अभ्यास अन् नियोजनातून फळबाग झाली फायद्याची
गोपाल हागे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

अकोला शहरातील डॉ. रामधन शिंदे हे गेल्या पस्तीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात आहेत. याचबरोबरीने प्रयोगशील शेतकरी म्हणूनदेखील त्यांची ओळख आहे. वैद्यकीय क्षेत्रातील धावपळ सांभाळून डॉ. शिंदे यांनी डाळिंब बाग; तसेच पारंपरिक पिकांचे चांगले नियोजन केले आहे. 

अकोला शहरातील डॉ. रामधन शिंदे हे गेल्या पस्तीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात आहेत. याचबरोबरीने प्रयोगशील शेतकरी म्हणूनदेखील त्यांची ओळख आहे. वैद्यकीय क्षेत्रातील धावपळ सांभाळून डॉ. शिंदे यांनी डाळिंब बाग; तसेच पारंपरिक पिकांचे चांगले नियोजन केले आहे. 

डॉ. रामधन परशराम शिंदे हे मूळचे बुलडाणा शहरालगतच्या सागवन गावाचे. नोकरीनिमित्त १९८६ मध्ये डॉ. शिंदे अकोला स्त्री रुग्णालयात आरएमओ म्हणून रुजू झाले. नंतरच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. शिंदे रुजू झाले. २०१५ मध्ये डॉ. शिंदे सेवानिवृत्त झाले. सध्या अकोला शहरातील सहा हॉस्पिटल्समध्ये डॉ. शिंदे बधिरीकरणाची सेवा देतात. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहूनही त्यांनी शेती नियोजनाकडे दुर्लक्ष केलेले नाही. 

दोन एकरांपासून शेतीला सुरवात 
डॉ. शिंदे हे शेतकरी कुटुंबातील. त्यामुळे सुरवातीपासून शेतीची आवड. अकोल्यात आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात जम बसूनही स्वतःची शेती असली पाहिजे, हे त्यांना कायम वाटायचे. त्यामुळे डॉ.शिंदे यांनी १९९४ मध्ये कुंभारी (जि.अकोला) शिवारात दोन एकर शेती विकत घेतली. शेतीच्या अनुभवाबाबत डॉ. शिंदे म्हणाले की, मी वीस वर्षांपूर्वी व्यवस्थापनाला सोपे जाण्यासाठी वनशेती निवडली. दोन एकरामध्ये सहा फूट बाय सहा फूट अंतराने सागवान रोपांची केली.  ज्या रोपांची वाढ फारच कमी होती ती रोपे सहा वर्षांनी कमी केली. उर्वरित रोपांचे चांगले व्यवस्थापन केले.  पूर्ण वाढ झाल्याने यंदा १५७० सागवान झाडांची तोडणी केली. सुरवातीला साग व्यापाऱ्याला विक्री करण्याचा विचार होता; परंतु व्यापाऱ्याने सात लाखांमध्ये संपूर्ण लाकडाची मागणी केली. त्यामुळे मी स्वतः सागवान लाकूड विकण्याचा निर्णय घेतला. यातून मला खर्च वजा जाता चांगले उत्पन्न मिळाले. साग झाडे कापून झाली तरी बुंध्याशी नवीन अंकुर फूटत आहेत. काही झाडावर हे अंकुर ठेवून पुन्हा सागाची चांगली वाढ होते का ते मी पाहाणार आहे. 

माळ जमिनीत फुलविले डाळिंब 
डॉ. शिंदे डाळिंब लागवडीबाबत म्हणाले की, २००४ मध्ये मी कुंभारी शिवारात दहा एकर डोंगराळ जमीन विकत घेतली. या जमिनीत काटेरी झाडे, झुडपे वाढलेली होती. ही जमीन खरेदी केल्यावर अनेक जण मला म्हणाले की, येथे शेती शक्य नाही. परंतु मी  फळ बागायतदार, तज्ज्ञांशी चर्चा केली. बाजारपेठेचा अंदाज घेत डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. सन २०१२ मध्ये मी दहा एकरावर १४ फूट बाय १० फूट अंतरावर ‘भगवा’ जातीची रोपे लावली. बागेला ठिबक सिंचन केले. डाळिंब झाडांना मी शेणखत, गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर करतो. त्याचा रोपांच्या वाढीस फायदा झाला.

 ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. लागवडीपूर्वी मी स्वतः तसेच बागेच्या व्यवस्थापनासाठी असलेल्या तीन मजुरांनी डाळिंब व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे आता बागेचे व्यवस्थापन सोपे जाऊ लागले आहे. मी २०१४ मध्ये पहिला बहर घेतला. मला दहा एकरातून २५ टन उत्पादन मिळाले. अकोला परिसरातील व्यापाऱ्यांना बागेतच डाळिंब विकले. जागेवर मला प्रतिकिलो ४० रुपये दर मिळाला. यंदाच्या वर्षी मला एकरी साडेसहा टनाचे उत्पादन मिळाले. एकरी खर्च वजा जाता दीड लाखाचा नफा मिळाला. बागेमध्ये व्यापाऱ्यांना फळांची विक्री केली. त्यामुळे वाहतूक, प्रतवारी खर्च वाचला. अपेक्षित नफादेखील मिळाला. येत्या काळातील फळांच्या दर्जेदार उत्पादनातून आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. 

