Agriculture stories in Marathi, control of tobacco streak virus in cotton, AGROWON, Maharashtra | Agrowon

कपाशीवरील टोबॅको स्ट्रीक व्हायरस रोगाचे नियंत्रण
डॉ. शैलेश गावंडे,  डॉ. दीपक नगराळे,  डॉ. नंदिनी गोकटे-नरखेडकर
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

सध्या कपाशीवर फूलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. फूलकिडीमुळे टोबॅको स्ट्रीक व्हायरस हा अत्यंत नुकसानकारक विषाणूजन्य रोगही कपाशीवर संक्रमित होतो. त्यामुळे या रोगाचे एकात्मिक रोगव्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करावे.

टोबॅको स्ट्रीक व्हायरस हा रोग प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळतो. परंतु, काही वर्षांपासून मध्य भारतातही त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी त्याच्या लक्षणांचा अभ्यास करून उपाययोजना कराव्यात. 

सध्या कपाशीवर फूलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. फूलकिडीमुळे टोबॅको स्ट्रीक व्हायरस हा अत्यंत नुकसानकारक विषाणूजन्य रोगही कपाशीवर संक्रमित होतो. त्यामुळे या रोगाचे एकात्मिक रोगव्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करावे.

टोबॅको स्ट्रीक व्हायरस हा रोग प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळतो. परंतु, काही वर्षांपासून मध्य भारतातही त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी त्याच्या लक्षणांचा अभ्यास करून उपाययोजना कराव्यात. 

रोगाची प्रमुख लक्षणे : 
रोगाचा प्रसार हा फूलकिड्यांमार्फत होतो. प्रादुर्भावामुळे कपाशीच्या कोवळ्या पानांच्या कडा सुकून जातात. जांभळट व तांबड्या रंगाच्या दिसतात व झाडाची वाढ खुंटते. रोगाची तीव्रता प्रामुख्याने गाजरगवताच्या पराग कणांचा संसर्ग, त्याची संख्या, फुलकिड्यांचे प्रमाण व त्यांची झाडांवरील हालचाल या गोष्टींवर अवलंबून असते. महाराष्ट्रामध्ये हा रोग प्रामुख्याने ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान आढळून येतो. 

एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन : 

  • पिकातील रोगग्रस्त काडीकचरा गोळा करून शेताबाहेर त्याची विल्हेवाट लावावी.
  • शेताभोवतीच्या गाजरगवताचे नियंत्रण करावे. कारण गाजरगवताच्या संक्रमित परागकणांमुळे फूलकिड्यांमार्फत या रोगाचा कपाशीमध्ये प्रसार होतो.
  • रोगाला बळी पडणाऱ्या दुसऱ्या पिकांची पाहणी करून ती नष्ट करावीत.
  • रोगाचा वाहक असलेल्या फूलकिड्यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी. 
    फवारणी प्रतिलिटर पाणी बुप्रोफेझीन (२५ टक्के एस.सी.) १.२ ग्रॅम किंवा फ्लोनिकामीड (५० टक्के डब्लू.जी.) ०.४ ग्रॅम किंवा थायामेथोक्‍झाम (२५ टक्के डब्लू.जी.) ०.२ ग्रॅम 

संपर्क : डॉ. शैलेश गावंडे,  ०७१०३ - २७५५३८
(पीक संरक्षण विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

इतर कृषी सल्ला
आंबा, संत्रा, मोसंबी फळबाग सल्लासद्यस्थितीत पावसाळा संपल्याने फळबागेला योग्य...
योग्य प्रकारे करा रेशीम अंडीपुंजांची...हॅचिंग तारखेच्या किमान पंधरा दिवस अगोदर आपल्या...
फुलशेती सल्लासद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड-...
महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता महाराष्ट्राच्या पश्‍चिम...
उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणीउसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्याने लहान...
लक्षात घ्या आर्द्रता चक्रउपलब्ध पाण्यापैकी आपणास फक्त २५ टक्के पाणी...
द्राक्ष बागेतील भुरीनियंत्रणाकडे...येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये...
फुलकिडे, करपा नियंत्रणाकडे लक्ष द्यासध्या रांगडा कांदा व लसूण ही पिके शेतात उभी असून...
भाजीपाला सल्लाडिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
पशुपालन सल्ला : जखमांवर उपाययोजनाजनावरांस भांडणामुळे, कुरणावर चरत असताना काही...
ऊस लागवडीचे करा योग्य नियोजनएकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी ऊस...
पाऊस असला तरी ’भुरी’चा धोका जास्तओखी चक्रीवादळानंतरचे परिणाम सर्व द्राक्ष...
केळी पीकसल्लासद्यःस्थितीत वातावरणातील तापमानात हळूहळू घट होत...
रब्बी हंगाम कृषी सल्लारब्बी हंगामातील पिकांना तणनियंत्रणासाठी कोळपणी,...
मातीची सुपीकता जपण्यासाठी...सद्यःस्थितीमध्ये मातीची सुपीकता जपणे अत्यंत...
मृदा सुरक्षिततेच्या समस्या, उपाययोजनाआज जागतिक मृदा दिन. संयुक्त राष्ट्र संघ २०१५-२०२४...
तूर पीक संरक्षण सल्ला तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची...
केसर आंबा सल्लामोहोर जोपासना : आंबा पिकात मोहोर येण्यासाठी...
लक्षात घ्या पाण्याचे प्रदूषणपीक व्यवस्थापनामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर चालू...