Agriculture stories in Marathi, farmer's crop planning , AGROWON, Maharashtra | Agrowon

योग्य व्यवस्थापनातून हरभरा उत्पादनात सातत्य जोपासले
गोपाल हागे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

शेतकरी नियोजन


रब्बीतील विविध पिकांमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असते. राज्यातील विविध भागांतील अनेक शेतकरी अशा सातत्यपूर्ण चांगल्या व्यवस्थापनातून उत्पादन व दर्जामध्ये चांगली वाढ मिळवत आहेत. अशा शेतकऱ्यांचे अनुभव अन्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

नाव : राजाराम किसन मेटांगळे,
मादणी, ता. मेहकर, जि. बुलडाणा

शेतकरी नियोजन


रब्बीतील विविध पिकांमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असते. राज्यातील विविध भागांतील अनेक शेतकरी अशा सातत्यपूर्ण चांगल्या व्यवस्थापनातून उत्पादन व दर्जामध्ये चांगली वाढ मिळवत आहेत. अशा शेतकऱ्यांचे अनुभव अन्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

नाव : राजाराम किसन मेटांगळे,
मादणी, ता. मेहकर, जि. बुलडाणा

हरभरा हे रब्बी हंगामातील अत्यंत महत्त्वाचे व नफा कमावून देणारे पीक आहे. अन्य पिकांच्या तुलनेत त्यासाठी कमी मेहनत यासाठी लागते. योग्य व्यवस्थापन सांभाळले तरच उत्पादन अधिक मिळू शकते. 

आमच्या कुटुंबाची तीस एकर शेती आहे. खरिपात आम्ही सोयाबीनचे मुख्य पीक घेतो. सोयाबीनची ऑक्‍टोबरच्या दरम्यान काढणी झाली की याच महिन्यात साधारण १५ ऑक्‍टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान हरभरा घेतो. दरवर्षी साधारणतः १८ ते २० एकर क्षेत्र हरभरा पिकासाठी ठेवतो. याहीवर्षी लवकरच सोयाबीनची काढणी करून हरभरा लावणीचे काम हाती घेणार आहोत.  

आम्ही तिघे भाऊ असून एकत्रितपणेच शेतीचे व्यवस्थापन सांभाळतो. सोयाबीनची काढणी झाली की ट्रॅक्‍टरच्या साह्याने (पंजीने) मशागत करतो. त्यानंतर पुन्हा रोटाव्होटरचा वापर करतो. त्यानंतर जमीन भिजवून घेतो. जमीन भिजवल्याने सोंगणीच्या वेळी पडलेली सोयाबीन उगवते. ही उगवलेली सोयाबीन वखरणी करून गाडून टाकतो. यामुळे हरभरा पिकातील एक निंदण वाचते. त्यानंतर लगेचच पट्टा पद्धतीने हरभरा लावणीचे काम सुरू केले जाते. ट्रॅक्‍चरचलीत पेरणी यंत्राने लागवड करतो. पेरणी यंत्राने सात तासे निघतात. परंतु एक तास बंद ठेवून सहाच तासे प्रत्येक फेरीत काढले जातात. एका तासाची जागा मोकळी ठेवली जाते. यामुळे पिकात मोकळी हवा खेळते. शिवाय आगामी काळात पिकाला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर करणे, फवारणी व अन्य कामांसाठी शेतात फिरण्यासाठी या जागेचा उपयोग होते.

हरभरा लावणी :
एकरी ३० ते ३५ किलो बियाणे वापरतो. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केली जाते. पेरणी करतानाच गंधक व डीएपी यांची मात्रा दिली जाते. त्यानंतर फवारणीद्वारेदेखील खते दिली जाते. पेरणीनंतर साधारणतः २० दिवसांनी पहिली डवरणी व त्यानंतर आणखी १० दिवसांनी दुसरी डवरणी करतो. हरभऱ्याला पाण्याच्या पाळ्या गरजेनुसार दिल्या जातात. किमान तीन ते पाच पाळ्या होऊ शकतात. कीड नियंत्रणासाठी चार फवारण्या घेतो. 

उत्पादनात सातत्य : 
दरवर्षी एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मागील वर्षी १९ एकरांमध्ये २१५ पोती हरभरा झाला. हा हरभरा मध्यंतरी दर कमी असल्याने अद्यापही विकलेला नाही. तूर्त तो वेअर हाऊसला ठेवला आहे. यावर्षी प्रयोग म्हणून काबुली हरभरा पेरणार आहे. त्यासाठी एका शेतकऱ्याकडून दोन क्विंटल बियाणे आणले आहे. हरभऱ्याचा एकरी उत्पादन खर्च सुमारे १० हजार रुपये होतो. उत्पादन अंदाजे १० क्विंटलपर्यंत मिळते. खर्च वजा जाता नफा सुमारे ३५ हजार रुपयांपर्यंत होतो. अर्थात प्रत्येक वर्षीच्या दरांवर ते अवलंबून राहते. 

संपर्क :  : राजाराम मेटांगळे, ७५८८५६५४५३ 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप...राज्यातील शेतकरीवर्गाच्या उत्पन्नवाढीचा...
जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा...देशात हरितक्रांती अत्यावश्यक होती. मात्र, ...
निर्यातक्षम मोसंबीसाठी एकच बहर घ्यावा...जालना :  निर्यातक्षम मोसंबी उत्पादनासाठी...
सुबोध सावजींचा विहिरीतच मुक्कामअकोला ः पाणीपुरवठा योजनांच्या कामात मोठ्या...
साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा...लातूर ः केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना...
जागेवरच कुजवा सेंद्रिय घटकमी १९७० मध्ये कोल्हापूरमध्ये शेती करण्यास प्रारंभ...
धोरणकर्त्यांना शेतमाल उत्पादकांपेक्षा...बारामती, जि. पुणे : देशातील धोरणकर्त्यांना शेतमाल...
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
पिंक बेरी, भुरी, क्रॅकिंग टाळण्यासाठी...सध्याच्या वाातावरणामध्ये द्राक्ष बागेमध्ये पिंक...
तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे...सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत...
खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूचजळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अजूनही कांदा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’...मार्केट ट्रेंडस्.. आर. बी. हर्बल अॅग्रो ही...
ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारकपुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारतेय ऊसशेतीसिंधुदुर्ग : आंबा, काजू व अन्य मसाला पीक...
मुख्यमंत्री शाळा बंद करताहेत : अजित पवारबीड : सरकार मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र...
माजी राज्यमंत्र्यांचे विहिरीत आंदोलनअकोला : बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील...
शासकीय निधी खर्चाची माहिती आता एका क्‍...रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा...
जळगावात चवळी शेंगा २००० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...