पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १५३ टीएमसी साठा
संदीप नवले
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पुणे : गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांमध्ये वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये १५३.८९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. यातील बारा धरणे शंभर टक्के भरली असून, पाच धरण प्रकल्प ९० टक्‍क्‍यांहून अधिक भरली आहेत.

पुणे : गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांमध्ये वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये १५३.८९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. यातील बारा धरणे शंभर टक्के भरली असून, पाच धरण प्रकल्प ९० टक्‍क्‍यांहून अधिक भरली आहेत.

जिल्ह्यात साधारणपणे १७-१८ जूनच्या दरम्यान मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर तालुक्‍यांत जून- जुलैमध्ये भात लागवडीला चांगलाच वेग आला होता. पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्‍यातही पेरण्यांना सुरवात झाली. त्यानंतर पूर्वेकडील तालुक्‍यात कमीअधिक, काही काळ पावसाचा खंड पडला होता. परंतु पश्‍चिमेकडील तालुक्‍यात पाऊस उघडीप न देता सतत संततधार बरसत होता. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत होता.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक जूनपासून ते आतापर्यंत सर्वाधिक तीन हजार १९६ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पवना धरण शंभर टक्के भरले. वडिवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३ हजार ३८, टेमघर २८५०, वरसगाव १९०८, पानशेत १८८१, नीरा देवधर १९२२, गुंजवणी १६९७, आंध्रा १४३४, भामा आसखेड एक हजार ७१, कळमोडी १३७७, डिंभे ११८२, पिंपळगाव जोगे ९८१, माणिकडोह ९४९, येडगाव ८६०, चासकमान ८१६, कासारसाई ९८२, खडकवासला ६०९, भाटघर ५३०, घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र यापैकी सहा धरणांत कमी पाणीसाठा आहे. 

धरणनिहाय झालेला पाणीसाठा (टक्के) 

पूर्ण भरलेली धरणे ः कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, वरसगाव, नीरा देवघर, भाटघर. 

९० टक्‍क्‍यांहून अधिक भरलेली धरणे ः वडज ९८.५८, डिंभे ९९.५३, घोड ९४.०१, भामा आसखेड ९८.०३, वीर ९६.४२.

९० टक्‍क्‍यांहून कमी भरलेली धरणे ः पिंपळगाव जोगे ७९.२८, माणिकडोह ७४.६७, येडगाव ७२.५८, विसापूर ४०.७१, टेमघर ५३.१३, गुंजवणी ६०.४१.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊसपुणे : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) दिवसभर पावसाने...
दहा गावांतील शेतकऱ्यांचे एकाचवेळी उपोषणवणी, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे...
जळगाव येथे कोथिंबीर १८०० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात...राहुरी, जि. नगर  : महात्मा फुले कृषी...
दीक्षाभूमी त्याग, शांतता, मानवतेची...नागपूर ः नागपुरातील दीक्षाभूमी त्याग, शांतता व...
नगर : मांडओहळ धरण १०० टक्के भरले टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान...
उजनी धरणातून भीमेमध्ये पाण्याचा विसर्ग...सोलापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने...
फिनोलेक्स प्लासनसह चार ठिबक कंपन्यांना...पुणे : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून राज्यात...
पावसामुळे सोयाबीन, घेवडा कुजण्याची शक्‍... सातारा ः जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
खरीप हंगामातील उत्पादन वाढणारनवी दिल्ली ः देशात यंदा समाधानकारक पावसाच्या...
ई-पॉस यंत्रणेबाबत तांत्रिक अडचणी जळगाव  ः खतांच्या विक्रीमध्ये पारदर्शकता व...
धारवाड येथे आजपासून कृषी प्रदर्शनसंकेश्‍वर, कर्नाटक ः येथील धरावाड कृषी...
मंगळावर पाण्याचे प्रचंड साठे मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे...
सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात...सांगली : जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या शेती...
बुलेट ट्रेनने अहमदाबाद जाऊन ढोकळा...मुंबई : सोशल मिडीयात काही लपून राहत नाही. सोशल...
वादळी पावसामुळे नांदुरा तालुक्यात...नांदुरा (बुलडाणा) : काल संध्याकाळी नांदुरा...
वाहनचालकाच्या प्रयत्नातून शेतीचे...बीड : एकीकडे शेती नकोशी वाटणाऱ्यांची संख्या वाढत...
भारतात आणखी १ लाख टन गहू आयात होणार मुंबई ः पुढील काही दिवसांत केंद्र सरकारकडून...
मुंबईला पाणी पुरविणारी सातही धरणे भरली मुंबई ः तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार...
कर्जमाफीची रक्कम १५ ऑक्टोबरपासून बँक... मुंबई : अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची...