Agriculture stories in Marathi, chiku crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

चिकू पीक सल्ला
डाॅ. एस. बी. गंगावणे,  ए. एस. ढाणे
रविवार, 26 नोव्हेंबर 2017

चिकू फळपिकात सद्यस्थितीत फळातील बी पोखरणारी अळी, फुलकळी पोखरणारी अळी, पाने व कळ्या खाणारी अळी, खाेड पोखरणारी अळी आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. झाडांची दाटी असल्यास या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

चिकू फळपिकात सद्यस्थितीत फळातील बी पोखरणारी अळी, फुलकळी पोखरणारी अळी, पाने व कळ्या खाणारी अळी, खाेड पोखरणारी अळी आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. झाडांची दाटी असल्यास या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

फळातील बी पोखरणारी अळी :
कारणे :  या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुन्या बागांमध्ये आढळतो. अशा बागांमध्ये मोठी आणि एकमेकांत फांद्या मिसळलेली झाडांमुळे पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहत नाही. अशा बागांमध्ये फवारणी व आंतरमशागत परिणामकारकरीत्या होत नाही. बागेकडे दुर्लक्ष आणि अस्वच्छता हे या अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमुख कारण ठरते. 
नियंत्रण :  बागेत स्वच्छता राखावी. 
झाडांची योग्य छाटणी करून बागेत पुरेसा सूर्यप्रकाश येईल, असे नियोजन करावे. 
झाडावरील कीडग्रस्त व गळालेली सर्व फळे व पालापाचोळा गोळा करून जाळून नष्ट करावीत. 
रासायनिक नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर 

 • इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के) ०.५ मि.लि. किंवा
 • नोव्हॅल्युराॅन (१० टक्के) ०.५ मि.लि. किंवा 
 • डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के) १ मि.लि. किंवा 
 • निंबोळी अर्क - ५ टक्के किंवा 
 • अॅझाडिरॅक्टीन (५०,००० पीपीएम) - ०.५ मि.लि. 
  सूचना : फवारणीपूर्वी फळे काढावीत.

फुलकळी पोखरणारी अळी :
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर 

 • इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम किंवा 
 • डेल्टामेथ्रिन (२.८ टक्के) १ मि.लि. किंवा 
 • लॅम्डा सायहॅलोथ्रिन (५ टक्के) १ मि.लि. किंवा 
 • निंबोळी अर्क - ५ टक्के किंवा 
 • अॅझाडिरॅक्टीन (५०,००० पीपीएम) - ०.५ मि.लि. 

पाने आणि कळ्या खाणारी अळी :
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर 

 • क्विनाॅलफाॅस (२५ टक्के) २ मि. लि. किंवा 
 • निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा 
 • अॅझाडिरॅक्टीन (५०,००० पीपीएम) - ०.५ मि.लि. 
  सूचना : अळीने फांद्यावर तयार केलेली पानांची जाळी आतील अळीसह काढून त्यांचा नाश करावा.

खोड पोखरणारी अळी : 
नियंत्रण : - ही अळी खोडाच्या सालीखालील पेशीवर उपजीविका करते. अळीचा मार्ग शोधून अळीचा नायनाट करावा. कीडग्रस्त 
फांद्या काढून जाळून टाकाव्यात. खोडावरील अथवा फांद्यावरील क्लोरपायरीफॉस (२० इ.सी.- २ मि.लि. प्रतिलिटर पाणी) द्रावणात बुडविलेल्या कापसाच्या बोळ्याने चिमट्याच्या सहाय्याने बंद करावे. 

संपर्क :  ए. एस. ढाणे, ७०२८०६५६२६, 
(कृषी संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...