Agriculture stories in Marathi, benefits of new technology to increase income,Agrowon,Maharashtra | Agrowon

नवं तंत्र, पूरक उद्योगामुळे उत्पन्नात झाली वाढ
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

उत्तर पूर्वेकडील राज्याच्या दक्षिण गोरो हिल्स जिल्ह्यातील अकरा गावांच्यामधील शेतकरी सुधारित पद्धतीने शेती व्यवस्थापनाकडे वळले आहेत. या शेतकऱ्यांनी शेतीच्या बरोबरीने कुक्कुटपालन, वराहपालन, बदकपालनास सुरवात केली आहे. पूरक उद्योगामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

पूरक उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांना भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या बारापानी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. तंत्रज्ञान प्रसारासाठी आरआरटीसी या स्वयंसेवी संस्थेची चांगली मदत झाली आहे. 

उत्तर पूर्वेकडील राज्याच्या दक्षिण गोरो हिल्स जिल्ह्यातील अकरा गावांच्यामधील शेतकरी सुधारित पद्धतीने शेती व्यवस्थापनाकडे वळले आहेत. या शेतकऱ्यांनी शेतीच्या बरोबरीने कुक्कुटपालन, वराहपालन, बदकपालनास सुरवात केली आहे. पूरक उद्योगामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

पूरक उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांना भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या बारापानी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. तंत्रज्ञान प्रसारासाठी आरआरटीसी या स्वयंसेवी संस्थेची चांगली मदत झाली आहे. 

या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक म्हणजे भात. पारंपरिक पद्धतीने लागवड करण्याएेवजी हे शेतकरी आता एसआरआय पद्धतीने भात लागवडीकडे वळले आहेत. शिवबारी, दिपलीपारा, जदुगिरी या गावांच्याबरोबरीने परिसरातील सात गावांतील शेतकऱ्यांना पूर्वी पारंपरिक पद्धतीने भाताचे १.५ टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळत होते. हेच उत्पादन आता ४.८ टन प्रति हेक्टरवर गेले आहे.

उत्पादनाच्या वाढीमुळे परिसरातील इतर गावातील शेतकरी आता एसआरआय पद्धतीने भात लागवडीकडे वळले आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती पद्धतीमध्ये चांगला बदल दिसून आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे लागवड योग्य जमीन आहे ते सुधारित पीक पद्धतीचा अवलंब करीत आहेत. ज्यांच्याकडे शेती नाही असे लोक शेळीपालन, वराहपालनाकडे वळाले. त्यामुळे वर्षभराचे उत्पन्नाचे साधन त्यांना मिळाले आहे. 

ज्या शेतकऱ्यांच्याकडे छोटी शेततळी आहेत,ते शेतकरी मत्स्यपालन करतात. त्यामुळे या भागातील मत्स्यउत्पादनातही चांगली वाढ झाली आहे. काही शेतकरी बदकपालनाकडे वळले आहेत. या भागातील बहुतांश महिला परसबागेत बदक पालन करतात. बदक सांभाळण्यासाठी फारसा खर्च नाही, तसेच परिसरात बदकांना चांगली मागणी असल्याने विक्रीही चांगल्या प्रकारे होते. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं...येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो...कऱ्हाड, जि. सातारा  ः रखरखत्या उन्हात राबून...
कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील...पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख...औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
ग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९...अकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर...
यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा...वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी...
सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या...पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती...
सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा... सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण...
पुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख...पुणे  ः खरीप हंगामासाठी विभागीय कृषी...
हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात... हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी... नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार...
अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’ नगर  ः ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं...
जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे... जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत...
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...