पीक फेरपालटावर भर 
डाळिंब फळबागेच्या बरोबरीने डॉ. शिंदे हे सोयाबीन, मधूमका, हरभरा,गहू लागवड करतात. या  नियोजनाबाबत ते म्हणाले की, दरवर्षी मी दहा एकरावर सोयाबीनच्या चांगले उत्पादन देणाऱ्या  जातींची लागवड करतो. प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करून लागवड आणि व्यवस्थापन करत असल्याने मला एकरी दहा क्विंटल उत्पादन मिळते. बाजारपेठेत मधूमक्याला चांगली मागणी असते. त्यामुळे दर महिन्यात टप्प्याटप्प्याने अर्धा एकरात मधुमक्याची लागवड करतो. या पिकातून मला खर्च वजा जाता पंचवीस हजाराचा नफा मिळतो. तसेच जनावरांना मक्याचा सकस चारा मिळतो.  
    रब्बी हंगामात पाण्याच्या उपलब्धेतनुसार  गहू आणि हरभरा लागवड असते. पूर्वी मी दीड एकरावर निशीगंधाची लागवड केली होती. हे पीक देखील फायदेशीर ठरले. सध्या या पिकाची जबाबदारी भावाकडे दिलेली आहे.  
मी येत्या काळात दोन एकर आंबा, दोन एकर पेरू आणि पाच एकरावर सीताफळ लागवडीचे नियोजन केले आहे. बागेची आखणीकरून खड्डे शेणखत, माती मिश्रणाने भरून ठेवले आहेत. कलमांची खरेदी देखील केली आहे. येत्या काळात कलमांची लागवड करणार आहे.  गेल्या वीस वर्षात मी टप्याटप्याने ३८ एकरावर शेती नेली. शेती नियोजनासाठी तीन कायमस्वरूपी मजूर आहेत. त्यामुळे हंगामी तसेच फळबागांचे व्यवस्थापन सोपे जाते. 

काटेकोर पाणीवापरावर भर 
 पाणी व्यवस्थापनाबाबत डॉ. शिंदे म्हणाले की, जमीन घेतल्यानंतर शाश्वत पाण्याची व्यवस्था नव्हती. पुरेसे पाणी नसल्याने वर्षभर पीक लागवडीला मर्यादा होती. पाणी उपलब्धतेसाठी मी जवळपास १४ कूपनलिका घेतल्या. परंतु पाणी फारच कमी लागले. सध्या दोन कूपनलिकांना चांगले पाणी आहे. शेतात तीन विहिरी आहेत.त्यामुळे पाणी पुरते. कूपनलिकांना पुरेसे पाणी लागत नसल्याने मी स्वतः भूगर्भातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत शास्त्रीय पुस्तकांचा अभ्यास केला. तज्ज्ञांकडून पाणी उपलब्धतेचे शास्त्र समजाऊन घेतले.  या अभ्यासानंतर खोदलेल्या कूपनलिकांना पाणी लागले.  मी परिसरातील शेतकऱ्यांना विहीर,कूपनलिका खोदण्यापुर्वी पाण्याच्या उपलब्धेतबाबत  मोफत मार्गदर्शन करतो. 

शेणखत, गांडूळ खताची निर्मिती 
 डॉ. शिंदे यांनी शेतावर दहा गाईंचे संगोपन केले आहे. या जनावरांचे व्यवस्थापन मजुरांचे कुटुंब पहाते. जनावरांच्या शेण,मूत्रापासून शेणखत तसेच काही प्रमाणात गांडूळ खत तयार केले जाते. त्यामुळे डाळिंब बागेसाठी पुरेशी सेंद्रीय खतांची उपलब्धता होते. गरजेनुसार परिसरातील शेतकऱ्यांकडून गांडूळ खताची खरेदी केली जाते. 

खर्च आणि नफ्यातही मजुरांचा सहभाग 
वैद्यकीय पेशा सांभाळून मजुरांकडून शेती करून घेणे हे जिकिरीचे काम. याची जाणीव डॉ. शिंदे यांना होती.  सुरवातीची काही वर्षे डॉ. शिंदे यांना भावांची शेतीच्या नियोजनात मदत मिळाली. नंतर भावांना त्यांनी शेती घेण्यासाठी मदत केली. सध्या डॉ. शिंदे तीन कायमस्वरूपी मजुरांसमवेत शेतीचे नियोजन पहातात. मजुरांना ते कुटुंबाचा घटक समजतात. शेतावरच मजुरांच्या कुटुंबाची रहाण्याची सोय केली आहे. डॉक्टरी पेशामुळे पीक लागवड, व्यवस्थापनाच्या दृष्टीने डॉक्टरांना  प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्‍य होत नाही. परंतु  रविवारी सुटीच्या दिवशी ते पूर्णवेळ शेतीवर रमतात. उर्वरित दिवशी मजुरांशी मोबाईलवरून संपर्क साधून  पीक व्यवस्थापनाची कामे  मार्गी लावतात.

    पीक उत्पादनात सातत्य रहावे, दर्जेदार उत्पादन मिळावे यासाठी व्यवस्थापन खर्च आणि उत्पन्नाच्या नफ्यात त्यांनी मजुरांना सहभागी करून घेतले. मजुरांना ५० टक्के वाटा दिला जातो. त्यामुळे मजूरदेखील चांगल्या प्रकारे पीक व्यवस्थापन ठेवतात. उत्पादनवाढीचा फायदा सर्वांनाच होतो. शेतीच्या नियोजनात रमल्याने डॉ. शिंदे वयाच्या ६४ व्या वर्षीही ठणठणीत आहे. त्यांचा मुलगा आणि मुलगीदेखील वैद्यकीय क्षेत्रात उच्च पदवीधर आहेत. त्यांनादेखील शेतीची आवड आहे.

 संपर्क ः डॉ. रामधन शिंदे, ९८२३०४४४२०

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...