अधिक आवकेच्या अंदाजाने साखर, कापसाच्या दरात घसरण

अधिक आवकेच्या अंदाजाने साखर, कापसाच्या दरात घसरण

गेल्या सप्ताहात कापूस, साखर, गहू व गवार बी यांचे दर वाढले, तर सोयाबीन व हरभऱ्याचे उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, हळद व गवार बीचे दर वाढतील. साखर, मका व कापसाचे दर अधिक आवकेच्या अपेक्षेने कमी होतील. 

एनसीडीइएक्समधील ६ ऑक्टोबरपासून मिरचीचे सर्व फ्युचर्स व्यवहार बंद करण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस मिरचीसाठी काहीच ट्रेडिंग चालू नव्हते. हेसुद्धा एक कारण असू शकेल. खरीप पिकाची आवक आता सुरू झाली आहे. मात्र, अजून त्याचे प्रमाण कमी आहे. मालाची प्रत कमी असल्याने भावसुद्धा पडून आहेत. सोयाबीनच्या किमती हमी दरापेक्षा कमी आहेत; पण त्या मुख्यत्वे त्यातील ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने आहेत. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (नोव्हेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. १,५५४ ते   रु. १,३७४).  या सप्ताहात त्या रु. १,३७४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,४१७ वर आल्या आहेत. जानेवारीमधील फ्युचर्स किमती रु. १,३८९ वर आल्या आहेत. हमी भाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी  तो रु. १,४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनावर होणार आहे. (गेल्या वर्षीचे उत्पादन : १९.२४ दशलक्ष टन). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र, खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती घसरण्याचा संभव आहे.  साखर साखरेच्या (डिसेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ३,४२५ ते रु. ३,३५१). या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. ३,४०० वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,६५२ वर आल्या आहेत.  पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३५१ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. सणामुळे मागणी वाढती आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते  ३३७.३ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३०६.७ दशलक्ष  टन).  हळद हळदीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ७,८०८ ते ७,३६६). या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,३२४ वर आल्या आहेत.  स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३८० वर आल्या आहेत.  एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत  (रु. ७,५१८).  तेलंगण व कर्नाटक मध्ये पावसाची तूट गेल्या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात भरून निघाली आहे. त्यामुळे वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे.  सोयाबीन  सोयाबीन फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती २२ सप्टेंबर महिन्यात २२ तारखेपासून घसरू लागल्या आहेत. (रु. ३,१५६ ते रु. ३,०३३).  या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. २,८९४ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. २,८४४ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,०६९ वर आल्या आहेत.  हमी भाव (बोनस सहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी सोयाबीनचे उत्पादन घसरून १२.२ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : १३.८ दशलक्ष  टन). मात्र अमेरिकेतील व जागतिक उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती घसरण्याचा संभव आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमती हमी भावाच्या आसपास राहतील.  गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात रु. ३,६८२  ते रु. ३,९४८ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या ४.८ टक्क्यांनी वाढून रु. ३,८७८  वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ३,८५० वर आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जानेवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती ४.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,०१९). राजस्थान मध्ये पाऊस समाधानकारक झाला आहे. मात्र मागणी वाढती आहे. गहू      सप्टेंबर महिन्यात गव्हाच्या (नोव्हेंबर २०१७) किमती घसरत होत्या. (रु. १,६८२ ते  रु. १,६४३).  या सप्ताहात त्या ४ टक्क्यांनी वाढून रु. १,७०७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली)  रु. १,८०२ वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.८  टक्क्यांनी कमी आहेत. (रु. १,७५१). मर्यादित घसरण अपेक्षित आहे.   हरभरा सप्टेंबर महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती प्रथम वाढत होत्या (रु. ५,८४३ ते ६,१०५).  १५ सप्टेंबर नंतर त्या घसरू लागल्या  व महिनाअखेर त्या रु. ५,६१३ पर्यंत आल्या.  या सप्ताहात त्या आणखी २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,३१४ वर आल्या आहेत.  स्पॉट (बिकानेर) किमती रु. ५,३१३ वर आल्या आहेत.  जानेवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३.५ टक्क्यांनी कमी आहेत (रु.५,१२६).  रबी पिकाचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. मार्च एप्रिलमध्ये किमतींत आणखी उतरण होण्याची अपेक्षा आहे (मार्च डिलिवरी चा सध्याचा भाव रु. रु. ४,६९२ आहे). रबी उत्पादन घेताना हेजिंगचा विचार करावा. 

कापूस 

एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा घसरत होत्या (रु. १९,०७० ते रु. १८,०३०).  २१ सप्टेंबरनंतर त्या वाढू लागल्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. १८,६३० वर आल्या आहेत.  स्पॉट (राजकोट) किमती  रु. १९,०६० वर आलेल्या आहेत. जानेवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १८,६१०).  २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती घसरण्याचा संभव आहे.  इमेल ः arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com