Agriculture stories in Marathi, betelvine crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

पानवेल पीक सल्ला
मिलिंद जोशी, योगेश इंगळे, श्‍यामसुंदर माने
रविवार, 17 डिसेंबर 2017

पानवेल या पिकास आर्द्रता, सावली, जमिनीतील पुरेसा ओलावा ह्या बाबी मानवतात. मात्र सद्यस्थितीत काही कीड व राेग यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता अाहे. त्यादृष्टिकोनातून पीकसंरक्षणाच्या उपाययोजना कराव्यात. योग्य ओलावा व्यवस्थापन व खतमात्रा द्याव्यात.  

पानवेल या पिकास आर्द्रता, सावली, जमिनीतील पुरेसा ओलावा ह्या बाबी मानवतात. मात्र सद्यस्थितीत काही कीड व राेग यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता अाहे. त्यादृष्टिकोनातून पीकसंरक्षणाच्या उपाययोजना कराव्यात. योग्य ओलावा व्यवस्थापन व खतमात्रा द्याव्यात.  

 • थंड हवामानामुळे पानांचा आकार कमी होऊन पानाला सुरकुत्या पडतात. झाडाची वाढही खुंटते. त्यामुळे हिवाळ्यात पानवेलीचे संरक्षण करण्यासाठी बागेच्या चारही बाजूंनी गवताच्या किंवा बांबूच्या ताट्या लावाव्यात. 
 • जिवंत आधार वृक्षांची (पांगारा, हेटा, शेवगा) छाटणी करु नये. त्यामुळे वरील बाजूने पानवेलीचे थंडीपासून संरक्षण होते. 
 • जमिनीच्या मगदुरानुसार ५-९ दिवसांच्या अंतराने सायंकाळच्या वेळेस हलके ओलित करावे. जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. 
 • बागेत उष्णता राहावी यासाठी बागेभोवती ओला व सुका काडीकचरा गोळा करून धूर करावा. 
 • निंबोळी ढेप किंवा तत्सम सेंद्रिय खताची मात्रा १० क्विंटल प्रतिहेक्टर याप्रमाणात द्यावी. 
 • सॅलिसिलिक आम्लाच्या फवारणीमुळे पानवेलींची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे सॅलिसिलिक आम्ल १० पीपीएम (१० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) याप्रमाणात पानांवर फवारणी करावी. 
 • रासायनिक खतांमध्ये नत्राची मात्रा ५० किलो प्रतिहेक्टरी याप्रमाणात अमोनियम सल्फेटच्या स्वरुपात द्यावी. 
 • वाफ्यांमध्ये गवताचे किंवा पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन बाग ऊबदार राहण्यास मदत मिळते. 

पीक संरक्षण : 

 • सद्यस्थितीतील वातावरण मर रोगाचा प्रादुर्भाव होण्यास अनुकूल आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ट्रायकोडर्मा बुरशी १ किलाे अधिक ९ किलो चांगले कुजलेले शेणखत याप्रमाणात मिश्रण करून ते १०० ग्रॅम प्रतिचौरस मीटर क्षेत्रास वेलीच्या मुळाशी जमिनीत मिसळावे.
 • पानावरील बुरशीजन्य ठिपके रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता आहे. नियंत्रणासाठी कॉपरऑक्सिक्लोराइड (५० टक्के विद्राव्य) ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. तसेच याकाळात पायकूज रोगाचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. नियंत्रणासाठी कॉपरऑक्सिक्लोराइड (५० टक्के विद्राव्य) ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात द्रावण तयार करून मुळाशी आळवणी करावी. 
 • मावा, मिली बग व ढेकण्या या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या किडी पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पानाची प्रत खराब होते. नियंत्रणासाठी १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा मॅलाथिऑन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. फक्त ढेकण्या याच किडीचा प्रादुर्भाव असल्यास विद्राव्य गंधक २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. 
 • रोगट वेली उपटून नष्ट कराव्यात. फवारणीनंतर कमीतकमी १५ दिवस पानांची ताेडणी करू नये. 
 • सूचना - मावा, मिलीबग व ढेकण्या या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलाथिऑनच्या फवारणीस लेबल क्लेम नाही. मात्र शिफारस संशोधनावर आधारित आहे.

संपर्क : मिलिंद जोशी, ७५८८५०३०९१
(डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...