर ः

धुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक कीडनाशके पिकांवर धुराळले जातात. धुरळणी करताना या यंत्राचा वापर योग्य काळजीपूर्वक करावा.

हाताने चालविण्याची धुरळणी यंत्रे ः
रूट डस्टर:

 • परस बागेसाठी उपयुक्त.
 • मुख्य भाग लांब काटकोनीय ५० सें. मी. व्यासाचा असतो.
 • यामध्ये साधारण अर्धा किलो कीडनाशक पावडर भरता येते.

बिलो डस्टर ः

 • यंत्राच्या खालच्या भागात असलेल्या कातड्याच्या दोन भागांत लहान पेटी बसविलेली असते.
 • त्यामध्ये कीडनाशक पावडर भरली जाते.
 • धुरळणी यंत्राद्वारे एक दिवसात अर्धा हेक्टर क्षेत्रात धुरळणी करता येते.

रोटरी डस्टर:

 • यंत्रामध्ये चेस्ट टाईप आणि शोल्डर टाईप असे दोन प्रकार आहेत.
 • खांद्यावर लटकविण्याचे रोटरी डस्टर हे चेस्ट टाईप धुरळणी यंत्रापेक्षा जास्त लोकप्रिय आहे.
 • कारण, ते वाहून न्यायला व हाताळायला सोपे आहे.
 • यंत्र खांद्याला लटकविण्यासाठी पट्टे असतात.
 • यंत्राचा वापर करताना पट्टे शरीराला बांधतात.
 • ओळींमध्ये पेरणी केलेल्या पिकात सहज आणि सारखी धुरळणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त.
 • यंत्रामधील निमुळत्या भांड्याची क्षमता ४ ते ५ किलो असते.
 • एका दिवसात अर्धा ते एक हेक्टर क्षेत्रातील पिकांवर धुरळणी होते.

यांत्रिक धुरळणी यंत्र:

 • यामध्ये स्वतंत्र इंजिन बसविलेले असते.
 • धुरळणीसाठी यंत्राला इंजिन शक्ती प्रदान करते.
 • धुरळणी यंत्र ट्रॉलीवर बसविलेले असते.
 • यंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात फळझाडांच्या पिकावर धुरळणी करण्यासाठी होतो.
 • यंत्राच्या वापरासाठी २ किंवा ४ अश्वशक्तीच्या इंजिनाची आवश्यकता असते.
 • एका दिवसात ६ ते ८ हेक्टर क्षेत्रामध्ये धुरळणी करता येते.

संपर्क ः वैभव सूर्यवंशी,९७३०६९६५५४
०२५७-२०२०५१०

(विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

इतर टेक्नोवन
शेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...
पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...
हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती यंत्रणादुष्काळी परिस्थिती दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा...
जैवइंधनावर चालणाऱ्या यंत्राची निर्मिती...सध्या पडिक आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीमध्ये...
धुरळणी यंत्र फायदेशीरधुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक...
देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...सध्याच्या काळात पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक...
असे करा ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा...सिन्नर (जि. नाशिक) येथील जनक कुंदे या अभियंता...
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग...नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍...
फुलांचा ताजेपणा टिकविण्यासाठी...घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर...
शेतकऱ्यांना मिळाले क्षारपड जमिनी...उत्तर प्रदेश राज्यात हरदोई जिल्ह्यातील संताराहा...
विहीर, कूपनलिका पुनर्भरण करा, भूजल साठा...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल...
‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीकडून...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स...
कृत्रिम प्रकाशासाठी सोडियम दिव्यांच्या...परदेशाप्रमाणेच आपल्याकडे शेवंतीसह विविध पिकांच्या...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरलेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे,...
महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे रोटरी टोकण यंत्र हे उभ्याने ढकला पद्धतीने...
ट्रॅक्टरचलित न्युमॅटिक प्लॅंन्टरउच्च गुणवत्तेच्या बियाण्यांचा वापर केल्याने...