शेतकऱ्यांसाठी हक्‍काची बाजारपेठ- नागपूर नॅचरल

नागपूर नॅचरल हा ब्रॅंड राज्याच्या प्रत्येक भागाच्या अोळखीनुसार नैसर्गिक उत्पादनांना मार्केट मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच ‘नागपूर नॅचरल' असे नाव आम्ही आमच्या केंद्राला दिले आहे. याच धर्तीवर अमरावती नॅचरल या आउटलेटची उभारणी शेतकरी करणार अाहेत. -हेमंत चव्हाण नागपूर नॅचरल शेतमाल ब्रॅंड
नागपूर नॅचरल विक्री केंद्रातील उत्पादनांविषयी माहिती देताना हेमंत चव्हाण. तसेच विविध उत्पादने
नागपूर नॅचरल विक्री केंद्रातील उत्पादनांविषयी माहिती देताना हेमंत चव्हाण. तसेच विविध उत्पादने

नागपूर येथील कृषी पर्यवेक्षक हेमंत चव्हाण यांनी नैसर्गिक शेतीतून उत्पादित मालाला नागपूर नॅचरल या विक्री केंद्राच्या माध्यमातून हक्‍काची बाजारपेठ मिळवून दिली आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांतील सुमारे चारशे शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांच्याकडील अन्नधान्य, दूध, ताजा भाजीपाला-फळे यांची विक्री नागपुरात थेट ग्राहकांना होत आहे. शेतमाल मार्केटिंगचे त्यांचे माॅडेल अभ्यासण्यासारखे आहे.   सध्या नागपूर येथे कदीमबाग नर्सरी येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून हेमंत चव्हाण कार्यरत आहेत. ते मूळ गोंदियाचे. या जिल्ह्यात त्यांची शेती होती. परंतु नोकरीमुळे तिकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याने आणि गोंदियाहून नागपूरला बदली झाल्याने त्यांनी ही शेती विकली. ‘फील्ड’वरील नोकरी ते नागपुरातील विक्री केंद्र प्रवास टप्पा १- सन १९९१ नंतर रामटेक (जि. नागपूर) परिसरात चव्हाण नोकरीत कार्यरत होते. या परिसरात आदिवासीबहुल वस्ती आहे. या पुढील काळात नैसर्गिक शेती पद्धतीचे अन्न, त्यावर आधारीत आरोग्य व दुसऱ्या बाजूला शहरातील मानवी आरोग्य व आहार यांचा त्यांनी अभ्यास केला. -या सर्व शेती तंत्रांचा केला अभ्यास

  • नैसर्गिक
  • सेंद्रिय
  • रासायनिक
  • त्यातून निवड केली नैसर्गिक शेतीची
  • कर्नाटक, केरळ या राज्यातील शेतकऱ्यांच्या शिवारांना भेटी देत हे तंत्र अधिक समजून घेतले. ठेवलेले उद्दिष्ट - केवळ नैसर्गिक शेती करून फायद्याची नाही. त्या उत्पादनांना बाजारपेठ दिली तरच शेतकरी प्रगतिशील होईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.
  • विक्री व्यवस्थेचा पहिला प्रयत्न

  • धान्य महोत्सव- (तीनदिवसीय) सन २००९ ते २०१४ या काळात शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून विविध ठिकाणी
  • यातून उलाढाल व्हायची- सुमारे ३० लाख रुपये
  • महोत्सवासाठी कोणतेही अनुदान नसल्याने स्टॉलधारक इच्छुकाकडून दोन हजार रुपये आकारले जायचे.
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी या महोत्सवांना भेटी देत उपक्रमाचे केले कौतुक.
  • स्टॉल ग्राहक म्हणायचे की तुम्ही तीन दिवसांपुरताच विविध दर्जेदार माल देता. आम्हाला तर वर्षभर हवा आहे. तसा पुरवत चला. ग्राहकांचा हा फीडबॅक लक्षात घेऊन तशा कामास सुरवात आजचे विक्री व्यवस्था मॉडेल

  • भाडेतत्त्वावरील विक्री केंद्र- रामदास पेठ, लेंड्रा पार्क, नागपूर
  • केंद्राचे नाव- नागपूर नॅचरल
  • -येथे काय मिळेल?

  • ताजे प्रकार- भाजीपाला, फळे (उदा. संत्रा, लिंबू, सीताफळ, गावरान पपई आदी)
  • अन्य-तांदूळ वा अन्नधान्ये, विविध डाळी, हळद, आले, मसाले
  • गीर गायीचे दूध- ६० रुपये प्रति लिटर. होम डिलिव्हरी- ८० ग्राहक
  • तूप- १५०० रुपये प्रति किलो
  • माल कोण देते?

  • सुमारे ४०० शेतकरी
  • सहा जिल्हे- वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर
  • ताजा भाजीपाला, फळे- नागपूर- ७० किलोमीटर परिघातील
  • अन्य शेतमाल- नागपूर १५० किलोमीटर परिघातील
  •   शेतकऱ्यांना मिळणारे दर उदा. गहू. बाजार समितीतील दर- १५ रुपये प्रति किलो ग्राहक दर- २५ ते ३० रुपये. तर हाच दर शेतकऱ्यांच्या पदरात पडतो. पुढे याच दरात २० टक्के वाढ करून ग्राहकांना तो दिला जातो. म्हणजेच शेतकऱ्याचा वाचतो- अडत, हमाली, तोलाई आदी खर्च   भाजीपाला वर्षभर किलोला २० रुपये हमी दर. समजा एखाद्या शेतमालाला दर ८० रुपये प्रति किलो दर बाजारात पोचला तर या शेतकऱ्यांनाही त्याच्या जवळपास जाणारा दर दिला जातो.   ‘नागपूर नॅचरल’ विक्री व्यवस्थेतील सहभागी

  • १० शेतकऱ्यांची कोअर कमिटी
  • दर आठवड्याला होते त्यांची बैठक. त्यात पुढील कामकाजाचे नियोजन
  • 'नागपूर नॅचरल’ केंद्राच्या उभारणीसाठी कमी पडणारी काही रक्कम दहा शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० हजार रुपये देऊन उभी केली.
  • एप्रिल २०१७ मध्ये चव्हाण व अन्य शेतकऱ्यांकडून सेंद्रिय राज्य सिक्‍कीमचा दौरा केला. यावेळी नैसर्गिक शेती उत्पादक म्हणून राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी गटाच्या कार्याची विशेष प्रशंसा केली. 
  • अर्थकारण (मासिक)

  • जागेचे भाडे- २५ हजार रुपये
  • उलाढाल- तीन लाख रुपये
  • मेंटेनन्स खर्च- २० टक्के
  • फायदा- २० टक्के. मात्र हीच रक्कम मेंटेनन्स वा अन्य कामांसाठी वापरली जाते. सद्यस्थितीत केंद्राचे काम ना नफा ना तोटा तत्त्वावर
  • मान्यवरांकडून कौतुक यांचे लाभले मार्गदर्शन - तत्कालीन कृषी सहसंचालक विजय घावटे, डॉ. जे.एस. भुतडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, डॉ. अर्चना कडू, प्रभारी कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी पंढरी डाकळे. विशेष म्हणजे पुढील जानेवारीत चव्हाण सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर विक्री व्यवस्तेवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपर्क- हेमंत चव्हाण - ७५८८६९०६८८, ९१३०००१२१३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com