Agriculture stories in Marathi, banana crop advisory , AGROWON, Maharashtra | Agrowon

केळी पीक सल्ला
     नाझेमोद्दीन शेख,अंजली मेंढे, डॉ. राकेश सोनवणे 
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सद्यःस्थितीत जून-जुलै महिन्यांतील केळीची मृगबाग वाढीच्या अवस्थेत आहे. गेल्यावर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यातील कांदेबागेत घड पक्वतेच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे बागेच्या अवस्थेनुसार खत,पाणी व इतर बाबींचे व्यवस्थापन करावे. 

पावसाळी हंगामात असणारी हवेतील आर्द्रता व तापमान या घटकांमुळे केळी बागेत रोग, किडींचा प्रादुर्भाव होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केळी बागेत पुढीलप्रमाणे नियोजन करावे. 

नियोजन  : 

सद्यःस्थितीत जून-जुलै महिन्यांतील केळीची मृगबाग वाढीच्या अवस्थेत आहे. गेल्यावर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यातील कांदेबागेत घड पक्वतेच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे बागेच्या अवस्थेनुसार खत,पाणी व इतर बाबींचे व्यवस्थापन करावे. 

पावसाळी हंगामात असणारी हवेतील आर्द्रता व तापमान या घटकांमुळे केळी बागेत रोग, किडींचा प्रादुर्भाव होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केळी बागेत पुढीलप्रमाणे नियोजन करावे. 

नियोजन  : 

 • बाग तणमुक्त करावी. 
 • बागेत पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढावे. बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी. 
 • मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृग बागेस ठिबकसिंचन संचातून विद्राव्य खते द्यावीत. त्यासाठी प्रति हजार झाडांसाठी प्रति आठवडा ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ठिबक संचातून सोडावे. 
 • ठिबकसिंचन संच नसल्यास मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृग बागेस जमिनीतून प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया, ३७५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश बांगडी पद्धतीने किंवा खड्डा करून घेऊन द्यावे. खत दिल्यानंतर मातीआड करावे. 
 • निसवणीच्या/ घड पक्वतेच्या अवस्थेतील कांदेबागेस विद्राव्य खते देताना प्रतिहजार झाडांसाठी प्रति आठवडा ५.५ किलो युरिया व ७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यातून सोडावे. 
 • ठिबकसिंचन संच नसल्यास निसवणीच्या व घड पक्‍वतेच्या अवस्थेतील बागेस प्रतिझाड ३६ ग्रॅम युरिया अधिक ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश अशी खतमात्रा द्यावी.  
 • केळीचा घड पूर्ण निसवल्यावर केळफूल तोडून टाकावे. केळफूल तोडल्यानंतर घडावर पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट ५० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम अधिक सर्फेक्टंट १० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
 • नवीन केळी बागेस लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात इडीटीए -जस्त आणि इडीटीए - लोह यांची प्रत्येकी ०.५ टक्के (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ) तीव्रतेची फवारणी करावी. 
 • केळी बागेभोवताली वाराप्रतिरोधक म्हणून सजीव कुंपण (शेवरी) लावावे. 

पीक संरक्षण : 
करपा नियंत्रण :

 • करपाग्रस्त पानाचा भाग किंवा रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन त्यांचा नाश करावा.
 • फवारणी (प्रतिलिटर पाणी) प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक सर्फेक्‍टंट १ मि.लि. किंवा प्रोपीकोनॅझोल ०.५ मि.लि. अधिक मिनरल ऑइल १० मि.लि. किंवा कार्बेन्डाझीम ०.५ ग्रॅम अधिक मिनरल ऑइल १० मि.लि. 

सूचना : बुरशीनाशकांची आवश्‍यकतेनुसार आलटून पालटून फवारणी करावी.

फूलकीड नियंत्रण :

 • फवारणी (प्रतिलिटर पाणी) फिप्रोनील (५ एस.सी.) १.५ मि.लि.
 • फवारणीची वेळ : निसवणीच्या अवस्थेत असलेल्या बागांमध्ये शेवटचे पान बाहेर निघताना किंवा केळफूल बाहेर पडत असताना बेचक्‍यातील केळफुलावर फवारणी करावी.  

संपर्क  ः ०२५७ -२२५०९८६
(केळी संशोधन केंद्र, जळगाव)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर फळबाग
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
आंबा मोहोराच्या संरक्षणासाठी राहा सज्जसद्यःस्थितीत कोकण विभागामध्ये आंबा पिकामध्ये...
फळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी...सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी...
द्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजनासध्या द्राक्षबागेतील वेली या वाढीच्या विविध...
शून्य मशागत तंत्रातून जोपासली द्राक्ष...गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुरेश...
काटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा...
स्टेम गर्डलर बीटलसाठी एकात्मिक कीड...सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान...
द्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे; (३० ते ३५ अंश...
उष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासकगत दहा वर्षांपासून खजूर लागवड वाढवण्यासाठी गुजरात...
संत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे...संत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे...
द्राक्ष कलम करण्याची पद्धतीखुंटरोपाची निवड डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा...
केळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापनकेळी पिकाची लागवड योग्य अंतरावर करून...
फळपीक सल्लापेरू १) मिलिबग ः डायमेथोएट १.५ मि.लि. किंवा क्‍...
मोसंबी फळगळीवरील उपाय कारणे   रोगग्रस्त, कीडग्रस्त...
फळपीक व्यवस्थापन सल्लाअंजीर ः १) जमिनीपासून तीन फुटापर्यंत एकच खोड...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...