गोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक

गोड ज्वारी लागवड
गोड ज्वारी लागवड
  • गोड ज्वारी ही आपल्या नेहमीच्या खरीप ज्वारीसारखीच असते. मात्र, जास्त कायीक वाढ आणि तिच्या ताटाच्या रसामध्ये अधिक साखरेचे प्रमाण (ब्रिक्‍स) असल्याने त्यास गोड ज्वारी म्हणतात.
  • या ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. त्याच्या रसापासून काकवी किंवा गूळ आणि इथेनॉल बनविता येते. गोड ज्वारीच्या ताटापासून रस काढल्यानंतर राहिलेला चोथा गुरांना चारा म्हणून वापरता येतो. 
  • गोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानाप्रमाणेच असून, खालील काही मुद्दे वेगळे आहेत. 
  • पेरणीची वेळ आणि पद्धत : गोड ज्वारी ही खरीप आणि उन्हाळी हंगामात घेता येते. खरीप हंगामात ज्वारीची पेरणी योग्य पाऊस झाल्याबरोबर १५ दिवसाच्या आत करावी. उन्हाळी हंगामात गोड ज्वारीची पेरणी डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करावी. पेरणीच्या वेळी रात्रीचे तापमान १० ते १२ सेल्सिअस पेक्षा जास्त असावे. सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास जमिनीत ओलावा कायम टिकून राहतो.

    ओळीतील अंतर :  गोड ज्वारीसाठी दोन ओळींतील अंतर ६० सें.मी. व दोन झाडामधील अंतर १५ सें.मी. ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे झाडाची संख्या एक लाख दहा हजार प्रतिहेक्‍टरी राहील.

    गोड ज्वारीचे प्रचलीत वाण :  एसएसव्ही-८४  फुले अमृता (आर एस एस व्ही-९), शुगरग्रे, ऊर्जा, सीएसएच-२२, आयसीएसव्ही- ९३०४६, आयसीएसव्ही- २५२७४

    खताची मात्र :  पेरणी पूर्वी १२ ते १५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे. १०० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्‍टरी या रासायनिक खताची शिफारस आहे.

    उत्पादन :

  • हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ३६-४० टन प्रतिहेक्‍टर
  • धान्याचे उत्पादन ३-८ क्विंटल प्रतिहेक्‍टर.
  • रसातील गोडवा ब्रिक्‍स १७-१८
  • गुळाचे उत्पादन ३०-३२ क्विंटल प्रतिहेक्‍टर.
  • इथेनॉलचे उत्पादन १८००-२००० लिटर प्रतिहेक्‍टर. 
  • वरीलप्रकारे काटेकोर व्यवस्थापन केल्यास गोड ज्वारीचा एकरी १२ ते १५ टन हिरवा चारा मिळू शकतो आणि रसापासून आपणास हेक्‍टरी २००० ते २५०० लिटर इथेनॉल मिळू शकते.

    रस काढल्यानंतर शिल्लक राहणारा लगदा ज्वलनासाठी तसेच जनावरांचे पौष्टिक खाद्य म्हणून वापरता येतो. त्याचा वापर दुग्धोत्पादन वाढीला हातभार लावेल, तसेच गोड ज्वारीच्या सिरपला ही मागणी राहील. या सिरपपासून काकवी तयार करण्यासाठी इक्रिसॅटमध्ये संशोधन सुरू आहे. ती मधुमेहीसाठी उपयुक्त असेल. 

    गोड ज्वारी अधिक लाभदायी का?

  • गोड ज्वारीचे पीक हे ४ महिन्यांत येते. दर वर्षी  दोन पीक घेता येतात.
  • गोड ज्वारी हे जिरायत पीक आहे. हे पीक जमिनीतील पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करणारे पीक (सी ४)  म्हणून ओळखले जाते. 
  • गोड ज्वारीचा लागवडीचा खर्च कमी.
  • गोड ज्वारीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून, हा रस इथेनॉलसाठी योग्य.
  • बियाण्यांपासून लागवड करू शकतो.
  • गोड ज्वारीच्या चोथा पशुखाद्यासाठी उपयुक्त. 
  • काही प्रमाणात धान्याचे उत्पादन.
  • आर्थिकदृष्ट्या अधिक फायद्याचे. 
  • संपर्क : डॉ. हि. वि. काळपांडे,  ०२४५२-२२११४८ (लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक  मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी य़ेथे कार्यरत आहेत)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com