प्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी

प्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी
प्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी

मातीविना शेतीचे प्रयोग आपल्याला माहीत आहेत; परंतु आता थेट प्रयोगशाळेतच मांस, दूध, अंडी यांसारख्या पदार्थांची निर्मिती करण्याच्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या आहेत. अर्थात एवढ्यावरून पशुपालन, शेती याला हे प्रयोग पर्याय ठरू शकतील, असा निष्कर्ष काढणे सध्या घाईचे ठरेल; परंतु भविष्यात होऊ घातलेल्या बदलांची दिशा नेमकी काय असेल, याची चुणूक यातून मिळते. जगभर या विषयात सुरू असलेल्या घडामोडींचा हा धावता आढावा.

प्राचीन पूर्वजांच्या कहाण्या ऐकताना शिकार करून आणलेले प्राणी आगीवर भाजण्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. माणूस शेतीकडे वळल्यानंतर मिळालेल्या स्थिरतेमध्ये, त्याने शेती व एकूणच पोषणासाठी आवश्यक प्राणी, पक्षी पाळण्याचे तंत्र आत्मसात केले. कदाचित आपल्या भविष्यातील पिढ्यांना मात्र आपण हे तंत्र वापरत असल्याबद्दल आश्चर्य वाटेल. कारण ते कदाचित त्यांच्या स्वयंपाकघरामध्येच मांसनिर्मिती करणाऱ्या यंत्रात एखाद्या पेट्री डिशमध्ये मांसाचे स्लाईस तयार करत असतील. हे स्वप्नरंजन नाही. दूध, मांस किंवा अंड्यासाठी प्राणी, पक्षी पाळणे हे भविष्यात अप्रस्तूत ठरणार असल्याचे भाकित या क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.  

वाढता पाठिंबा अमेरिकेतील ‘गुड फूड इन्स्टिट्यूट’ ही स्वयंसेवी संस्था प्रामुख्याने वनस्पतीजन्य आहार, स्वच्छ मांसाचा पुरस्कार करते. त्यातही नाविन्यपूर्ण प्राणी विरहीत मांस या विषयावर भर दिला आहे. या संस्थेच्या प्रवक्त्या एमिली ब्रायड म्हणतात, ‘मांस तर खायचे आहे, पण कोणत्याही प्राण्याची हत्या करणे किंवा जीव घेणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. अशा स्थितीमध्ये हे प्रयोगशाळेत नव्याने विकसित केलेले मांस अत्यंत उपयुक्त ठरेल.  मांस म्हणजे स्नायूंचा एक भाग. नैसर्गिकरीत्या काही पेशींची वाढ होत जाड अशा थरामध्ये त्यांची निर्मिती होते. ही प्रक्रिया प्राण्यांच्या शरीरात होते. अशीच प्रक्रिया प्रयोगशाळेत केल्यास त्यात अनैतिक वाटण्यासारखे काय आहे’ गेल्या काही वर्षामध्ये शास्त्रज्ञ शरीराबाहेर स्वतः वाढणाऱ्या पेशींच्या साह्याने स्नांयूंच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यातून मांसाची निर्मिती शक्य असल्याचे त्यांचे मत आहे.  (अधिक वाचा ॲग्रोवन दिवाळी अंकात) याशिवाय.... संकल्पनात्मक लेख

  •  टोळीराज्य आणि बळी : अतुल देऊळगावकर 
  •  शेतीचं ‘इंटेलिजंट’ भविष्य : सम्राट फडणीस
  •  प्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी : सतीश कुलकर्णी
  •  जीएम तंत्रज्ञानाचे अडखळलेले पाऊल : डॉ. सी. डी. मायी
  •  मॉन्सूनचे भवितव्य : डॉ. रंजन केळकर
  •  कॉर्पोरेट फार्मिंग आणि रोबोट युगाची नांदी : मनोज कापडे  
  • अनुभव 

  • कोरडवाहू दुष्टचक्र आणि माझे म्हशीपालनाचे प्रयोग : महारुद्र मंगनाळे
  • धांडोळा

  • भविष्याच्या पोटात शेतकऱ्यांसाठी अमाप संधी : राजेंद्र जाधव   
  • भविष्यातली शेती असावी पर्यावरण अनुकूल : डॉ. नीलेश हेडा   
  • ग्रामीण भारतासाठी अलीबाबाची गुहा : उदय अ. देशमुख   
  • पर्माकल्चर...एक आनंदी प्रयोग : डॉ. मयूरा बिजले  
  • मुलाखती 

  • कॉर्पोरेट फार्मिंग नव्हे; समूह शेती हेच भविष्य : विलास शिंदे  
  • इनोव्हेशन हीच भविष्याची गुरुकिल्ली :  प्रा. अनिल गुप्ता  
  • ललित 

  • कथा 
  • नवस : द. ता. भोसले   
  • लाल सावट : सुभाष किन्होळकर  
  • ललित लेख 

  • व्हिलेज डायरी : आकाश चटके   
  • आठवणीतली दिवाळी - कल्पना दुधाळ  
  • तुमी मॅडम कशाला झाल्या कायनू? : भाऊसाहेब चासकर  
  • माझ्या सिनेमाची गोष्ट : राजकुमार तांगडे
  • कविता

  • व्यंग्यचित्रे
  • राशिभविष्य
  • ​ (अंक सर्वत्र उपलब्ध, विक्रेत्याकडे संपर्क साधावा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com