agriculture stories in marathi, crop advisory cotton, tur, soybean | Agrowon

खरीप पीकसल्ला
डॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

राज्यात काही भागांत अतिवृष्टी झाली, तसेच काही भागांत पावसाचा मोठा खंड पडला. पिकात अतिपावसामुळे पाणी साठून रोगांचा व दमट वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्या दृष्टिकोनातून नियोजन करावे.  

खरीप ज्वारी/ मका :  
खोड किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 
खोडकीड नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी 
क्विनॉलफॉस २ मि.लि. किंवा क्‍लोरपायरिफॉस २ मि.लि. 

राज्यात काही भागांत अतिवृष्टी झाली, तसेच काही भागांत पावसाचा मोठा खंड पडला. पिकात अतिपावसामुळे पाणी साठून रोगांचा व दमट वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्या दृष्टिकोनातून नियोजन करावे.  

खरीप ज्वारी/ मका :  
खोड किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 
खोडकीड नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी 
क्विनॉलफॉस २ मि.लि. किंवा क्‍लोरपायरिफॉस २ मि.लि. 

तूर : 
तणांचा प्रादुर्भाव असल्यास कोळपणी व खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी एक आड एक ओळ चर काढावा. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. 

मूळकुजव्या नियंत्रण - आळवणी बुंध्याशी 
कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम किंवा 
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी

सोयाबीन :  
उशिरा लागवड झालेल्या पिकामध्ये जलसंधारणासाठी उपाययोजना करावी. त्यासाठी पीक ३० ते ३५ दिवसांचे झाल्यावर दर चार ओळींनंतर एक जलसंधारण सरी काढावी. कीड व रोगांसाठी नियमित सर्वेक्षण करावे. उगवणीनंतर पिकात युरिया खताची मात्रा देऊ नये.

सूर्यफूल : 
ऑगस्ट महिन्यात सूर्यफुलाची पेरणी केल्यास पेरणीनंतर १०-१२ दिवसांनी विरळणी करावी. संकरित वाणात ६० x ३० सें.मी. सरळ वाणात ४५ x २२.५० सें.मी. अंतरावर एक हिरवेगार व जोमदार रोपटे ठेवावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी प्रतिहेक्‍टरी ३० किलो नत्र-युरियाद्वारे जमिनीत ओल असताना द्यावे. केसाळ अळीचा व अल्टरनेरीया (काळे ठिपके) या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

केसाळ अळीनियंत्रण :
फवारणी प्रतिलिटर पाणी : क्विनॉलफॉस २ मि.लि.
सूचना : केसाळ अळीचे अंडीपुंज तसेच अळ्यासहित पाने तोडून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवावी. आधी ही क्रिया करून मग क्विनाॅलफॉसची फवारणी करावी. 

अल्टरनेरिया (काळे ठिपके) रोगनियंत्रण ः
फवारणी प्रतिलिटर पाणी : मॅन्कोझेब २.५ ग्रॅम 

भुईमूग : 
अतिरिक्‍त पाण्याचा निचरा करावा. पावसाचा खंड पडला असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. पाने पोखरणारी/ गुंडाळणारी अळी, मावा व तुडतुडे व तांबेरा, टिक्का या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

पाने पोखरणारी अळीनियंत्रण ः 
फवारणी प्रतिलिटर पाणी : क्लोरपायरीफॉस २ मि.लि.

तांबेरा रोगनियंत्रण :  
फवारणी प्रतिलिटर पाणी : ट्रायडेमॉर्फ ०.७ मि.लि.

