पशूपालन सल्ला

जनावरांच्या समस्या
जनावरांच्या समस्या

कालवडीचे वजन २२५ ते २५० किलोच्या जवळपास असता ती माजावर येते. देशी जनावरांपेक्षा संकरित व परदेशी जातीची वासरे अतिशय झपाट्याने वाढतात. त्यांना देण्यात येणारा आहार हा वाढीचा व उत्तम प्रकारचा हवा. स्थानिक/देशी जातीच्या वासरांची वाढ झपाट्याने होत नसल्यामुळे वयात येण्यासाठी त्यांना संकरित व परदेशी वासारांपेक्षा दुप्पट वेळ लागतो. जनावरांची वाढ मुख्यत्वे आनुवंशिकता व आहार यावर अवलंबून असते. तीन महिन्यांच्या आत गाय व म्हैस माजावर यायला हवी अशी अपेक्षा असते, परंतु विताना झालेला त्रास व झीज, एकंदरीत जनावरांची तब्येत यांवर ते अवलंबून असते. जनावर हे माजावर आल्यानंतर गाभण राहणे आवश्यक असते. जनावरातील माजाचे ऋतुचक्र :  गाय, म्हैस एकदा माजावर आली असे दिसता तिला भरविले नाही किंवा ती गाभण राहिली नाही तर पुन्हा २१ दिवसांनी माजावर येते. माजावर आल्यानंतर १२ ते २४ तासांच्या वेळेत कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करून जनावर भरविल्यास गाभण राहण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत असते. काळच्या वेळी माजावर आल्यास सायंकाळी व दुसऱ्या दिवशी सकाळी भरवावे. जर सायंकाळी माजावर आले असता दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी भरवावे. जर गाई, म्हशीचा एक माज ओळखण्यात असक्षम ठरल्यास भाकडकाळ हा पुढील २१ दिवसांनी लांबतो. मग तेवढ्या दिवसांचा पालन पोषणाचा खर्च अधिक वाढतो. वासरांची संख्या कमी मिळते. जनावरांतील माजाबद्दलच्या काही महत्त्वाच्या बाबी : 

  • काही जनावरे माजावर असताना सुद्धा काही बाह्यरूपी लक्षणे दाखवीत नाहीत. अशा अप्रत्यक्ष माजाला मुक्त माज किंवा व्यक्त न होणारा माज असे म्हणतात 
  • साधारणतः रात्री ८ ते पहाटे ५ पर्यंत जनावर माजावर येण्याचे प्रमाण जास्त असते.
  • संकरित गायी, म्हशींच्या काही जातींमध्ये तिसऱ्या ते चौथ्या दिवशी थोडा रक्तस्राव बाहेर येतो. ३ ते ५ टक्के  काही गाभण गायीसुद्धा माज दाखवितात.
  • ४० ते ४५ टक्के गायी माजावर नियमितपणे येतात, १० ते १५ टक्के माजावरच येत नाहीत 
  • जनावर नियमित माजावर येण्यासाठीचांगला, सकस आहार, उत्तम पोषण आणि देखभालाची आवश्यकता  असते.
  • नसबंदी केलेल्या वळूच्या साह्यानेही माज ओळखणे सोपे जाते.
  • कृत्रिम रेतन योग्य वेळीच करावे किंवा नैसर्गिक पद्धतीने योग्य वेळी वळू दाखवावा.
  • २ ते ३ वेळा जनावर माजावर येऊन सुद्धा गाय व म्हैस गाभण राहत नाही असे निदर्शनास आल्यास लैंगिक तपासणी व योग्य तो उपचार पशुवैद्यकीयांकडून करून घ्यावा.
  • संपर्क : प्रा. अजय गवळी, ८००७४४१७०२ (सहायक प्राध्यापक, पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के..वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com