टिक्का रोगनियंत्रण ः 
फवारणी प्रतिलिटर पाणी : मॅन्कोझेब २.५ ग्रॅम

कापूस
येत्या काही दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज आहे. अशावेळी पाणी साचून नुकसान होऊ नये यासाठी पिकात चर काढावेत. त्यासाठी पिकात दर ४ ओळी नंतर किंवा एका आड एक ओळीनंतर उथळ सऱ्या पाडाव्यात. सऱ्यांमधून अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. तसेच उशिरा पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. पिकाच्या शेवटच्या अवस्थांत वाढीसाठी या पाण्याचा पिकाला उपयोग होतो. पाण्याचा ताण किंवा अतिरिक्त पाऊस झाल्यास पीक पिवळे पडू लागते. त्यामुळे पोटॅशिअम नायट्रेट (१३ः००ः४५) किंवा १९ः१९ः१९ ही विद्राव्य खते १५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पिकात अतिरिक्त पाणी साचून राहिल्यामुळे मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. तसेच करपा/कवडी या रोगाचा व फुलकिडे, तुडतुडे व पांढरी माशी या कीडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

रोगनियंत्रण : 
मूळकुजव्या :
आळवणी प्रमाण प्रतिलिटर पाणी 
कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम 
सूचना : आळवणी अतिरिक्त पाण्याचा निचरा करुन तसेच बुंध्याशी आळवणी करावी.

करपा/ कवडी :
फवारणी प्रतिलिटर पाणी : कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड २.५ ग्रॅम

कीडनियंत्रण : 
फुलकिडे ः फवारणी प्रति लिटर पाणी
डायमेथोएट (३० टक्के) १ मि.लि. किंवा
अॅसिटामिप्रीड (२० टक्के) ०.४ ग्रॅम किंवा
फिप्रोनील (५ टक्के) २ मि.लि. किंवा
फ्लोनिकॅमिड (५० टक्के) ०.३ ग्रॅम

तुडतुडे ः फवारणी प्रतिलिटर पाणी
अॅसिटा-मिप्रीड (२० टक्के) ०.४ ग्रॅम किंवा
थायामिथोक्‍झाम (२५ टक्के) ०.४ ग्रॅम

पांढरी माशी ः फवारणी प्रति लिटर पाणी
असिफेट (७५ टक्के) २ ग्रॅम किंवा
अॅसिटामिप्रीड (२० टक्के) ०.४ ग्रॅम किंवा
डायमेथोएट (३० टक्के) १ मि.लि.

संपर्क ः डॉ. यू. एन. आळसे, ९४२१३९२१९३
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

फोटो गॅलरी

इतर कृषी सल्ला
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
शंखी गोगलगाईचे नियंत्रणसध्याच्या काळात सोयाबीन आणि भुईमूग पिकावर शंखी...
कृषी सल्ला : कापूस, मूग-उडीद, सोयाबीन,...कापूस : सद्यःस्थिती : पीक वाढीच्या अवस्थेत. -...
डाऊनी मिल्ड्यू, करपा रोगाच्या...येत्या आठवड्यामध्ये द्राक्ष लागवडीच्या...
उसावरील लोकरी माव्याचे नियंत्रणनुकसानीचा प्रकार : किडीचे प्रौढ त्यांच्या...
आंतरमशागत करा, संरक्षित पाणी द्यासोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे. पाण्याचा ताण कमी...
जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील...
करपा, तांबेरा प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष...येत्या आठवड्यामध्ये वातावरण अधूनमधून ढगाळ राहिले...
पीक पोषणामध्ये अन्नद्रव्यांच्या परस्पर...निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा जमिनीतून होणारा पुरवठा...
पिकातील गंधक कमतरतेची लक्षणेपाण्याचा लवकर निचरा होत असलेल्या जमिनी तसेच जैविक...
नवीन रोपांचे व्यवस्थापन महत्त्वाचे...नवीन रोपांना मातीची भर द्यावी. वाढीच्या टप्प्यात...
काही भागात उघडीप, तर तुरळक ठिकाणी पाऊसमहाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००० हेप्टापास्कल...
पीक सल्लातीळ जून महिन्यात पेरलेल्या पिकास पेरणीनंतर...
फुलशेती सल्लागुलाब : गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...
तंत्र चिकू लागवडीचे...चिकू कलम लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात मध्यभागी...
नवीन फुटींवर तांबेरा रोगाची शक्यता,...मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी अधूनमधून...